Friday, December 25, 2009

ख्रिसमस डॉट कॉम

इंटरनेटच्या पसा-यात ख्रिसमससाठी एक स्वतंत्र जागा आहे. ख्रिसमसचा आनंद वाढवण्यासाठी इंटरनेटवरील काही संकेतस्थळांची माहिती आपण घेणार आहोत.ख्रिसमस निमित्ताने इंटरनेटवरील ख्रिसमसविषयी काही संकेतस्थळांची माहिती स्मार्ट क्लिकच्या वाचकांसाठी..

ख्रिसमसच्या दिवशी धम्माल करण्यासाठी एक भन्नाट संकेतस्थळ नेटवर उपलब्ध आहे आणि ते म्हणजे http:xmasfun.com. ख्रिसमससाठीचे संगीत, व्हिडिओ, रेसिपीज, गेम्स, कार्ड, विनोद, ग्राफिक्स अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या संकेतस्थळावर बघायला मिळतील. लहान मुलांसाठी या संकेतस्थळावर स्वतंत्र विभागही आहे. या संकेतस्थळावरील डाऊनलोड विभागाला भेट देण्यास विसरू नका. यामुळे तुमचा आनंद आणखीनच द्विगुणित होईल.

www.northpole.com या संकेतस्थळावर तुम्हाला एक गाव दिसेल. त्यात अनेक घरं दिसतील. प्रत्येक घराची रचना वेगळी आहे. प्रत्येक घरात ख्रिसमससनिमित्त विशेष सजवलेल्या गोष्टी पाहायला मिळतील. उदा- सांता वर्कशॉपमध्ये सांताक्लॉज मुलांना विविध खेळणी कशी तयार करायची यांची माहिती देतोय. सांता डेनमध्ये तुम्हाला चित्रपट, संगीत, पुस्तके, सांताबरोबर प्रश्न-उत्तरे अशा गोष्टींचीही माहिती मिळेल. ख्रिसमसनिमित्त करावयच्या केकच्या रेसिपीजची माहितीही दिली आहे. याशिवाय टॉय शॉप, मेलरूम, क्लब हाऊस, इल्फ पल अ‍ॅकॅडमी अशा किती तरी गोष्टी यात आहेत. हा अनोखा अनुभव घेण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्यायलाच हवी.www.xmasdownloads.com हे असंच एक संकेतस्थळ. ख्रिसमस संदर्भातील स्क्रिनसेव्हर, डेक्सटॉप थीम, गेम्सशिवाय फेस्टिव गुडीज डाऊनलोड करण्यासाठी अनेक ठिकाणी शोध घेण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी या एकाच संकेतस्थळावर मिळतील. या संकेतस्थळावर ख्रिसमस संदर्भातील इतर अनेक लिंकही दिल्या आहेत.

ख्रिसमसचा इतिहास

www.christmas-time.comप्रत्येक सण साजरा करण्यामागे इतिहासातील काही संदर्भ, परंपरा, कथा आणि रूढी असतात. ख्रिसमस सणाचा इतिहास व अन्य तपशील माहीत करून घेण्यासाठीचे हे संकेतस्थळ. या संकेतस्थळावर ख्रिसमसविषयीच्या इतिहासाबरोबर ख्रिसमस कार्ड, संगीत ऐकण्याची सोय आहे, तर ख्रिसमसच्या इतिहासाबरोबर जगातील अन्य देशांमध्ये ख्रिसमस कशा पद्धतीने साजरा होतो, सांतक्लॉजचा रंजक इतिहास अशी सगळी इंटरेस्टिंग माहिती www.thehistoryofchristmas.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

www.allthingschristmas.com नावाप्रमाणेच या संकेतस्थळावर ख्रिसमसविषयी सर्व माहिती देण्यात आली आहे. या संकेतस्थाळावरील ख्रिसमसकार्ड या विभागाला भेट देण्यास विसरू नका. कारण या संकेतस्थळावर मित्रांना पाठवण्यासाठी ख्रिसमसकार्ड तयार करण्याची नामी संधी मिळणार आहे.


ख्रिसमसविषयची अन्य संकेतस्थळे


www.christmas-day.org
www.xmasfonts.com
www.xmasbash.com
www.worldofchristmas.net
www.freechristmaswallpapers.net
www.the-north-pole.com
www.christmastree.org
www.whychristmas.com


सांताक्लॉजच्या भेटीसाठी


www.santaclaus.net
www.santas.net
www.santagames.net

Friday, December 18, 2009

नेट अपडेट- आता गुगलचा जी-फोन

आता गुगलचा जी-फोन

इंटरनेट वापरणा-या प्रत्येकाला गुगलच्या विविध सेवा वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळेच प्रत्येकाला गुगल नव्याने काय करणार आहे याची उत्सुकता असते. सध्या गुगलच्या एका नव्या उत्पादनाबद्दल नेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. ते उत्पादन म्हणजे जी-फोन’. गुगल पुढील वर्षात स्वत:चा मोबाइल बाजारपेठेत आणणार आहे. विशेष म्हणजे या स्मार्ट मोबाइल फोनची विक्री थेट ग्राहकाला केली जाणार आहे. गुगल आणि तैवान येथील एचटीसी कॉपरेरेशन मिळून या मोबाइलची निर्मिती करणार आहे. एचटीसी कॉपरेरेशन स्मार्ट फोन उत्पादनांच्या जागतिक ब्रँडमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या मोबाइलमधील सॉफ्टवेअर आणि डिझाइन गुगलचे असणार आहे. गुगलच्या या आगामी मोबाइल फोनचे बारसेसुद्धा झाले आहे. नेक्सस वनया नावाने गुगल हा मोबाइल बाजारपेठेत आणणार आहे.

  • सध्या नेक्सस वनची पहिली आवृत्ती गुगलच्या कर्मचा-यांसाठी उपलब्ध झाली आहे.
  • वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार गुगल या मोबाइलची विक्री ऑनलाइन करणार आहे.
  • इंटरनेटच्या विश्वात ज्याप्रमाणे गुगलने अन्य स्पर्धकांना मागे टाकले त्या पार्श्वभूमीवर हा जी-फोन काय कमाल करतो हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावीच लागेल.

संकेतस्थळांची पोतडी

इंटरनेटचा पसारा एवढा मोठा आहे की त्यातील आपल्याला हवी ती गोष्ट शोधण्यासाठी बरेच क्लिक करावे लागतात. त्यातही जर आपल्याला माहीत नसलेल्या विषयातील माहिती किंवा संकेतस्थळ शोधायचे असेल तर गुगलसारखा जवळचा मित्र नाही. मात्र गुगलवर सर्च केल्यानंतर अनेक संकेतस्थळांची यादी आपल्यासमोर येते. यातील कोणत्या संकेतस्थळावर आपल्याला हव्या त्या विषयाची उत्तम माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा बरीच शोधाशोध करावी लागते. यात बराच वेळ जातो. अशा वेळी गरज असते ती स्मार्ट क्लिक करण्याची..

तुम्हाला हवी ती तंतोतंत माहिती मिळवून देण्यासाठी www.categor.com हे संकेतस्थळ उपयोगी पडू शकते. आपण शोधत असलेल्या एखाद्या विषयातील उत्तम संकेतस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी या संकेत स्थळावर स्मार्ट क्लिक करणे अधिक फायदेशीर ठरेल.

या संकेतस्थळावर Health, Counselling/Tips, Entertainment, Sports, Computers, Science/Knowledge, Other, News अशा आठ विषयांतील उत्तम संकेतस्थळांची यादी देण्यात आली आहे. त्यात अनेक उप-प्रकार आहेत. शिवाय प्रत्येक संकेतस्थळाच्या नावापुढे त्याची थोडक्यात माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा सर्च अधिक सोपा होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रत्येक संकेतस्थळला रेटिंग देण्यात आले आहे. त्यासाठी R या इंग्रजी अक्षराचा वापर केला आहे. ज्या संकेतस्थळा पुढे R ची संख्या जास्त ते संकेतस्थळ अधिक चांगले.

एखाद्या विषयासंदर्भात सर्व माहिती देणा-या संकेतस्थळापुढे All हा शब्द वापरण्यात आला आहे. या दोन्हीमुळे तुम्हाला हव्या त्या विषयासंदर्भातील उत्तम संकेतस्थळ शोधून काढणे सोपे होईल. या संकेतस्थळावर सध्या एक हजारहून अधिक संकेतस्थळांची माहिती ५७ विभागांमध्ये देण्यात आली आहे.


ही सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला स्वत:चं लॉग इन करण्याची गरज नाही. categor.com वर देण्यात आलेली संकेतस्थळे ही युजर फ्रेंडली, उत्कृष्ट, मोठय़ा प्रमाणावर आणि मोफत माहिती मिळवून देणारी आहेत. त्यामुळे इंटरनेटच्या पसा-यात सर्च करताना हा क्लिक तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल.

तुम्हाला हवी ती तंतोतंत माहिती मिळवून देण्यासाठी www.categor.com हे संकेतस्थळ उपयोगी पडू शकते. आपण शोधत असलेल्या एखाद्या विषयातील उत्तम संकेतस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी या संकेत स्थळावर स्मार्ट क्लिक करणे अधिक फायदेशीर ठरेल.

Friday, December 11, 2009

कॉमिक डायजेस्ट मोबाईल फोनवर

कॉमिक डायजेस्ट मोबाईल फोनवर

लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत आणि अभ्यास करून कंटाळा आला की ज्या कॉमिक पुस्तकांनी आपलं मनोरंजन केलं त्या पुस्तकांच्या काही नेट आवृत्ती या पूर्वीच आल्या आहेत. पण आता ही कॉमिक पुस्तकंमोबाइल फोनवरही उपलब्ध झाली आहेत. रेडिफ डॉट कॉमने चाचा चौधरी, बिल्लू, पिंकी, फॅन्टन शक्तिमान, पंचतंत्र, तेनाली रामा, विक्रम वेताळ, अकबर बिरबल, रामायण आणि महाभारत इत्यादी सदाबहार कॉमिक डायजेस्ट मोबाइल फोनवर उपलब्ध करून दिली आहेत. यासाठी तुमच्या जीपीआरएस सुविधा असलेल्या मोबाइल हॅन्डसेटवरून http://mobile.rediff.com/comic वर लॉग ऑन करावं लागेल.

पेंटिंगच्या दुनियेत..

कोणत्या आर्ट गॅलरीत कोणत्या चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे याची माहिती संबंधित आर्ट गॅलरीच्या संकेतस्थळावर मिळतेच. जगभरातील सर्व आर्ट गॅलरीजच्या संकेतस्थळांवर असं वेळापत्रक उपलब्ध असतं. पण ही सर्व माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र संकेतस्थळावर क्लिक करावा लागतो. इंटरनेटच्या पसा-यात सर्व आर्ट गॅलरीजची माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर पेंटिंगच्या दुनियेत रमणा-यांसाठी तो एक स्मार्ट क्लिक ठरेल.

प्रत्येक क्षेत्रातील अभिजात गोष्टींपासून आपण सर्व जण अनेक कारणांनी दूर राहतो. इंटरनेटवर पेंटिंगच्या दुनियेची माहिती देणारी अनेक संकेतस्थळं आहे. अनेक चित्रकारांची स्वत:ची संकेत स्थळंही आहेत. त्या संकेत स्थळांवर त्यांच्या चित्रकलेचे नमुने तसेच त्यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन कोठे आहे. याची माहिती मिळते. देशातील नव्हे तर जगातील आर्ट गॅलरीजच्या संकेत स्थळावर त्या गॅलरीची माहिती बरोबरच तेथे कोणत्या कालावधीत कोणते प्रदर्शन भरणार आहे यांची माहिती मिळते. कोणत्या आर्ट गॅलरीत कोणत्या चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे किंवा भरणार आहे याची माहिती संबंधित आर्ट गॅलरीच्या संकेतस्थळावर मिळतेच. जगभरातील सर्व आर्ट गॅलरीजच्या संकेतस्थळांवर असं वेळापत्रक उपलब्ध असतं. पण ही सर्व माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र संकेत स्थळावर क्लिक करावा लागतो. इंटरनेटच्या पसा-यात सर्व आर्ट गॅलरीजची माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर पेंटिंगच्या दुनियेत रमणा-यांसाठी तो एक स्मार्ट क्लिक ठरेल.

http://paintingdb.com या संकेत स्थळावर जगातील अनेक देशांतील आर्ट गॅलरीजची माहिती मिळते. ही माहिती केवळ नाव देण्यपुरतीच मर्यादित नसून त्यात आर्ट गॅलरीचा पूर्ण पत्ता, सोबत गुगल मॅपवर या संबधित गॅलरीचं नेमकं ठिकाण दाखवणारा नकाशा, त्याचबरोबर या गॅलरीमध्ये कोणती पेंटिंग्ज आहेत हे देखिल पाहण्याची सोय या संकेत स्थळावर आहे. जगातील एकूण ३१ देशातील आर्ट गॅलरीजची माहिती या संकेतस्थळावर आहे. त्याच बरोबर artists या विभागात ६५१ चित्रकारांची माहिती आणि त्यांची काही पेंटिंग्ज आपण पाहू शकतो. सध्या या संकेतस्थळावर भारतातील आर्ट गॅलरीज आणि भारतीय चित्रकार यांची माहिती उपलब्ध नसली तरी अधिकाधिक देशांतील पेंटिंग्जची माहिती देण्याचा प्रयत्न या संकेतस्थळाच्या निर्मात्याकडून केला जात आहे.

centuries of art विभागात १४व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत प्रत्येक देशातील पेंटिंग्ज पाहता येतील. संकेत स्थळावरील पेंटिंग्ज पाहून कंटाळा आलाच तर Art quiz आणि Art puzzle विभाग आहेच. Art puzzle मध्ये तुम्ही एखादे पेंटिंग puzzle स्वरूपात करून घेऊ शकता. पेंटिंगची आपल्याला आवड असो वा नसो मात्र इंटरनेटचा वापर करताना अधून मधून असा स्मार्ट क्लिक करण्यास हरकत नाही.

Friday, December 4, 2009

डेस्कटॉप गुगल

गुगल सर्च, जी-मेल, ऑर्कुट अशा काही सेवांव्यतिरिक्त इंटनेटचा वापर अधिक ‘युजर फ्रेन्डली’ व्हावा यासाठी गुगल आपल्या लॅबमधून प्रयत्न करत असते. आपल्या नजरेतून सुटणाऱ्या गुगलच्या अशा काही अपडेटपैकीच Google Desktopची माहिती आपण आज घेणार आहोत.

इंटरनेटचा वापर करणा-यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय शब्द कोणता, असं विचारल्यास गुगलहेच उत्तर ऐकायला मिळेल. गुगलच्या या लोकप्रियतेमुळेच ऑक्सफर्डनेही आपल्या शब्दकोशात गुगल या शब्दाचा समावेश केला आहे. गुगलच्या अनेक सेवांचा वापर करणारे आपण सारे गुगिलियन्स आहेत. या अनेक सुविधांपैकी सर्व आपण वापरतोच असं नाही. गुगल सर्च, जी-मेल, ऑर्कुट अशा काही सेवांव्यतिरिक्त इंटनेट वापर अधिक युजर फ्रेंडली होण्यासाठी गुगल आपल्या लॅबमधून प्रयत्न करत असते.

मागील लेखात काही हटके वॉलपेपर असणा-या संकेतस्थळांची माहिती आपण घेतली. अशाच प्रकारची एक सेवा गुगलकडून दिली जाते ती म्हणजे Google Desktop!आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरं गुगलकडून मिळतात. एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा जी-मेल, ऑर्कुट वापरण्यासाठी दर वेळी आपल्याला नवी विंडो ओपन करावी लागते. पण जर गुगलच्या सर्व सेवा तुमच्या Desktop वर एका क्लिकवर मिळाल्या तर तो तुमच्यासाठी नक्कीच स्मार्ट क्लिक ठरेल. Google Desktop मध्ये नेमकी हीच सोय उपलब्ध आहे. यासाठीची फाइल तुम्हाला संगणकावर डाऊनलोड करावी लागेल. ही फाइल रन केल्यावर संगणकाच्या screen च्या उजव्या हाताला एक नवी विंडो ओपन झालेली दिसेल. ही विंडो म्हणजे Google Desktop होय. या विंडोच्या सर्वात वर बाजूला Add gadgets, menu, minimize हे तीन पर्याय दिसतील. त्याच्या खाली या Desktop वर काही लहान विंडो दिसतील. (उदा. घडय़ाळ, तुमचा आवडता स्क्रिन सेव्हर, हवामानाची माहिती देणारी विंडो इ.) वर सांगितल्याप्रमाणे गुगल देत असलेल्या सर्व सेवा तुम्ही या Desktop वरून वापरू शकता. गुगलच्या या Desktop वर कोणत्या सुविधा आहेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणत्या सेवा वापरायच्या आहेत, हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला नको असल्यास यातील एखादी विंडो तुम्ही काढून टाकू शकता. त्याचबरोबर एखादी नवी गोष्टAdd करू शकता. गुगल देत असलेल्या सेवा Add करण्यासाठी तुम्हाला Add gadgets मध्ये जावे लागेल. या ठिकाणी New, Recommendations, Google Created, Recently Used, Updates, News, Sports, Lifestyle, Finance,Tools, Fune & Games, Technology, Communication हे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला Desktop वर पाहिजे असलेल्या अपडेटच्या अ Add बटणावर क्लिक केल्यानंतर ती विंडो Google Desktop वर येईल. Add gadgets मध्ये गेल्यावर गुगल म्हणजे अलिबाबाची गुहा वाटावी इतक्या प्रकारच्या सेवा नजरेस पडतील. उपयुक्त विंडोजपैकी एक म्हणजे ताज्या बातम्या देणारी विंडो. यामध्ये जगातील बातम्या देणा-या ३१२ संकेतस्थळांच्या विंडो गुगलने उपलब्ध करून दिल्या आहेत. Add gadgets मधून अनेक प्रकारच्या गेम विंडोजही घेता येतात. जी-टॉक, ऑर्कुट, जी-मेल या विंडोही येथे उघडता येतात.

हा Desktopसंगणकाच्या screen च्या उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवता येतो. तसंच संगणकावर दुसरं कोणतंही काम करत असतानाही याचा वापर करता येतो. एखादं काम करताना हा डेस्कटॉप नको असेल तर तो काढताही येतो. तसंच त्याचे क्रमही निश्चित करता येतात. गुगलचा हा Desktop मिळवण्यासाठी http://desktop.google.comवर स्मार्ट क्लिक करायलाच हवा.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP