Friday, November 6, 2009

बी फंकी..

आज मल्टीमीडियाच्या जमान्यात ऑर्कुट, फेसबुक अशा सोशल नेटवर्किंग साइट्स हाताळणं अगदीच कॉमन झालंय. फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन हे ज्यांना कळतं ते स्मार्ट क्लिक करतातच. या नेटवर्कवरील स्वत:च्या प्रोफाइलसाठी प्रत्येकालाच सर्वाहून अतिशय वेगळा फोटो हवा असतो. अगदी आपला स्वत:चा फोटो वापरायचा झाला तरी तोही सॉलिड असावा, अशी इच्छा असते. कारण तुमच्या प्रोफाइलला भेट देणारी व्यक्ती प्रोफाइलवर पहिल्यांदा फोटोच बघते. अर्थात, आपणही बरेचदा फोटो पाहूनच इतरांच्या प्रोफाइलमध्ये डोकावत असतो. फोटो, मग तो आपल्या बालपणाचा असो की तरुणपणीचा, अथवा अनेकांना फॉर्वड होत, होत आपल्या मेल बॉक्समध्ये आलेला आपण तो आवर्जून पाहतो.

यातल्या आपल्या फोटोंवर काही तरी करामती कराव्यात, अशा इच्छा आपल्याला अनेकदा होतात. फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे शक्य असतं. पण कधी हे सॉफ्टवेअर उपलब्ध नसतं तर कधी आपले प्रयत्न कमी पडतात. ते सॉफ्टवेअर कसं वापरावं, याचं ज्ञान आपल्याला असेलच असंही काही कारण नसतं. पण तरीही आपल्या स्वत:च्या फोटोंना थोडा हटके आणि फंकी लूक द्यायचा असेल तर आपल्याला बी फंकीवर स्मार्ट क्लिक करावा लागेल.

या संबंधांतील कोणत्याही सॉफ्टवेअरचं ज्ञान नसताना फोटोवर भन्नाट इफेक्ट्स करण्याची सोय बी फंकी या साइटवर आहे. मुख्य पाच प्रकारांत (त्यातही अनेक उपप्रकार आहेत) आणि इतर २१ प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोंना इफेक्ट्स देऊ शकता. यासाठी पैसे मोजण्याची गरज नाही. अर्थात, बी फंकीने नव्याने सुरू केलेल्या बी फंकी प्लसया सेवेसाठी मात्र पैसे मोजावे लागतात. पण आपल्याला खर्च करायची आवश्यकता नाही. कारण या साइटवर पैसे न मोजताही अनेक इफेक्ट्स उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे बी फंकीवर तुम्ही स्वत:चं account ओपन करू शकता. तुम्ही ज्या फोटवर विविध इफेक्ट्स केले आहेत, ते तुमच्या प्रोफाइलमध्ये सेव्ह करू शकता आणि तुमच्या मित्रांनाही पाठवू शकता.

फोटोवर केलेले इफेक्ट्स t-shirt, postage, mug, card, postcard, keychain, sticker, magnet यावर प्रिंट करून घेऊ शकता. फक्त त्यासाठी थोडे पैसे मोजण्याची तयारी हवी. अर्थात, हे इफेक्ट्स इतके भन्नाट आहेत की, या पद्धतीने स्वत:चे फोटो आपल्या आवडत्या वस्तूवर प्रिंट करून घेताना थोडे पैसे खर्च करणं तुम्हाला फारसं अवघड वाटणार नाही.

या साइटवरीली explorer विभागात बी फंकीच्या निर्मात्यांनी काही विशेष इफेक्ट्स वापरलेले फोटो आहेत. ते तुम्ही तुमच्या प्रोफाइलसाठी वापरू शकता. या विभागातील फोटो तुम्ही तुमच्या account मध्ये सेव्हही करू शकता.

We’re changing the face of the internet. And the faces of those who surf it.

बी फंकीच्या सहा तरुण निर्मात्यांनी या शब्दांत आपली ओळख करून दिली आहे. या ब्रिदवाक्याचा पुरेपूर अनुभव ही साइट वापरताना होतो. तेव्हा तुमचं फस्ट इंप्रेशन फंकी असावं, असं वाटत असेल तर स्मार्ट क्लिक करा, http://www.befunky.com/

2 comments:

Anonymous April 2, 2010 at 5:15 PM  

Hi thanx for the another web information regarding internet, ur tips really getting helpful to me as a user.

keep it up buddy...

have a great day.

Anonymous April 2, 2010 at 5:16 PM  

hi jay
thank you so much for above information regarding internet & ur tips are helpful to my all friends & colligs.
have a nice day,

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP