Friday, October 29, 2010

Wikipedia Meetupसाठी जिमी वॉल्स मुंबईत

इंटरनेटवरील माहितीवर कुणाचा एकाचा अधिकार असता कामा नये तसेच तो सर्वांना मोफत उपलब्ध झाले पहिजे या उद्देशाने सुरू झालेल्या विकिपीडिया या संकेतस्थळावर सक्रिय सहभाग घेणा-यांचा मुंबईतला तिसरा मेळावा रविवारी सोफिया महाविद्यालयात होणार आहे. या मेळाव्यासाठी विकीपीडियाचे संस्थापक जिमी वॉल्स हेदेखील येणार आहेत!

विकिपीडियाचा वापर करून न थांबता तेथील मजकूर समृद्ध करणारे आणि विकीपीडियाच्या अन्य उपक्रमांतही सहभाग घेणारे (विकिपीडियन्स आणि विकिमीडियन्स) मुंबईत अनेकजण आहेत. पण यापूर्वीच्या दोन बैठका वांद्रे आणि खारघर येथे झाल्या, तेव्हा वांद्रय़ात 13, आणि खारघरला अवघे 10जण आले! तिस-या मेळाव्याला जिमी वॉल्स येणार असल्याने 800 जण बसतील एवढ्या सभागृहात हा मेळावा होत आहे.

या भेटी दरम्यान चर्चा करण्यासाठी निश्चित असा कार्यक्रम ठरवलेला नाही. सहभागी होणा-यांनाही मतप्रदर्शनाची, व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. जिमी वॉल्स विकिपीडियाच्या विस्ताराबद्दल, तसेच प्रत्यक्षात विकिपीडियाचे काम कसे चालते. भारतातील इंटरनेट यूजर्स माहितीच्या या सर्वांत मोठ्या लिंकचा अद्याप पुरेसा वापर का करत नाहीत अशा मुद्दयांवरही बोलतील, अशी अपेक्षा आहे.

ब्रीच कँडीच्या सोफिया महाविद्यालयातील `सोफिया भवन हॉल'मध्ये सायंकाळी सहा वाजता होणा-या या मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क नाही. `विकिपीडिया'चा ज्ञानमार्ग रुंद करू शकणारे सर्वजण येथे येऊ शकतात!



मेलसोबत डॉक्युमेंटही सर्च करा...

इंटरनेटवर सर्च करताना सापडलेल्या अनेक गोष्टी किंवा आवश्यक वर्ड फाइल, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेन्टेशन्स ऑनलाइन सेव्ह करून ठेवण्यासाठी गुगल डॉक्युमेंटचा वापर केला जातो. एखादी गोष्ट ऑनलाइन सेव्ह करून ठेवण्यासाठी गुगलची ही सेवा उपयुक्त ठरते. गुगल डॉक्युमेंट जी-मेलसह आणि स्वतंत्रही वापरता येतं.


जी-मेलमध्ये इनबॉक्स आणि आऊटबॉक्समधील मेल सर्च करण्यासाठी मेल सर्च हा Default search पर्याय दिला आहे. मात्र जी-मेल सोबत गुगल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह केलेली एखादी फाइल शोधायची असेल तर स्वतंत्रपणे गुगल डॉक्युमेंट ओपन करावे लागत होतं.

आता मात्र गुगलने यावर उपाय सुचवला आहे. जी-मेलचा वापर करतानाच तुम्ही गुगल डॉक्युमेंटमधील कोणतीही फाईल शोधू शकता. यासाठी जी-मेलच्या Settings¸ध्ये Labs options¸धील Apps Search या पर्यायांचा वापर करा. त्यानंतर झालेला बदल सेव्ह करा.




जी-मेलच्या मेल सर्चबरोबरच डॉक्युमेंट सर्चचा एक नवा पर्याय दिसेल. या ठिकाणी मेल सोबत डॉक्युमेंटमधील फाइल शोधणं कमी वेळात शक्य होतं. जी-मेलचा वापर करताना वेळ वाचवणारा हा स्मार्ट बदल तुम्ही नक्की कराल.

जी-मेलसोबत गुगल डॉक्युमेंटचा वापर करणा-यांसाठी हा पर्याय नक्कीच उपयुक्त आहे.


Thursday, October 21, 2010

शेड्युल युअर मेल व्हाया बुमरॅँग

आपल्या मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस किंवा ऑफिसमधील एखाद्या मिटिंगची वेळ अथवा विशिष्ट वेळेला अत्यंत महत्त्वाची सूचना देणारा मेल पाठवायचा असतो. कित्येकदा असा मेल पाठवण्यासाठी नेमक्या त्या वेळेला आपल्याजवळ संगणक किंवा लॅपटॉप नसतो. अशा वेळी आपली खूप पंचाईत होते. त्यावेळी जवळच्या एखाद्या सायबरचा आधार घेतला जातो. मात्र कधी कधी आपण सायबर कॅफे शोधण्याच्यादेखील तयारीत नसतो. अशा वेळी आपले महत्त्वाचे मेल त्या दिवशी त्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचतील असा प्रश्न आपल्याला पडतो. अगदीच महत्त्वाची मेल असेल तर ती आपण जवळच्या मित्राला किंवा घरातल्या कोणाला तरी करायला सांगितलं जातं.

नियोजित मेल निश्चित तारखेला किंवा वेळेला पाठवण्याची सोय सध्या जी-मेलमध्ये नाही. आणि तशी सोय उबलब्ध होण्याची शक्यता नजीकच्या काळातही दिसत नाही. असं असलं तरी Boomerang द्वारे तुम्ही क्रोम आणि फायरफॉक्स ब्राउझरच्या माध्यमातून अशा प्रकारे मेल schedule करू शकता. असे ठरावीक वेळेचे महत्त्व असलेले मेल पाठवण्यासाठीBoomerang चा वापर करता येईल. हे क्रोममधीली extension तर फायरफॉक्समधील ad-on असून या द्वारे तुम्ही तुम्हाला पाठवायचे मेल schedule करू शकता.

गुगल क्रोमसाठी आणी फायरफॉक्समध्ये Boomerangextension आणि ad-on तुम्ही या लिंकद्वारे डाऊनलोड करू घेऊ शकता. त्यानंतर गुगल क्रोमद्वारे जी-मेल आयडी ओपन करा.

मेलच्या composemailमध्ये सर्वात वर send या पर्यायानंतर send later हा पर्याय दिसेल. तुम्हाला ज्यांना मेल पाठवायचा आहे. त्यांचा ई-मेल आयडी आणि मजकूर लिहून. हा मेल म्हणून सेव्ह करा. त्यानंतर send later या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला केव्हा मेल पाठवायचा आहे. त्या संदर्भात काही पर्याय दिले आहेत. या शिवाय तुम्हाला कोणत्या वेळी ही मेल पाठवायची आहे ती वेळही देऊ शकता. अशा रितीने तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या पाठवायच्या काही मेल schedule करू शकता

Boomerangवापर करून पाठवले जाणारे मेल हे सुरक्षित राहतात. त्यामुळे तुमच्या मेलमधील मजकूर सुरक्षित राहतो. त्यामुळे तुम्ही आता मेल तयार केली तुमचं काम झालं. त्या वेळी त्या व्यक्तीपर्यंत तुमचा मेल जाईल याबाबत तुम्ही निश्चिंत राहाल यात काही शंका नाही.

Tuesday, October 12, 2010

भारतीय रुपयासाठीच्या चिन्हाला युनिकोड मान्यता

भारतीय रुपयासाठीच्या नव्या चिन्हाला युनिकोड मान्यता मिळाली आहे. जुलै महिन्यात भारत सरकारने रुपयासाठी नवे चिन्ह जाहीर केले होते. हे चिन्ह लवकरच सर्वसाधारण की-बोर्डवर तसंच विविध फाँटमध्ये उपलब्ध होईल, असं सांगण्यात आलं होतं. पण त्याच्या निश्चित कालावधीबाबत शंका होती. त्यानंतर मंगळूर येथील एका फाँटद्वारे ` हे चिन्ह उपलब्ध करून दिलं गेलं. मात्र ` चिन्हाला जागतिक मान्यत मिळण्यासाठी आणि की-बोर्डवर दिसण्यासाठी त्याला जागतिक युनिकोड कन्सॉर्टियम या संघटनेची मान्यता मिळणं आवश्यक होतं. या संघटनेकडून युनिकोडच्या नव्या फाँट आणि चिन्हांना मान्यता दिली जाते.

युनिकोड संघटनेकडून नुकतेच युनिकोड 6.०.० व्हर्जन लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 288 नव्या अक्षरांना जागा देण्यात आली आहे. भारतीयांसाठी नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे यात भारतीय रुपयासाठी वापरण्यात येणा-या चिन्हालाही स्थान देण्यात आलं आहे. भारतीय रुपयाच्या चिन्हासाठी U+20B9 हा कोड देण्यात आला आहे. युनिकोडचे नवे व्हर्जन संगणक आणि मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर तो सहज वापरता येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मार्क डेविस यांनी सांगितले. ` चिन्हाला युनिकोड मान्यता मिळाल्यामुळे काही महिन्यांतच तो डॉलर ($) युरो () प्रमाणे लिहिण्यास सहज उपलब्ध होणार आहे. HTML चा वापर करणारे &#x20b9या कोडद्वारे ` हे चिन्ह मिळवू शकतात.

जगातील आघाडीच्या संगणक कंपन्या खास भारतीय बाजारपेठेसाठी ` या चिन्हाचा समावेश असलेल्या की-बोर्डची निर्मिती करत आहेत. चिन्हाचा युनिकोडमध्ये समावेश झाल्याने आता तो संगणकासह भारतातील मोबाइलच्या की-पॅडवरही दिसणार आहे. युनिकोडच्या नव्या व्हर्जनमध्ये मोबाइल फोनसाठी नवं चिन्ह सहज वापरता येईल, याचा विचार करण्यात आला आहे. युनिकोडच्या या नव्या व्हर्जनची सध्या अंतिम चाचणी सुरू असून काही महिन्यांतच ते मोफत उपलब्ध होणार आहे.

Saturday, October 9, 2010

विंडोजचा स्मार्टफोन

स्मार्टफोनच्या वाढणा-या बाजारपेठेचा विचार करून मायक्रोसॉफ्टने स्मार्टफोनच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोजने विंडोज सेव्हन ऑपरेटिंग सिस्टीम हा स्मार्टफोन बाजारात दाखल करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम बाजारपेठेतील वाटा घसरत आहे. स्मोर्टफोनच्या बाजारपेठेत विंडोजलाअ‍ॅपलचा आयफोन, रिसर्च इन मोशनचाब्लॅकबेरीआणि गुगलचाअ‍ॅन्ड्रॉईडया स्मार्टफोनला टक्कर द्यावी लागणार आहे. विंडोजच्या या स्मार्टफोनसाठीसॅमसंग’, ‘एलजीआणिएचटीसीचे हँडसेट वापरले जाणार आहेत. विंडोजच्या स्मार्टफोनच्या विक्रीची जबाबदारीएटी अ‍ॅण्ड टीकडे असणार आहे.

Friday, October 8, 2010

गुगलकडून नवा इमेज फॉरमॅट

गुगलने वेबपी नावाने नवा इमेज फॉरमॅट विकसित केला आहे. या फॉरमॅटमुळे फोटोचा आकार 40 टक्क्यांनी कमी होणार आहे, असं गुगलने म्हटलं आहे. सध्या इंटरनेटवर जेपीजी किंवा जिफ फॉरमॅट बहुतेक लोकांकडून वापरले जातात. मात्र यामुळे इंटरनेटचा वेग कमी होतो, अशी तक्रार युझरकडून केली जाते. गुगलने युझरकडच्या अन्य फॉरमॅटमधले फोटो वेबपीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कन्व्हर्टर उपलब्ध करून दिला आहे. गुगलच्या वेबपीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP