विंडोजचा स्मार्टफोन
स्मार्टफोनच्या वाढणा-या बाजारपेठेचा विचार करून मायक्रोसॉफ्टने स्मार्टफोनच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोजने विंडोज सेव्हन ऑपरेटिंग सिस्टीम हा स्मार्टफोन बाजारात दाखल करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम बाजारपेठेतील वाटा घसरत आहे. स्मोर्टफोनच्या बाजारपेठेत विंडोजला ‘अॅपल’चा आयफोन, रिसर्च इन मोशनचा ‘ब्लॅकबेरी’ आणि गुगलचा ‘अॅन्ड्रॉईड’ या स्मार्टफोनला टक्कर द्यावी लागणार आहे. विंडोजच्या या स्मार्टफोनसाठी ‘सॅमसंग’, ‘एलजी’ आणि ‘एचटीसी’चे हँडसेट वापरले जाणार आहेत. विंडोजच्या स्मार्टफोनच्या विक्रीची जबाबदारी ‘एटी अॅण्ड टी’कडे असणार आहे.
0 comments:
Post a Comment