Monday, April 18, 2011

जी-मेलमध्ये भरा नवे रंग,नवे फोटो

जी-मेल अधिक आकर्षक दिसण्यासाठी गुगलने युझरसाठी काही थीम दिल्या आहेत. मात्र त्याच त्याच थीम वापरण्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर गुगलने तुमच्यासाठी नव्या थीम दिल्या आहे. अर्थात या थीम तुमच्या तुम्ही तयार करु शकता. अगदी तुमचा फोटोही थीम म्हणून तुम्ही वापरु शकता.

जी-मेलमधील या नव्या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या मेलमध्ये हवे ते रंग भरु शकता. जी-मेलमध्ये नवे रंग भरण्यासाठी जी-मेलच्या Settings मधून  Themesजा. तेथे सर्व थीम संपल्यानंतर Create your own theme यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील विडो दिसेल…

वर दाखवल्या प्रमाणे तुमच्या जी-मेलच्या प्रत्येक विभागात हवा तो रंग देऊ शकता. तसेच Main Background आणि Footer मध्ये तुम्हला हवा तो फोटो add करु शकता. याआधी जी-मेल वापरताना गुगलच्या होम पेजवर हवा तो फोटो टाकण्याची सोय गुगलने दिली होती. (अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा) त्याच प्रमाणे आताही जी-मेलमध्येही हवा तो रंग आणि फोटो यापुढे देता येणे शक्य आहे.

जी-मेलच्या युझर्सकडून नव्या थीम देण्याची मागणी केली जात होती. मात्र गुगलने युझर्सना नव्या थीम देण्यापेक्षा हव्या त्या थीम तयार करण्याचे स्वतंत्र्य दिले आहे. 



Friday, April 15, 2011

चार्ली वी मिस यू…


विनोदी ढंगाच्या मूकअभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चार्ली चॅप्लिन (चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन,ज्युनियर) यांचा आज 122 वा जन्मदिवस, त्यानिमित्ताने गुगलने आपल्या होम पेजवरील लोगो अर्थात गुगल डुडल बदल केला आहे.
गुगलचे प्रत्येक डुडल हा चर्चेचा विषय असतो. चित्र, ग्राफिक्स्, फ्लॅशच्या मदतीने तयार केलेले डुडल आतापर्यंत पाहिले होते. चार्लीसाठी मात्र गुगलने वेगळाच फंडा वापरला आहे. ज्यासाठी चार्ली प्रसिद्ध होता. त्या मूकअभिनयाचा वापर करुन गुगलने एक व्हिडीओच गुगल डुडल म्हणून वापरला आहे.
गुगलने तयार केलेला व्हिडीओ पहा….

Friday, April 1, 2011

‘जी-मेल मोशन’ वापरले का?


ई-मेल सेवा पुरवण्यामध्ये सध्या लोकप्रिय असलेल्या गुगलच्या जी-मेलने एक एप्रिल रोजी एक नवी सेवा लाँच करण्याची घोषणा केली आहे.  ‘जी-मेल मोशन’ असे या सेवेचे नाव आहे. याव्दारे जी-मेलचा वापर की-बार्ड आणि माउस शिवाय  करता येण शक्य होणार आहे. जी-मेल मोशनमुळे युझरला केवळ इशाऱ्याच्या (जेस्चर्स) मदतीने ई-मेल पाठवता आणि वाचता येणार आहे.
1874 मध्ये सर्वप्रथम Qwerty की-बोर्डची निर्मिती झाली. त्यानंतर 1963 मध्ये जगाला माउस शोध लागला. आणखी 50 वर्षांनी उच्च क्षमतेचे माक्रोप्रोसेसर आणि हाय क्षमतेचे वेबकॅम तसेच स्पेशल ट्रॅकिंग तंत्रज्ञान आले असेल. असे झाले तरीही आपण संगणकाशी अथवा अन्य डिव्हाइस हाताळण्यासाठी जुने तंत्रज्ञान वापरणार का? असा प्रश्न गुगलने विचारला आहे.
केवळ प्रश्न विचारुन गुगल थांबले नाही तर त्यावर त्यांनी उत्तर शोधले आहे. भविष्यातील संगणक कसा असेल यांचा पहिला प्रयत्न गुगलने जी-मेल मोशनच्या व्दारे केला आहे. मोशमच्या मदतीने जी-मेलव्दारे मेल चेक करणे आणि त्याला उत्तर पाठवणे या गोष्टी युझर इशाऱ्याच्या मदतीने करु शकेल.
जी-मेल मोशनचा वापर करण्यासाठी संगणकामध्ये इन-बिल्ट वेबकॅम आवश्यक आहे. जी-मेलच्या Settings पेजव्दारे एकदा का तुम्ही मोशन पर्याय अॅक्टीवर की त्यानंतर जेव्हा तुम्ही जी-मेल ओपन कराल तेव्हा आपोआप spacial tracking algorithm तुमची ओळख करुन घेईल.
जी-मेल मोशनची निर्मिती करताना गुगलने शारीरीक हलचालींचा अभ्यास करणाऱ्या एक्स्पर्टच्या मदत घेतली आहे.
विशेष म्हणेजे जी-मेल मोशनची चाचणी गेले काही महिन्यांपासून गुगलच्या कर्मचाऱ्याकडून केली जात आहे. गुगलमधील कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि सूचना याव्दारे जी-मेल मोशनमध्ये आणखी बदल केले जात आहेत. कर्मचाऱ्यांकडून वापरण्यात येणाऱ्या जी-मेल मोशनच्या दरम्यान गुगलने एक अहवाल तयार केला. या अहवालानुसार मोशनच्या वापरामुळे email compositionचा वेग 14 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. तसेच युझरचा इनबॉक्समधील वेळेत सरासरी 12 टक्क्यांची घट झाल्याचे आढळून आले.




जी-मेल मोशनचा वापर करण्यासाठी गुलल क्रोमची अद्यावत आवृत्ती अथवा फायर फॉक्सची 3.5 + आवृत्तीसह वेबकॅम असणे गरजेचे आहे. जी-मेलमधील ही सेवा सर्वांसाठी मोफत असणार आहे. अद्याप ही सेवा सर्वांसाठी खुली झाली नसली तरी काही दिवसांतच ती सुरु करणार असल्याचे गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगवर म्हटले आहे.
जी-मेल मोशनचा उपयोग सतत संगणकासमोर बसून काम करणाऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे.
वरील लेख वाचून झाल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील किंवा गुगलच्या संबंधीत पेजवर जाण्याआधी खालील मजकूर नक्की वाचा…









एप्रिल फूल
आज तारीख कोणती आहे माहित आहे का? एक एप्रिल, तर जी-मेल मोशन वैगरे काही नसून गुगलने केलेला हा एक एप्रिल फूल होता. जी-मेल मोशमच्या पेजवर जेव्हा  तुम्ही Try gmail Motion वर क्लिक करता. तेव्हा तुम्हाला एप्रिल फूलचा मेसेज दिसेल.
एप्रिल फूल करण्याची गुगलची ही सवय 2000 पासूनची आहे. अर्थात गुगलने एक एप्रिल रोजी अनेक लोकांना जी-मेल मोशनच्या निमित्ताने फसवले. बर नाही म्हटले तरी गुललचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. कारण या संदर्भातील व्हिडिओ तब्बल 13 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मात्र एक एप्रिल रोजी गुगलने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यावेळी त्या लोकांना फूल बनवण्याचा प्रयत्न आहे असे वाटले होते. अशा घोषणेपैकी एक म्हणजे 2004मध्ये करण्यात आलेली जी-मेल सेवेची घोषणा होय.
गुगलने 2000मध्ये MentalPlexची घोषणा केली होती. त्यानंतर गुगलने PigeonRank, Google Gulp, Gmail Paper आणि Google TiSP अशा सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.
गुगलच्या या एप्रिल फूलच्या अधिकृत पानावर जाण्यासाठी येथे किल्क करा…



Monday, March 14, 2011

‘आलम आरा’ची ८० वर्षे

‘आलम आरा’ हा चित्रपट १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय बोलपट होय. ‘आलम आरा’ केवळ पहिला भारतीय बोलपट नव्हता तर तो पहिला संगीतपट देखील होता. त्यामुळे भारतीय चित्रपटात बोलपटाबरोबरच संगीतची सुरुवात या चित्रपटाने केली. या चित्रपटातील  ”दे दे खुदा के नाम पर”  हे गाणे खुप गाजले होते. दिग्दर्शक ‘अर्देशिर इराणी’ यांचा हा चित्रपटा पाहण्यासाठी इतकी गर्दी होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मदत द्यावी लागली होती.

मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमा हॉलमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज ८० वर्षे झाली आहेत. या चित्रपटामुळे भारतीयांचे सामाजिक, संस्कृतीक आणि वैज्ञानिक जग बदलण्यास सुरुवात झाली. भारतीय चित्रपटात इतिहासात एक मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाच्या ८० व्या वर्षी गुगलने आपल्या होम पेजवर लोगो तयार केला आहे…

आलम आरा चित्रपटाविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Saturday, March 12, 2011

गुगलचे जपान पर्सन फाइन्डर

जपानच्या पूर्वोत्तर किनारपट्टीजवळ झालेल्या भूकंपानंतर गुगलने एक ऑनलाइन टूल सुरु केले आहे. पर्सन फाइन्डर असे या टूलचे नाव आहे. या टूलच्या मदतीने भूकंप आणि त्सुनामीमुळे प्रभावीत झालेल्या व्यक्तींचा शोध घेता येतो. तसेच त्यांच्या संदर्भातील माहिती मिळवता येते.




या टूलमध्ये व्यक्तींचा शोध घेण्याबरोबर ज्याचा शोध लागला आहे त्यांची ही माहिती मिळू शकते. ही सेवा जपानी भाषेसह इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे. भूकंपानंतर मोबाईल आणि फोन सेवा ठप्प झाल्यामुळे गुगलच्या या टूलच्या माध्यमातून व्यक्तींचा शोध घेणे शक्य आहे.


गुगलच्या या सेवेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून २४ तासांमध्ये तब्बल २२ हजार ४०० लोकांचा शोध घेतला गेला आहे.




गुगलने हे टूल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहे. व्यक्ती, बातम्या देणाऱ्या वेबसाइट, अन्य संस्था आणि संघटना यांना आपल्या वेबसाइट,ब्लॉगवर गुगलचे हे टूल Add करता येते. हे टूल मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.


हैतीमध्ये जानेवारी २०१०मध्ये झालेल्या भूकंपानंतर गुगलने अशा प्रकारची सेवा सुरु केली होती. इतकच नाही तर जपानमध्ये भूकंप झाल्यानंतर गुगलने आपल्या होम पेजवर त्सुनामी अलर्ट दिला होता.





त्यानंतर गुललने होमपेजवर जपानवर आलेल्या संकटासंदर्भातील सर्व माहिती देणारे एक स्वतंत्र वेबपेज (Resources) तयार केले आहे. या पेजवर अलर्ट, बातम्या, व्हिडिओ, रियल टाईम अपडेट अशा सर्व माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती जपानी भाषेबरोबर इंग्रजीमध्ये ही उपलब्ध आहे.


जपानमधील भूकंप आणि त्सुनामीसंदर्भातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Tuesday, March 8, 2011

‘जॉइन मि ऑन द ब्रिज’

महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी जागतिक महिला दिनाची सुरुवात आठ मार्च १९११ रोजी झाली. यंदाच्या १००व्या जागतिक महिला दिनानिमित्ताने गुगलने आपल्या होम पेजवर लोगो तयार केला आहे.




१९११पासून आजपर्यंत महिलांनी शिक्षण, आरोग्यापासून ते राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. यंदाचा १००वा जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी GOOGLE आणि Women for Women International ने एक वेगळा कँपेन आयोजीत करण्याचे आवाहन केले आहे.  Join women on bridgeअसे या कँपेन नाव असून जागतिक स्तरावर महिलांनी मिळवलेले यश, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शहरात कोणत्याही bridgeवर एकत्र येण्याचे आवाहन गुगलने केले आहे.



महिला दिनानिमित्ताने गुगलने एक विशेष पेज तयार केले आहे. या पेजवर १९११ ते आत्तापर्यंत महिलांची वाटचाल आणि योगदान याची थोडक्यात माहिती देणारा एक विशेष व्हिडिओ पहायला मिळतो.

तसेच जागतिक पातळीवर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्याचे आवाहन गुगलने केले आहे.
काही दिवसांपूर्वी स्टार प्लसने प्रत्येकाच्या आयुष्यातील महिलाचे स्थान अधोरेखीत करणारे एक अँथम साँग सुरु केले होते. जागतिक महिला दिनानिमित्ताने स्टार प्लसचे तू ही तू… हे अँथम साँग महिला आणि पुरुष दोघांना प्रेरणादायी आहे.

Saturday, February 19, 2011

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी गुगलने तयार केलेला लोगो

भारतीय उपखंडात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकची सुरुवात आजपासून होत आहे. या स्पर्धेसाठी गुगलने आपल्या होमपेजवर एक लोगो तयार केला आहे. जगभरात होणाऱ्या महत्त्वाच्या प्रसंगी गुगलकडून असे लोगो तयार केले जातात.  क्रिकेट विश्वचषकाच्या निमित्ताने गुगलने ही क्रिकेटचा फिल देणारा लोगो तयार केला आहे.



या लोगोमध्ये गुगलने ‘Google’ या शब्दामधील चौथा शब्द ‘G’ हा फलंदाज म्हणून दाखवला आहे. हा फलंदाज एका दिशेने बॉल मारत असल्याचे दाखवण्या आले आहे. मात्र प्रश्न असा पडतो की फलंदाज ज्या दिशेला बॉल मारत आहे. त्याच बाजूला ‘Google’ या शब्दामधील ‘O’ हे अक्षर दोन वेळा येतात. मात्र हे ‘O’ अक्षर क्रिकेट बॉल म्हणून दाखवण्या ऐवजी त्याच ठिकाणी गुगलने स्वतंत्र लहान बॉल दाखवला आहे.
गुगलने याआधी अनेक उत्तम लोगो तयार केले आहेत. मात्र क्रिकेट विश्वचषकाचा लोगो करताना वरील गोष्टीचा विचार झालेला दिसत नाही.
ईएसपीएने आपल्या वेबसाईटवर क्रिकेट विश्वचषकाचे सामने पाहण्याची सोय केली आहे. गुगलने फिफा विश्वचषक 2010 साठी अशी सोय(अधिक वाचा) केली होती. मात्र क्रिकेट विश्वचषकासाठी त्यांनी याचा विचार केलेला दिसत नाही.
याच बरोबर टि्वटरनेही फिफासाठी एक स्वतंत्र पेज तयार केले होते. त्यावर फिफा विश्वचषकासंदर्भातील सर्व अपडेट मिळत असे, मात्र त्यांनीही क्रिकेटसाठी असा विचार केलेला दिसत नाही

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP