Saturday, October 10, 2009

गुगलचे नवे ऑनलाइन न्यूज रीडर


गुगलने फास्ट फ्लिप या न्यूज रीडरमध्ये राजकारण, अर्थजगत, क्रिडा, विज्ञान-तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य, पर्यटन, अग्रलेख अशा विभागात वर्गीकरण केले आहे. बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, फॉरेन पॉलिसी, बिझनेस विक, न्यूजवीक, नॅशनल रिव्ह्यू ऑनलाइन या वृत्तपत्राबरोबरच अटलांटिक, बिझनेस वीक, कॉस्मोपॉलिटन, एले, मॅरी क्लेरी आदी मासिकांमधील लेख गुगलने फास्ट फ्लिपवर उपलब्ध करुन दिले आहेत.

माध्यमे ऑनलाइन झाली असली तरी या ऑनलाइन माध्यमामधील एखादा मजकूर शोधून काढण्यासाठी बराच वेळ सर्च करावे लागते. जगातील काही महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये आपल्या विषयाशी संबंधीत लेख अथवा वृत्त वाचायचे असेल तर त्या वृत्तपत्राच्या इंटरनेट आवृत्तीवर जाऊन शोधण्याचे काम करावे लागते. जगातील अनेक ऑनलाइन वाचकांच्या या सर्च करण्याचा त्रास आणि वेळ वाचवण्याचे काम गुगलच्या फास्ट फ्लिपने केले आहे.

गुगलमार्फत एकापेक्षा एक अशी नवनवीन संपल्पनाची निर्मिती करणा-या गुगल लॅबने गुगल फास्ट फ्लिप हे ऑनलाइन न्यूज रीडर आणले आहे. या ऑनलाइन न्यूज रीडरच्या माध्यमातून वाचक जगातील दर्जेदार वृत्तपत्रांमधील लेख, वृत्त सहज आणि सोप्या पद्धतीने वाचू शकतात. फास्ट फ्लिपवर केवळ वृत्तपत्रे नव्हे तर जगातिल सर्वोत्तम मासिके वाचण्यास मिळणार आहेत. गुगलने या फास्ट फ्लिपमध्ये राजकारण, अर्थजगत, क्रिडा, विज्ञान-तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य, पर्यटन, अग्रलेख अशा विभागात वर्गीकरण केले आहे. बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, फॉरेन पॉलिसी, बिझनेस विक, न्यूजवीक, नॅशनल रिव्ह्यू ऑनलाइन या वृत्तपत्राबरोबरच अटलांटिक, बिझनेस वीक, कॉस्मोपॉलिटन, एले, मॅरी क्लेरी आदी मासिकांमधील लेख गुगलने फास्ट फ्लिपवर उपलब्ध करुन दिले आहेत. सध्या एकूण ३९ वृत्तपत्रे आणि मासिकांचा या न्यूज रीडरमध्ये समावेश आहे.

नेटविश्वातील नवनवीन शोधांबरोबरच यूझर फेंडली गोष्टींची निर्मिती करण्यात गुगल कायम पुढे आहे. फास्ट फ्लिप या न्यूज रीडरची मांडणी आणि अतिशय सुटसुटीत असल्यमुळे प्रत्यक्षात वृत्तपत्र वाचण्याचा अनुभव या न्यूज रीडरमधून मिळतो. विषयानुसार मांडणी केल्यामुळे वाचकांना हवी असणारी माहिती सहज उपलब्ध होते. सध्या तरी अमेरिकेतील वृत्तपत्रे आणि मासिके यांच्या फास्ट फ्लिपवर समावेश असला आहे. मात्र भविष्यात जगातिल अन्य देशातील वृत्तपत्रे आणि मासिकाचा यामध्ये समावेश होणार आहे.

गुगलच्या नव्या फास्ट फ्लिप जाण्यासाठी क्लिक करा- http://fastflip.googlelabs.com/

5 comments:

Anonymous April 2, 2010 at 5:08 PM  

आभार ! आम्हाला इतकी छान माहिती दिल्याबद्दल, आजकालचा युगात याची फार गरज आहे,जगातील सर्व माहिती एकत्र मिळणार आहे ही किती चांगली गोष्ट आहे त्याबद्दल आभारी आहोत.

Anonymous April 2, 2010 at 5:09 PM  

गूगल ने kelela हा prayatna nakkicch vakhannya joga aahe.

tari asha nayva mahiti baddal prahaar che abhinandan.

bhavishyat amhala thodya scince related kaahi mahiti milali tar nakki update kara ही vinanti.

Anonymous April 2, 2010 at 5:10 PM  

आपकी ये सुविधा बहोत ही अची और लाजवाब है. आपको बहोत बहोत बधाई. ...........समाधान हेंद्रे, सतारा.

Anonymous April 2, 2010 at 5:10 PM  

आभार ! आम्हाला इतकी छान माहिती दिल्याबद्दल

Anonymous April 2, 2010 at 5:11 PM  

the information given on the blog is really helpfull

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP