Saturday, March 12, 2011

गुगलचे जपान पर्सन फाइन्डर

जपानच्या पूर्वोत्तर किनारपट्टीजवळ झालेल्या भूकंपानंतर गुगलने एक ऑनलाइन टूल सुरु केले आहे. पर्सन फाइन्डर असे या टूलचे नाव आहे. या टूलच्या मदतीने भूकंप आणि त्सुनामीमुळे प्रभावीत झालेल्या व्यक्तींचा शोध घेता येतो. तसेच त्यांच्या संदर्भातील माहिती मिळवता येते.




या टूलमध्ये व्यक्तींचा शोध घेण्याबरोबर ज्याचा शोध लागला आहे त्यांची ही माहिती मिळू शकते. ही सेवा जपानी भाषेसह इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे. भूकंपानंतर मोबाईल आणि फोन सेवा ठप्प झाल्यामुळे गुगलच्या या टूलच्या माध्यमातून व्यक्तींचा शोध घेणे शक्य आहे.


गुगलच्या या सेवेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून २४ तासांमध्ये तब्बल २२ हजार ४०० लोकांचा शोध घेतला गेला आहे.




गुगलने हे टूल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहे. व्यक्ती, बातम्या देणाऱ्या वेबसाइट, अन्य संस्था आणि संघटना यांना आपल्या वेबसाइट,ब्लॉगवर गुगलचे हे टूल Add करता येते. हे टूल मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.


हैतीमध्ये जानेवारी २०१०मध्ये झालेल्या भूकंपानंतर गुगलने अशा प्रकारची सेवा सुरु केली होती. इतकच नाही तर जपानमध्ये भूकंप झाल्यानंतर गुगलने आपल्या होम पेजवर त्सुनामी अलर्ट दिला होता.





त्यानंतर गुललने होमपेजवर जपानवर आलेल्या संकटासंदर्भातील सर्व माहिती देणारे एक स्वतंत्र वेबपेज (Resources) तयार केले आहे. या पेजवर अलर्ट, बातम्या, व्हिडिओ, रियल टाईम अपडेट अशा सर्व माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती जपानी भाषेबरोबर इंग्रजीमध्ये ही उपलब्ध आहे.


जपानमधील भूकंप आणि त्सुनामीसंदर्भातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP