Wednesday, November 3, 2010

सर्च देके ब्लेको


सर्च इंजीनमध्ये आघाडीवर असलेल्या गुगलला टक्कर देण्यासाठी ब्लेको (Blekko.com) हे नवे सर्च इंजीन सुरु झाले आहे.

गुगलवर सर्च करताना अनेकवेळा अनावश्यक वेबसाइट सर्चमध्ये वरच्या क्रमांकावर दिसतात. गुगलच्या युजर्सकडून अशा तक्रारीही येत आहेत. नेमक्या याच गोष्टीमध्ये ब्लेकोने सुधारली आहे. ब्लेकोमध्ये युजर्सना अधिकृत तसेच अधिक सुसंगत वेबसाईटचे रिझर्ल्ट मिळणार आहेत. तुम्ही सर्च करत असलेल्या विषयाशी संबंधीत मात्र अनावश्यक वेबसाईट वगळण्याची यंत्रणा यामध्ये आहे. तसेच सर्चच्या संबंधी मात्र कमी महत्त्वाच्या आणि नकोशा spam साइट यामध्ये दिसणार नाहीत. यासाठी ब्लेकोने slashtags screening technology चा वापर केला आहे.

ब्लेकोवर सध्या तीन अब्ज अधिकृत वेबसाइटची नोदणी आहे. यामधूनच यूजर्सनी सर्च केलेल्या विषयासंर्भातील बेवसाइटची यादी अथवा माहिती दाखवली जाते.
ब्लेकोवर वेबसाइटच्या रॅकिंगच्या बाबतीत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. अन्य सर्च इंजिनमध्ये एखाद्या वेबसाइटचे रॅकिंग गुप्त ठेवले जाते. मात्र ब्लेकोवर ही माहिती सर्वासांठी खुली आहे. एखाद्या वेबसाइटचे रॅकिंग पहायचे असेल तर संबंधित बेवसाइटचा पत्ता लिहून/seo लिहावे.

ब्लेको गुगल सारख्या प्रस्थापीत सर्च इंजीनला तसेच गुगल, बिंग या सर्च इंजीनना टक्कर देईल का नाही. हे इतक्यात सांगता येणार नाही. मात्र अन्य सर्च इंजीनवर ज्या गोष्टी करता येणार नाहीत. त्या ब्लेकोवर करता येईल असा दावा यांच्या निर्मात्यांनी केला आहे.
ब्लेको अन्य वैशिष्टे पाहण्यासाठी सर्च करुन पहायला हरकत नाही.

Monday, November 1, 2010

याहू मेल नव्या स्वरुपात

गुगलच्या जी-मेलला आणि माक्रोसॉफ्टच्या हॉटमेलला टक्कर देण्यासाठी याहूने आपल्या मेल सेवेची नवी व्हर्जन लॉच केली आहे.

याहू मेलच्या नव्या व्हर्जनची काही वैशिष्टे

  • या नव्या व्हर्जनमध्ये युजर्सना अमर्यांदित जागा देण्यात आली आहे.
  • अधिक वेगाने इ-मेल पाठवने शक्य होणार आहे.
  • याहूने नवे व्हर्जन आकर्षक Designमध्ये उपलब्ध करुन दिले आहेत.
  • तुम्ही वापरत असलेल्या फेसबुक, टि्वटर आदी या सोशल नेटवर्किंग साइटचे अपडेट याहू मेलच्या डॅशबोर्डवर पाहता येणारा.
  • इंटरनेट कनेक्ट असलेल्या कोणत्याही माध्यमातून याहूमेल ओपन करता येणे शक्त.
  • अनावश्यक येणा-या मेलपासून (Spam) अधिक संरक्षण



इ-मेल सेवा देणा-यामध्ये याहू दुस-या(273 दशलक्ष युजर्स) क्रमांकावर असला तरी त्याला हॉटमेल आणि जी-मेलची जबरदस्त स्पर्धा आहे. त्यामुळेच तब्बल पाच वर्षांनंतर याहूने बदल केले आहेत. इ-मेल सेवा देणा-यामध्ये हॉटमेल 362 दशलक्ष युजर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर जी-मेल 193 दशलक्ष युजर्ससह तिस-या क्रमांकावर आहे.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP