Monday, April 18, 2011

जी-मेलमध्ये भरा नवे रंग,नवे फोटो

जी-मेल अधिक आकर्षक दिसण्यासाठी गुगलने युझरसाठी काही थीम दिल्या आहेत. मात्र त्याच त्याच थीम वापरण्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर गुगलने तुमच्यासाठी नव्या थीम दिल्या आहे. अर्थात या थीम तुमच्या तुम्ही तयार करु शकता. अगदी तुमचा फोटोही थीम म्हणून तुम्ही वापरु शकता.

जी-मेलमधील या नव्या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या मेलमध्ये हवे ते रंग भरु शकता. जी-मेलमध्ये नवे रंग भरण्यासाठी जी-मेलच्या Settings मधून  Themesजा. तेथे सर्व थीम संपल्यानंतर Create your own theme यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील विडो दिसेल…

वर दाखवल्या प्रमाणे तुमच्या जी-मेलच्या प्रत्येक विभागात हवा तो रंग देऊ शकता. तसेच Main Background आणि Footer मध्ये तुम्हला हवा तो फोटो add करु शकता. याआधी जी-मेल वापरताना गुगलच्या होम पेजवर हवा तो फोटो टाकण्याची सोय गुगलने दिली होती. (अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा) त्याच प्रमाणे आताही जी-मेलमध्येही हवा तो रंग आणि फोटो यापुढे देता येणे शक्य आहे.

जी-मेलच्या युझर्सकडून नव्या थीम देण्याची मागणी केली जात होती. मात्र गुगलने युझर्सना नव्या थीम देण्यापेक्षा हव्या त्या थीम तयार करण्याचे स्वतंत्र्य दिले आहे. 



Friday, April 15, 2011

चार्ली वी मिस यू…


विनोदी ढंगाच्या मूकअभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चार्ली चॅप्लिन (चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन,ज्युनियर) यांचा आज 122 वा जन्मदिवस, त्यानिमित्ताने गुगलने आपल्या होम पेजवरील लोगो अर्थात गुगल डुडल बदल केला आहे.
गुगलचे प्रत्येक डुडल हा चर्चेचा विषय असतो. चित्र, ग्राफिक्स्, फ्लॅशच्या मदतीने तयार केलेले डुडल आतापर्यंत पाहिले होते. चार्लीसाठी मात्र गुगलने वेगळाच फंडा वापरला आहे. ज्यासाठी चार्ली प्रसिद्ध होता. त्या मूकअभिनयाचा वापर करुन गुगलने एक व्हिडीओच गुगल डुडल म्हणून वापरला आहे.
गुगलने तयार केलेला व्हिडीओ पहा….

Friday, April 1, 2011

‘जी-मेल मोशन’ वापरले का?


ई-मेल सेवा पुरवण्यामध्ये सध्या लोकप्रिय असलेल्या गुगलच्या जी-मेलने एक एप्रिल रोजी एक नवी सेवा लाँच करण्याची घोषणा केली आहे.  ‘जी-मेल मोशन’ असे या सेवेचे नाव आहे. याव्दारे जी-मेलचा वापर की-बार्ड आणि माउस शिवाय  करता येण शक्य होणार आहे. जी-मेल मोशनमुळे युझरला केवळ इशाऱ्याच्या (जेस्चर्स) मदतीने ई-मेल पाठवता आणि वाचता येणार आहे.
1874 मध्ये सर्वप्रथम Qwerty की-बोर्डची निर्मिती झाली. त्यानंतर 1963 मध्ये जगाला माउस शोध लागला. आणखी 50 वर्षांनी उच्च क्षमतेचे माक्रोप्रोसेसर आणि हाय क्षमतेचे वेबकॅम तसेच स्पेशल ट्रॅकिंग तंत्रज्ञान आले असेल. असे झाले तरीही आपण संगणकाशी अथवा अन्य डिव्हाइस हाताळण्यासाठी जुने तंत्रज्ञान वापरणार का? असा प्रश्न गुगलने विचारला आहे.
केवळ प्रश्न विचारुन गुगल थांबले नाही तर त्यावर त्यांनी उत्तर शोधले आहे. भविष्यातील संगणक कसा असेल यांचा पहिला प्रयत्न गुगलने जी-मेल मोशनच्या व्दारे केला आहे. मोशमच्या मदतीने जी-मेलव्दारे मेल चेक करणे आणि त्याला उत्तर पाठवणे या गोष्टी युझर इशाऱ्याच्या मदतीने करु शकेल.
जी-मेल मोशनचा वापर करण्यासाठी संगणकामध्ये इन-बिल्ट वेबकॅम आवश्यक आहे. जी-मेलच्या Settings पेजव्दारे एकदा का तुम्ही मोशन पर्याय अॅक्टीवर की त्यानंतर जेव्हा तुम्ही जी-मेल ओपन कराल तेव्हा आपोआप spacial tracking algorithm तुमची ओळख करुन घेईल.
जी-मेल मोशनची निर्मिती करताना गुगलने शारीरीक हलचालींचा अभ्यास करणाऱ्या एक्स्पर्टच्या मदत घेतली आहे.
विशेष म्हणेजे जी-मेल मोशनची चाचणी गेले काही महिन्यांपासून गुगलच्या कर्मचाऱ्याकडून केली जात आहे. गुगलमधील कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि सूचना याव्दारे जी-मेल मोशनमध्ये आणखी बदल केले जात आहेत. कर्मचाऱ्यांकडून वापरण्यात येणाऱ्या जी-मेल मोशनच्या दरम्यान गुगलने एक अहवाल तयार केला. या अहवालानुसार मोशनच्या वापरामुळे email compositionचा वेग 14 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. तसेच युझरचा इनबॉक्समधील वेळेत सरासरी 12 टक्क्यांची घट झाल्याचे आढळून आले.




जी-मेल मोशनचा वापर करण्यासाठी गुलल क्रोमची अद्यावत आवृत्ती अथवा फायर फॉक्सची 3.5 + आवृत्तीसह वेबकॅम असणे गरजेचे आहे. जी-मेलमधील ही सेवा सर्वांसाठी मोफत असणार आहे. अद्याप ही सेवा सर्वांसाठी खुली झाली नसली तरी काही दिवसांतच ती सुरु करणार असल्याचे गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगवर म्हटले आहे.
जी-मेल मोशनचा उपयोग सतत संगणकासमोर बसून काम करणाऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे.
वरील लेख वाचून झाल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील किंवा गुगलच्या संबंधीत पेजवर जाण्याआधी खालील मजकूर नक्की वाचा…









एप्रिल फूल
आज तारीख कोणती आहे माहित आहे का? एक एप्रिल, तर जी-मेल मोशन वैगरे काही नसून गुगलने केलेला हा एक एप्रिल फूल होता. जी-मेल मोशमच्या पेजवर जेव्हा  तुम्ही Try gmail Motion वर क्लिक करता. तेव्हा तुम्हाला एप्रिल फूलचा मेसेज दिसेल.
एप्रिल फूल करण्याची गुगलची ही सवय 2000 पासूनची आहे. अर्थात गुगलने एक एप्रिल रोजी अनेक लोकांना जी-मेल मोशनच्या निमित्ताने फसवले. बर नाही म्हटले तरी गुललचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. कारण या संदर्भातील व्हिडिओ तब्बल 13 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मात्र एक एप्रिल रोजी गुगलने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यावेळी त्या लोकांना फूल बनवण्याचा प्रयत्न आहे असे वाटले होते. अशा घोषणेपैकी एक म्हणजे 2004मध्ये करण्यात आलेली जी-मेल सेवेची घोषणा होय.
गुगलने 2000मध्ये MentalPlexची घोषणा केली होती. त्यानंतर गुगलने PigeonRank, Google Gulp, Gmail Paper आणि Google TiSP अशा सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.
गुगलच्या या एप्रिल फूलच्या अधिकृत पानावर जाण्यासाठी येथे किल्क करा…



  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP