‘आलम आरा’ची ८० वर्षे
‘आलम आरा’ हा चित्रपट १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय बोलपट होय. ‘आलम आरा’ केवळ पहिला भारतीय बोलपट नव्हता तर तो पहिला संगीतपट देखील होता. त्यामुळे भारतीय चित्रपटात बोलपटाबरोबरच संगीतची सुरुवात या चित्रपटाने केली. या चित्रपटातील ”दे दे खुदा के नाम पर” हे गाणे खुप गाजले होते. दिग्दर्शक ‘अर्देशिर इराणी’ यांचा हा चित्रपटा पाहण्यासाठी इतकी गर्दी होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मदत द्यावी लागली होती.
मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमा हॉलमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज ८० वर्षे झाली आहेत. या चित्रपटामुळे भारतीयांचे सामाजिक, संस्कृतीक आणि वैज्ञानिक जग बदलण्यास सुरुवात झाली. भारतीय चित्रपटात इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाच्या ८० व्या वर्षी गुगलने आपल्या होम पेजवर लोगो तयार केला आहे…
आलम आरा चित्रपटाविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments:
Post a Comment