Wikipedia Meetupसाठी जिमी वॉल्स मुंबईत
इंटरनेटवरील माहितीवर कुणाचा एकाचा अधिकार असता कामा नये तसेच तो सर्वांना मोफत उपलब्ध झाले पहिजे या उद्देशाने सुरू झालेल्या विकिपीडिया या संकेतस्थळावर सक्रिय सहभाग घेणा-यांचा मुंबईतला तिसरा मेळावा रविवारी सोफिया महाविद्यालयात होणार आहे. या मेळाव्यासाठी विकीपीडियाचे संस्थापक जिमी वॉल्स हेदेखील येणार आहेत!
विकिपीडियाचा वापर करून न थांबता तेथील मजकूर समृद्ध करणारे आणि विकीपीडियाच्या अन्य उपक्रमांतही सहभाग घेणारे (विकिपीडियन्स आणि विकिमीडियन्स) मुंबईत अनेकजण आहेत. पण यापूर्वीच्या दोन बैठका वांद्रे आणि खारघर येथे झाल्या, तेव्हा वांद्रय़ात 13, आणि खारघरला अवघे 10जण आले! तिस-या मेळाव्याला जिमी वॉल्स येणार असल्याने 800 जण बसतील एवढ्या सभागृहात हा मेळावा होत आहे.
या भेटी दरम्यान चर्चा करण्यासाठी निश्चित असा कार्यक्रम ठरवलेला नाही. सहभागी होणा-यांनाही मतप्रदर्शनाची, व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. जिमी वॉल्स विकिपीडियाच्या विस्ताराबद्दल, तसेच प्रत्यक्षात विकिपीडियाचे काम कसे चालते. भारतातील इंटरनेट यूजर्स माहितीच्या या सर्वांत मोठ्या लिंकचा अद्याप पुरेसा वापर का करत नाहीत अशा मुद्दयांवरही बोलतील, अशी अपेक्षा आहे.
ब्रीच कँडीच्या सोफिया महाविद्यालयातील `सोफिया भवन हॉल'मध्ये सायंकाळी सहा वाजता होणा-या या मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क नाही. `विकिपीडिया'चा ज्ञानमार्ग रुंद करू शकणारे सर्वजण येथे येऊ शकतात!
0 comments:
Post a Comment