Friday, October 30, 2009

टास्क बार तुमच्या नावावर

संगणकामध्ये एखाद्या फाइलला किंवा फोल्डरला आपल्याला हवं ते नाव देता येतं. मात्र जर तुमच्या संगणकाच्या टास्कबारवर आपल्या आवडीनुसार एखादं नाव लिहायचं असेल तर? अशक्य वाटतंय ना? पण हे अगदी सहज शक्य आहे. विंडोच्या टास्कबारवर तुम्ही हवं ते नाव लिहू शकता. यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नाही फक्त एक ट्रिक करावी लागेल.

Start>>settings>>Control Panel

या क्रमाने जा. Control Panel ¸f²¹fZ Regional and Language Options या फाइलवर क्लिक करा. ही फाईल ओपन होताच तिथे तुम्हाला Regional Options, Languages, Advanced हे तीन पर्याय दिसतील. त्यातील Customize या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Customize Regional Options ही वेगळी विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये Number, Currency, Time आणि Date हे पर्याय दिसतील. त्यातील Time क्लिक करा. Time विंडोमध्ये AM symbol आणि PM symbol हे पर्याय दिसतील. या पर्यायासमोर हे AM, PM आधीचे पर्याय असतील. तेथे क्लिक करून तुम्ही तुमचे नाव अथवा तुम्हाला हवा तो मजकूर लिहू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी बारा शब्दांपेक्षा अधिक शब्दांचा वापर करता येणार नाही. हवं ते नाव लिहिल्यानंतर केलेले बदल Save करण्यास विसरू नका.

Friday, October 23, 2009

इंटरेस्टिंग चॅट विंडो

इंटरनेटबरोबर गुगल हे समीकरण कधी अस्तित्वात आले आणि कधी ते सर्वमान्य झाले याचा शोध न घेतलेला बरा. गुगल आणि त्यांच्या इतर सेवा इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की जगातील इंटरनेट वापरणारा प्रत्येक जण हा गुगलीयन झाला आहे. काही माहिती हवी असेल तर गुगल सर्च, दुस-या कोणत्या तरी ई-मेलची सेवा देणा-या कंपनीचा ई-मेल आयडी असतानाही तुमच्यापैकी अनेकांनी जी-मेलचा ई-मेल आयडी ओपन केला. गुगल इमेज, न्यूज, मॅप, ग्रूप, ब्लॉगर अशा अनेक सेवा गुगल देते.(गुगलच्या काही गुपिताविषयी नंतर कधी तरी) गुगलच्या या सर्व सेवांचा वापर करणारे आम्ही-तुम्ही गुगिलीयन्स आहोत. हे सदर सुरू करताना सुरु वात कोठून करावी, असा प्रश्न होता. (याचे उत्तर मात्र गुगलने शोधून दिले नाही) सध्या गुगलच्या काही सेवांमध्ये जी-टॉकचा वापर आपण सर्व जण करतो. कारण ऑनलाइन राहणे हा तर आपला धर्मच! म्हणूनच जी-टॅकवर चॅट करताना जी टॉकमध्ये आपण चॅट करत असतो तेव्हा जी चॅट विंडो ओपन होते तिची background पांढरी असते. जर त्या background च्या ठिकाणी आपल्याला हवा तो फोटो टाकता आला तर..

जी मेल वापरताना गुगलने दिलेल्या काही background आपण मेल आयडीसाठी वापरतो त्याप्रमाणेच जी-टॉकसाठीही background वापरता येते. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हवा तो फोटो background साठी निवडता येतो. तोही फुकटात. यासाठी तुम्हाला My Theme हा प्रोगॅम डाऊनलोड करून घ्यावा लागेल. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. http://www.mediafire.com/download.php?2jyeztmivzw

हे वेब पेज ओपन होताच You requested : My Theme.exe(936.62 KB) ही फाइल डाउनलोड करून घेण्याविषयीचा मेसेज दिसेल. त्याच्या खालील Click here to start download.. ला क्लिक करा. ही फाइल तुमच्या संगणकाच्या डेस्कटॉपवर सेव्ह होईल. त्यानंतर तुम्ही सेव्ह केलेली फाइल ओपन करा. त्यामधील EXT फाइल रन केल्यानंतर DaSh फाइल तुमच्या संगणकाच्या Start>Programs या ठिकाणी सेव्ह होईल. आता तुमचे जी-टॅक ओपन करा त्यामधील settings¸ मध्ये Appearance >Chat Theme> My Themeहा पर्याय दिसू लागेल. आता Star ->all programs ->dash my theme-> click change background या क्रमाने जा. या फाइलमधील गुगलने दिलेले चार फोटो तुम्हाला दिसतील. त्यातील कोणताही एक फोटो निवडा किंवा तुम्हाला जो फोटो तुमच्या जी- टॉक चॅट विंडो मागे हवा आहे, तो फोटो या फाइल मध्ये टाका. फोटोची निवड करु न ओके बटन दाबा. आता जी-टॅक ओपन करा व पुन्हा त्यातील Setting ¸ मध्ये Appearance> Chat Theme >My Themeक्रमाने जा. आणि ओके क्लिक करून साइन आऊट करु न पुन्हा साइन इन करा. आत्ता तुम्ही तुमच्या आवडत्या मित्रांबरोबर तुमच्या इंटरेस्टिंग चॅट विडोसह चॅट करा.

Saturday, October 10, 2009

गुगलचे नवे ऑनलाइन न्यूज रीडर


गुगलने फास्ट फ्लिप या न्यूज रीडरमध्ये राजकारण, अर्थजगत, क्रिडा, विज्ञान-तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य, पर्यटन, अग्रलेख अशा विभागात वर्गीकरण केले आहे. बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, फॉरेन पॉलिसी, बिझनेस विक, न्यूजवीक, नॅशनल रिव्ह्यू ऑनलाइन या वृत्तपत्राबरोबरच अटलांटिक, बिझनेस वीक, कॉस्मोपॉलिटन, एले, मॅरी क्लेरी आदी मासिकांमधील लेख गुगलने फास्ट फ्लिपवर उपलब्ध करुन दिले आहेत.

माध्यमे ऑनलाइन झाली असली तरी या ऑनलाइन माध्यमामधील एखादा मजकूर शोधून काढण्यासाठी बराच वेळ सर्च करावे लागते. जगातील काही महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये आपल्या विषयाशी संबंधीत लेख अथवा वृत्त वाचायचे असेल तर त्या वृत्तपत्राच्या इंटरनेट आवृत्तीवर जाऊन शोधण्याचे काम करावे लागते. जगातील अनेक ऑनलाइन वाचकांच्या या सर्च करण्याचा त्रास आणि वेळ वाचवण्याचे काम गुगलच्या फास्ट फ्लिपने केले आहे.

गुगलमार्फत एकापेक्षा एक अशी नवनवीन संपल्पनाची निर्मिती करणा-या गुगल लॅबने गुगल फास्ट फ्लिप हे ऑनलाइन न्यूज रीडर आणले आहे. या ऑनलाइन न्यूज रीडरच्या माध्यमातून वाचक जगातील दर्जेदार वृत्तपत्रांमधील लेख, वृत्त सहज आणि सोप्या पद्धतीने वाचू शकतात. फास्ट फ्लिपवर केवळ वृत्तपत्रे नव्हे तर जगातिल सर्वोत्तम मासिके वाचण्यास मिळणार आहेत. गुगलने या फास्ट फ्लिपमध्ये राजकारण, अर्थजगत, क्रिडा, विज्ञान-तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य, पर्यटन, अग्रलेख अशा विभागात वर्गीकरण केले आहे. बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, फॉरेन पॉलिसी, बिझनेस विक, न्यूजवीक, नॅशनल रिव्ह्यू ऑनलाइन या वृत्तपत्राबरोबरच अटलांटिक, बिझनेस वीक, कॉस्मोपॉलिटन, एले, मॅरी क्लेरी आदी मासिकांमधील लेख गुगलने फास्ट फ्लिपवर उपलब्ध करुन दिले आहेत. सध्या एकूण ३९ वृत्तपत्रे आणि मासिकांचा या न्यूज रीडरमध्ये समावेश आहे.

नेटविश्वातील नवनवीन शोधांबरोबरच यूझर फेंडली गोष्टींची निर्मिती करण्यात गुगल कायम पुढे आहे. फास्ट फ्लिप या न्यूज रीडरची मांडणी आणि अतिशय सुटसुटीत असल्यमुळे प्रत्यक्षात वृत्तपत्र वाचण्याचा अनुभव या न्यूज रीडरमधून मिळतो. विषयानुसार मांडणी केल्यामुळे वाचकांना हवी असणारी माहिती सहज उपलब्ध होते. सध्या तरी अमेरिकेतील वृत्तपत्रे आणि मासिके यांच्या फास्ट फ्लिपवर समावेश असला आहे. मात्र भविष्यात जगातिल अन्य देशातील वृत्तपत्रे आणि मासिकाचा यामध्ये समावेश होणार आहे.

गुगलच्या नव्या फास्ट फ्लिप जाण्यासाठी क्लिक करा- http://fastflip.googlelabs.com/

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP