हटके वॉलपेपर..
संगणक आणि इंटरनेटचा वापर आता केवळ शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. शहराबरोबरच खेडेगावातही संगणक आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक इंटरनेट कॅफेमधून इंटरनेटवर काम करताना दिसणारी शहर आणि गावातील मंडळी तासनतास computer वर काय करत असतात, असा प्रश्न अनेक वेळा आपल्याला पडतो. आपणही त्यापैकीच एक आहोत. Computer वर मेल चेक करणे किंवा आपल्या संगणकाच्या dsktop साठी इतरांपेक्षा वेगळे, जरा हटके असे wallpaper सर्च करणे, हा कित्येकांचा एक छंदच आहे. इंटरनेटचा अधिकाधिक उपयोग आपण wallpaper च्या शोधासाठीच करत असल्याची माहिती एका online संशोधनातूनच नुकतीच पुढे आली आहे.
तुमच्या संगणकाच्या desktop वर कोणकोणते wallpaper आहेत, याकडे अनेकांचं स्वाभाविकपणे लक्ष जातं. त्यामुळेच आपण आपल्या desktop वरचा wallpaper इतरांपेक्षा वेगळा ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तुमच्या संगणकाच्या desktop वर हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी आतापर्यंत वर्णी लावली असेल. पण ही अतिशय कॉमन गोष्ट झाली आहे. काही वेळा आपण जे फोटो wallpaper म्हणून download करतो, त्यावर अनेकदा copy right चा शिक्का असतो. पण जर तुम्हाला काही वेगळे wallpaper हवे असतील तर http://simpledesktop.com या संकेतस्थळावर स्मार्ट क्लिक करा. इंटरनेटच्या मोठय़ा पसाऱ्यात तुमच्या desktop वर काही वेगळे wallpaper मिळवण्यासाठी या संकेतस्थळासारखा उत्तम मार्ग तुमच्याकडे आहे.
या संकेतस्थळावर wallpaper चे काही नमुने तयार करून दाखवले आहेत. हे wallpaper तुम्ही मोफत save करू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारची log in करण्याची गरज भासत नाही. वेगवेगळे wallpaper लावून संगणकाचा desktop इतरांपेक्षा वेगळा ठेवण्यासाठी हा क्लिक तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल. इतकंच नव्हे; तर या संकेतस्थळावर तुम्ही स्वत:ही wallpaper तयार करू शकता. तुम्ही पाठवलेले wallpaper तुमच्या नावाने या संकेतस्थळावर दिसतील. त्यासाठीच्या काही सूचना या संकेतस्थळावर दिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही हे सहज करू शकता.