Friday, December 4, 2009

डेस्कटॉप गुगल

गुगल सर्च, जी-मेल, ऑर्कुट अशा काही सेवांव्यतिरिक्त इंटनेटचा वापर अधिक ‘युजर फ्रेन्डली’ व्हावा यासाठी गुगल आपल्या लॅबमधून प्रयत्न करत असते. आपल्या नजरेतून सुटणाऱ्या गुगलच्या अशा काही अपडेटपैकीच Google Desktopची माहिती आपण आज घेणार आहोत.

इंटरनेटचा वापर करणा-यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय शब्द कोणता, असं विचारल्यास गुगलहेच उत्तर ऐकायला मिळेल. गुगलच्या या लोकप्रियतेमुळेच ऑक्सफर्डनेही आपल्या शब्दकोशात गुगल या शब्दाचा समावेश केला आहे. गुगलच्या अनेक सेवांचा वापर करणारे आपण सारे गुगिलियन्स आहेत. या अनेक सुविधांपैकी सर्व आपण वापरतोच असं नाही. गुगल सर्च, जी-मेल, ऑर्कुट अशा काही सेवांव्यतिरिक्त इंटनेट वापर अधिक युजर फ्रेंडली होण्यासाठी गुगल आपल्या लॅबमधून प्रयत्न करत असते.

मागील लेखात काही हटके वॉलपेपर असणा-या संकेतस्थळांची माहिती आपण घेतली. अशाच प्रकारची एक सेवा गुगलकडून दिली जाते ती म्हणजे Google Desktop!आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरं गुगलकडून मिळतात. एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा जी-मेल, ऑर्कुट वापरण्यासाठी दर वेळी आपल्याला नवी विंडो ओपन करावी लागते. पण जर गुगलच्या सर्व सेवा तुमच्या Desktop वर एका क्लिकवर मिळाल्या तर तो तुमच्यासाठी नक्कीच स्मार्ट क्लिक ठरेल. Google Desktop मध्ये नेमकी हीच सोय उपलब्ध आहे. यासाठीची फाइल तुम्हाला संगणकावर डाऊनलोड करावी लागेल. ही फाइल रन केल्यावर संगणकाच्या screen च्या उजव्या हाताला एक नवी विंडो ओपन झालेली दिसेल. ही विंडो म्हणजे Google Desktop होय. या विंडोच्या सर्वात वर बाजूला Add gadgets, menu, minimize हे तीन पर्याय दिसतील. त्याच्या खाली या Desktop वर काही लहान विंडो दिसतील. (उदा. घडय़ाळ, तुमचा आवडता स्क्रिन सेव्हर, हवामानाची माहिती देणारी विंडो इ.) वर सांगितल्याप्रमाणे गुगल देत असलेल्या सर्व सेवा तुम्ही या Desktop वरून वापरू शकता. गुगलच्या या Desktop वर कोणत्या सुविधा आहेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणत्या सेवा वापरायच्या आहेत, हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला नको असल्यास यातील एखादी विंडो तुम्ही काढून टाकू शकता. त्याचबरोबर एखादी नवी गोष्टAdd करू शकता. गुगल देत असलेल्या सेवा Add करण्यासाठी तुम्हाला Add gadgets मध्ये जावे लागेल. या ठिकाणी New, Recommendations, Google Created, Recently Used, Updates, News, Sports, Lifestyle, Finance,Tools, Fune & Games, Technology, Communication हे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला Desktop वर पाहिजे असलेल्या अपडेटच्या अ Add बटणावर क्लिक केल्यानंतर ती विंडो Google Desktop वर येईल. Add gadgets मध्ये गेल्यावर गुगल म्हणजे अलिबाबाची गुहा वाटावी इतक्या प्रकारच्या सेवा नजरेस पडतील. उपयुक्त विंडोजपैकी एक म्हणजे ताज्या बातम्या देणारी विंडो. यामध्ये जगातील बातम्या देणा-या ३१२ संकेतस्थळांच्या विंडो गुगलने उपलब्ध करून दिल्या आहेत. Add gadgets मधून अनेक प्रकारच्या गेम विंडोजही घेता येतात. जी-टॉक, ऑर्कुट, जी-मेल या विंडोही येथे उघडता येतात.

हा Desktopसंगणकाच्या screen च्या उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवता येतो. तसंच संगणकावर दुसरं कोणतंही काम करत असतानाही याचा वापर करता येतो. एखादं काम करताना हा डेस्कटॉप नको असेल तर तो काढताही येतो. तसंच त्याचे क्रमही निश्चित करता येतात. गुगलचा हा Desktop मिळवण्यासाठी http://desktop.google.comवर स्मार्ट क्लिक करायलाच हवा.

2 comments:

Anonymous April 2, 2010 at 5:20 PM  

khupach chan mahiti chngali aahe are ti khup upayogi aahe.

Anonymous April 2, 2010 at 5:21 PM  

HI BUDDY,
THATS COOL AGAIN.

I JUST WANT TO KNOW WHATS HAPPENING IN WiKIPEDIA.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP