Friday, January 1, 2010

२०१० रॉकिंग वेबसाइट्स

आज नववर्षातील पहिला दिवस. २००९ सालाला निरोप देण्यासाठी ज्यांनी थर्टी फर्स्ट पार्टीजमध्ये खूप धम्माल केली त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीसा उशिरानेच उगवेल. तर पहाटे लवकर उठणं, व्यायाम करणं अशा स्वरूपाचे संकल्प केलेल्यांसाठी आजची सकाळ थोडी लवकर सुरू झाली असेल.


नव्या वर्षात जशी नव्या संकल्पांची अमलबजावणी सुरू होते, तसंच सरलेल्या वर्षाचं पुनरावलोकनही केलं जातं. नेट विश्वातही गेल्या वर्षभरात विविध घटना झाल्या. काही नव्या गोष्टींची सुरुवात २००९ मध्ये झाली आहे. प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची नोंद घेतली जाते आणि त्यांना पुरस्कार दिले जातात, त्याचप्रमाणे इंटरनेटच्या विश्वातही प्रत्येक संकेतस्थळाची कामगिरी तपासली जाते. उत्कृष्ट संकेतस्थळांची यादी जाहीर केली जाते.


गेली काही वर्ष नेटविश्वात गाजलेल्या संकेतस्थळांमध्ये फेसबुक, ट्विटर, हुलू या संकेतस्थळांचा समावेश होता. २०१०मध्ये जी संकेतस्थळं त्यांच्यावर असलेल्या माहितीमुळे नेटविश्वात आघाडीवर राहण्याची शक्यता आहे त्यांची इथे थोडक्यात यादी दिली आहे. या संकेतस्थळांवर गेल्यास तुम्हाला कुठे थिम्स, कुठे ऑर्कुट, फेसबुक यासारख्या कम्युनिटी साईट्स पाहायला मिळतील. इतकंच नव्हे तर दैनंदिन जीवनातील घडामोंडींविषयी काही माहिती, टी.व्ही.वरच्या एखाद्या मालिकेचा एखादा एपिसोड किंवा कोणत्याही प्रकारची आवडती गाणी यांचा मनमुराद आनंद लुटू शकता. त्यावरील माहितीच्या खजिन्याचा उपयोग करून घेऊ शकता. आगामी वर्षात वेगाने वाटचाल करू शकतील अशा संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे.


संकेतस्थळांची यादी


www.tv.com
www.boxee.tv
www.CrackBerry.com
www.loopt.com
www.blip.fm
www.power.com
www.tweetag.com
www.hi5.com
www.tripit.com
www.qik.com

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP