Friday, June 18, 2010

क्रिएट युअर होमपेज

इंटरनेटवरील कोणत्याही माहितीसाठी प्रत्येक जण गुगलची धाव घेतो. त्यात आजकाल प्रत्येकाचा स्वत:चं होमपेज करण्याकडे कल असतो. हे ओळखूनच गुगलने युझरसाठी होमपेज तयार करायची सोय केली आहे.

गुगल होमपेज ओपन केल्यावर पांढ-या background वर नेहमी पाच वेगवेगळ्या रंगात दिसणारं गुगल ही इंग्रजीमधील अक्षरं किंवा अधूनमधून गुगलकडून तयार केले जाणारे लोगो याशिवाय कोणालाही कोणताही बदल करता येत नाहीत. आत्ता मात्र गुगलच्या होमपेजवर तुमच्या आवडत्या फोटोला जागा मिळणार आहे. गुगलने त्यांच्या युझरसाठी तशी सोय केली आहे. गुगलच्या होमपेजच्या background वर आपल्याला हवा असलेला कोणताही फोटो लावता येणार आहे. म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवर तुमचा आवडीचा फोटो बघायला मिळणार आहे. मात्र यासाठी तुमचं जी-मेल अकाऊंट असणं गरजेचं आहे. कारण ही सोय तुमचं जी-मेल अकाऊंट सुरू असेल तोपर्यंतच असते. एकदा का तुम्ही लॉग आऊट झालात की पुन्हा गुगलचं जुनं होमपेज दिसेल.

गुगलच्या भारतीय (www.google.co.in) होमपेजच्या डाव्या बाजूच्या खालच्या कोप-यात Sign in to see your background image javascript:void(0) असा पर्याय दिसेल. या ठिकाणी जी-मेल आयडीने लॉग इन केल्यानंतर Change background image हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून गुगलच्या होमपेजसाठी Picasa web photos, Public gallery, Editor’s picks अथवा तुमच्या संगणकातील हवा तो फोटो तुम्ही निवडू शकता.




एकदा का तुम्ही लॉग इन करून फोटो सेट केला की कोणत्याही संगणकावरून जी-मेलला लॉगइन केल्यावर पूर्वी निवडलेला फोटो गुगलच्या होमपेजवर दिसेल. गुगलच्या या होमपेजवरून तुम्ही सर्च केल्यानंतर ओपन होणा-या विंडोजची background मात्र पांढरीच राहते.



गुगलप्रमाणेच होमपेजवर आपल्याला हवा असलेला फोटो आणि स्वत:चं नाव लिहिण्याची सोय इतरही काही वेबसाइटनी दिली आहे. मात्र त्यासाठी संबंधी वेबसाइट तुमच्या संगणकावर Set as homepage म्हणून सेव्ह करावी लागते. www.shinysearch.com, www.sleeksearch.com, www.blingmysearch.com या वेबसाइट्सवरून तुम्ही वेगवेगळे वॉलपेपर होमपेज म्हणून निवडू शकता. त्याचप्रमाणे गुगलच्या लोगोऐवजी स्वत:चं नावही लिहू शकता. मात्र या वेबसाइटवरून सर्च केल्यानंतर ओपन होणारी विंडो लहान आकारात दिसते.

4 comments:

Anonymous June 26, 2010 at 4:45 PM  

great information.

Anonymous June 26, 2010 at 4:46 PM  

rohan

Unknown June 26, 2010 at 5:08 PM  

I USED THE FEATURE ITS BEAUTIFUL...

THANX FOR THIS WONDERFUL INFORMAITON.

Anonymous June 26, 2010 at 5:19 PM  

GOOD INFORMATION

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP