संकेतस्थळांची पोतडी
इंटरनेटचा पसारा एवढा मोठा आहे की त्यातील आपल्याला हवी ती गोष्ट शोधण्यासाठी बरेच क्लिक करावे लागतात. त्यातही जर आपल्याला माहीत नसलेल्या विषयातील माहिती किंवा संकेतस्थळ शोधायचे असेल तर गुगलसारखा जवळचा मित्र नाही. मात्र गुगलवर सर्च केल्यानंतर अनेक संकेतस्थळांची यादी आपल्यासमोर येते. यातील कोणत्या संकेतस्थळावर आपल्याला हव्या त्या विषयाची उत्तम माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा बरीच शोधाशोध करावी लागते. यात बराच वेळ जातो. अशा वेळी गरज असते ती स्मार्ट क्लिक करण्याची..
तुम्हाला हवी ती तंतोतंत माहिती मिळवून देण्यासाठी www.categor.com हे संकेतस्थळ उपयोगी पडू शकते. आपण शोधत असलेल्या एखाद्या विषयातील उत्तम संकेतस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी या संकेत स्थळावर स्मार्ट क्लिक करणे अधिक फायदेशीर ठरेल.
या संकेतस्थळावर Health, Counselling/Tips, Entertainment, Sports, Computers, Science/Knowledge, Other, News अशा आठ विषयांतील उत्तम संकेतस्थळांची यादी देण्यात आली आहे. त्यात अनेक उप-प्रकार आहेत. शिवाय प्रत्येक संकेतस्थळाच्या नावापुढे त्याची थोडक्यात माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा सर्च अधिक सोपा होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रत्येक संकेतस्थळला रेटिंग देण्यात आले आहे. त्यासाठी R या इंग्रजी अक्षराचा वापर केला आहे. ज्या संकेतस्थळा पुढे R ची संख्या जास्त ते संकेतस्थळ अधिक चांगले.
एखाद्या विषयासंदर्भात सर्व माहिती देणा-या संकेतस्थळापुढे All हा शब्द वापरण्यात आला आहे. या दोन्हीमुळे तुम्हाला हव्या त्या विषयासंदर्भातील उत्तम संकेतस्थळ शोधून काढणे सोपे होईल. या संकेतस्थळावर सध्या एक हजारहून अधिक संकेतस्थळांची माहिती ५७ विभागांमध्ये देण्यात आली आहे.
ही सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला स्वत:चं लॉग इन करण्याची गरज नाही. categor.com वर देण्यात आलेली संकेतस्थळे ही युजर फ्रेंडली, उत्कृष्ट, मोठय़ा प्रमाणावर आणि मोफत माहिती मिळवून देणारी आहेत. त्यामुळे इंटरनेटच्या पसा-यात सर्च करताना हा क्लिक तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल.
तुम्हाला हवी ती तंतोतंत माहिती मिळवून देण्यासाठी www.categor.com हे संकेतस्थळ उपयोगी पडू शकते. आपण शोधत असलेल्या एखाद्या विषयातील उत्तम संकेतस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी या संकेत स्थळावर स्मार्ट क्लिक करणे अधिक फायदेशीर ठरेल.
1 comments:
छान , चांगली माहिती आहे.
Post a Comment