Friday, December 11, 2009

पेंटिंगच्या दुनियेत..

कोणत्या आर्ट गॅलरीत कोणत्या चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे याची माहिती संबंधित आर्ट गॅलरीच्या संकेतस्थळावर मिळतेच. जगभरातील सर्व आर्ट गॅलरीजच्या संकेतस्थळांवर असं वेळापत्रक उपलब्ध असतं. पण ही सर्व माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र संकेतस्थळावर क्लिक करावा लागतो. इंटरनेटच्या पसा-यात सर्व आर्ट गॅलरीजची माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर पेंटिंगच्या दुनियेत रमणा-यांसाठी तो एक स्मार्ट क्लिक ठरेल.

प्रत्येक क्षेत्रातील अभिजात गोष्टींपासून आपण सर्व जण अनेक कारणांनी दूर राहतो. इंटरनेटवर पेंटिंगच्या दुनियेची माहिती देणारी अनेक संकेतस्थळं आहे. अनेक चित्रकारांची स्वत:ची संकेत स्थळंही आहेत. त्या संकेत स्थळांवर त्यांच्या चित्रकलेचे नमुने तसेच त्यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन कोठे आहे. याची माहिती मिळते. देशातील नव्हे तर जगातील आर्ट गॅलरीजच्या संकेत स्थळावर त्या गॅलरीची माहिती बरोबरच तेथे कोणत्या कालावधीत कोणते प्रदर्शन भरणार आहे यांची माहिती मिळते. कोणत्या आर्ट गॅलरीत कोणत्या चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे किंवा भरणार आहे याची माहिती संबंधित आर्ट गॅलरीच्या संकेतस्थळावर मिळतेच. जगभरातील सर्व आर्ट गॅलरीजच्या संकेतस्थळांवर असं वेळापत्रक उपलब्ध असतं. पण ही सर्व माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र संकेत स्थळावर क्लिक करावा लागतो. इंटरनेटच्या पसा-यात सर्व आर्ट गॅलरीजची माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर पेंटिंगच्या दुनियेत रमणा-यांसाठी तो एक स्मार्ट क्लिक ठरेल.

http://paintingdb.com या संकेत स्थळावर जगातील अनेक देशांतील आर्ट गॅलरीजची माहिती मिळते. ही माहिती केवळ नाव देण्यपुरतीच मर्यादित नसून त्यात आर्ट गॅलरीचा पूर्ण पत्ता, सोबत गुगल मॅपवर या संबधित गॅलरीचं नेमकं ठिकाण दाखवणारा नकाशा, त्याचबरोबर या गॅलरीमध्ये कोणती पेंटिंग्ज आहेत हे देखिल पाहण्याची सोय या संकेत स्थळावर आहे. जगातील एकूण ३१ देशातील आर्ट गॅलरीजची माहिती या संकेतस्थळावर आहे. त्याच बरोबर artists या विभागात ६५१ चित्रकारांची माहिती आणि त्यांची काही पेंटिंग्ज आपण पाहू शकतो. सध्या या संकेतस्थळावर भारतातील आर्ट गॅलरीज आणि भारतीय चित्रकार यांची माहिती उपलब्ध नसली तरी अधिकाधिक देशांतील पेंटिंग्जची माहिती देण्याचा प्रयत्न या संकेतस्थळाच्या निर्मात्याकडून केला जात आहे.

centuries of art विभागात १४व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत प्रत्येक देशातील पेंटिंग्ज पाहता येतील. संकेत स्थळावरील पेंटिंग्ज पाहून कंटाळा आलाच तर Art quiz आणि Art puzzle विभाग आहेच. Art puzzle मध्ये तुम्ही एखादे पेंटिंग puzzle स्वरूपात करून घेऊ शकता. पेंटिंगची आपल्याला आवड असो वा नसो मात्र इंटरनेटचा वापर करताना अधून मधून असा स्मार्ट क्लिक करण्यास हरकत नाही.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP