Friday, February 19, 2010

नेट अपडेट- बिझी ‘बझ’


बिझी बझ

तुमच्यापैकी किती तरी जण बझीअसतीलच. काही दिवसांपूर्वीच जी-मेल आयडी ओपन करताच बझया ऑप्शनचा पर्याय स्वीकारणार का? असा मेसेज दिसत होता. गुगलच्या प्रत्येक नव्या ऑप्शनप्रमाणेच बझचा युझरही झपाट्याने वाढत आहे.


सध्या सोशल नेटवर्किंग साइट्स नेटक-यांच्या हिटलिस्टवर आहेत. यामध्ये फेसबुक, हाय-फाइव, ट्विटर यांचा समावेश होतो. याची सुरुवात प्रथम गुगलनेच ऑर्कुटच्या माध्यमातून केली. मात्र नंतर आलेल्या फेसबुक आणि ट्विटरने ऑर्कुटला चांगलीच टक्कर दिली.

या दोघांनाही मागे टाकण्यासाठी गुगलने बझनावाचं नवीन अ‍ॅप्लिकेशन आणलं आहे. मात्र अजून ज्यांनी गुगलचा बझस्वीकारलेला नाही. त्यांनीही तो स्वीकारायला काहीच हरकत नाही.


गुगलच्या बझचा वापरण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र लॉगइन करावं लागत नाही. तुमचा जी-मेल आयडी ओपन करताच इनबॉक्सच्या खाली हा नवीन पर्याय दिसतो. बझमध्ये ट्विटरप्रमाणे वॉलपोस्ट हादेखील एक पर्याय आहे. तिथे तुम्ही तुमची मतं मांडू शकता. तुम्ही पोस्ट केलेला मेसेज तुमच्या ई-मेल आयडीमधील सर्व मित्रांपर्यंत पोहोचू शकतो. बझमोबाइलवरूनही ऑपरेट करता येतं. त्यासाठी http://www.google.com/intl/en/mobile/buzz यावर लॉगइन करावं लागतं.


ई-मेल चेकिंग
, ऑर्कुट, ट्विटर, फेसबुक या सर्वाची एकत्रित आवृत्ती म्हणजे बझअसं म्हणता येईल. ऑफिसमध्ये आता ऑर्कुट, फेसबुक, ट्विटरनंतर आलेल्या बझवर बिझी होण्यास हरकत नाही.

विकिपिडियाचा भारतीय अवतार ‘क्रीओ’

इंटरनेटवरील कोणत्याही सर्च इंजिनवर माहिती शोधणं म्हणजे महाकठीण काम असतं. कारण दररोज हजारो पानांची माहिती तयार होत असते. ज्यावेळी आपण एखादी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी माहितीचा प्रचंड साठा आपल्यासमोर येत असतो. समोर आलेल्या माहितीपैकी नेमकी कोणती माहिती आपल्या उपयोगाची आहे हे शोधण्यात आपला बराचसा वेळ जातो. मात्र आता क्रीओ.कॉममुळे हा वेळदेखील वाचणार आहे.

आपल्याला हवी असणारी माहिती पटकन मिळावी यासाठी क्रीओ.कॉमने वेब २.० या तंत्रज्ञानाला कलेक्टिव्ह इंटेलिजन्सची जोड देत सर्चमधील हा दोष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.


क्रीओचं स्वरूप सध्या जरी विकिपिडियासारखं वाटत असलं तरी इंटरनेटवरील हा नवा प्रयोग किती यशस्वी होतो हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. संकेतस्थळावर वाचकांकडूनच विविध विषयांवर माहिती मागवली जात आहे.


इंटरनेटवरील या नव्या प्रयोगाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Kreeo.com वर लॉगऑन करा.

मातृभाषा ऑनलाइन

इंटरनेटच्या विश्वात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींची भरच पडत असते. गेल्या काही दिवसांत मात्र इंटरनेटच्या विश्वात आलेल्या नव्या गोष्टींनी सा-या नेटकरांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती गुगलच्या ‘बझ’ची. बझबरोबरच नेटविश्वात मोलाची भर घातलेल्या अन्य अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाइटची माहिती आज स्मार्ट क्लिकमध्ये करून घेऊ या.

दर चार कोसावर भाषा बदलते. त्यामुळे जितकी लोकसंख्या तितक्या भाषा निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच अन्य भाषेतील व्यक्तीशी संवाद साधताना इंग्रजीचा वापर करावा लागतो. पण प्रत्येकालाच इंग्रजी जमतंच असं नाही. अशा वेळी समोरच्या माणसाशी कसा संपर्क साधायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र गुगल इंडियाने हा प्रश्न सोडवला आहे. आपल्या मातृभाषेतच तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण Google Transliteration IMEच्या वापराने केवळ मातृभाषेतच नव्हे तर अन्य १३ भारतीय भाषांमध्येही लिहिण्याची सोय गुगल इंडियाने उपलब्ध करून दिली आहे. भारतीय नेटकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

Transliteration IME हे सॉफ्टवेअर आहे. ते एकदा तुम्ही तुमच्या संगणकावर डाऊनलोड करून घेतलं की तुम्ही १३ भारतीय भाषांमध्ये हवा तो मजकूर पाठवू शकता. सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना प्रथम भाषेची निवड करावी लागते. म्हणजेच ज्या भाषेत तुम्हाला लिहायचं आहे ती भाषा तुम्हाला निवडावी लागते. एकदा का हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं की मग हवा तो मजकूर अरबी, बंगाली, पारसी, ग्रीक, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, तामिळ, तेलुगू, उर्दू आदी भाषांमध्ये लिहू शकता. सगळ्यात महत्त्चाचं म्हणजे याचा वापर जी-मेल’, ‘ऑर्कुटया ब्लॉगमध्येही सहज करता येणार आहे. सॉफ्टवेअर कसं डाऊनलोड करावं या विषयीची माहिती छायाचित्रासह दिली आहे.

http://www.google.com/ime/transliteration या लिंकवर क्लिक करून तुम्ही Transliteration डाऊनलोड करू शकता.

याचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांबरोबरच उद्योजकांनाही होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या नोंदणीची गरज नाही. तसेच ही सुविधा ऑफलाइनदेखील उपलब्ध असल्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचंही बंधन नाही. गुगलच्या या सेवेमध्ये उपलब्ध असलेले फॉन्ट्स युनिकोड असल्यामुळे ज्या भाषेत मजकूर लिहायचा आहे त्या आणि ज्या भाषेत तो बदलणार आहे ती भाषा न दिसण्याची अडचणही निर्माण होणार नाही.

Friday, February 12, 2010

लव्ह ऑन नेट

व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यासाठी नेटवरील काही संकेतस्थळे...

व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी तुम्ही तरुणांनी इंटरनेटच्या मायाजालात प्रवेश केला नाही तर नवलच! स्वत:च्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणी भेटवस्तूंचा आधार घेतं, तर कोणी ग्रिटिंग्जचा नाही तर एसएमएस आधार घेतातच. दूरदेशी गेलेल्यांना मात्र इंटरनेटशिवाय पर्यायच नसतो.

इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करणा-या तरुणांसाठी व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यासाठी अनेक संकेतस्थळं सज्ज झाली आहेत. ही संकेतस्थळं तुम्हाला नक्कीच मदत करतील. यातील काही संकेतस्थळांवर प्रिय व्यक्तीला देण्यासाठी एखादी भेटही मिळेल. आपल्या व्हॅलेंटाइनला काय भेट द्यायची? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तरही या संकेतस्थळांवर तुम्हाला मिळेल.

तुमच्या व्हॅलेंटाइनला भेट पाठवण्यासाठी काही उपयुक्त संकेतस्थळं


www.mydearvalentine.com
www.indiawithlove.com
www.valentines-corner.com
www.poemsource.com/valentine-poems.html
www.valentinesdaymovie.com
www.valentineday.in
www.stvalentinesday.org
www.valentinedaygift.co.in
www.valentinedayecards.com
www.valentinedayflowers.org
www.valentine-card.com


व्हॅलेंटाइन्स डेला मराठीतून एसएमएस पाठवण्यासाठी ही लिंक उपयुक्त आहे.

http://www.smsdose.com/Marathi_SMS_1.htm

Friday, February 5, 2010

माहितीचा खजिना

www.nationmaster.com या संकेतस्थळावर जगातील प्रत्येक देशाची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध केलेली माहिती सीआयए वर्ल्ड फॅक्टबुक, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक अशा विविध क्षेत्रांमधल्या जागतिक पातळीवर काम करणा-या संस्थेकडून देण्यात आली आहे.

इंटरनेटच्या पसा-यात गुगलसारख्या सर्च इंजिनमुळे कोणत्याही स्वरूपाच्या माहितीचा शोध घेणं अतिशय सोपं झालं आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जण अनेक गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांना भेटी देत असतात. कोणत्याही विषयाच्या भूत आणि वर्तमानासंदर्भातील आकडेवारी मिळण्यासाठी Wikipediaया संकेतस्थळाचा सर्रास वापर केला जातो, हे तर आपल्याला माहीतच आहे. या Wikipedia सोबत माहिती आणि आकडेवारीबरोबरच अनेक अर्थानी मिळतं-जुळतं घेणारं संकेतस्थळ म्हणजे- www.nationmaster.com होय.

या संकेतस्थळावर जगातील प्रत्येक देशाची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध केलेली माहिती सीआयए वर्ल्ड फॅक्टबुक, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक अशा विविध क्षेत्रांमधल्या जागतिक पातळीवर काम करणा-या संस्थेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य संकेतस्थळांवरची माहिती वाचताना त्या माहितीच्या सत्यतेविषयी जशी शंका निर्माण होते तशी शंका या ठिकाणी निर्माण होत नाही. कारण प्रत्येक माहितीखाली त्या माहितीचा स्रोत दिलेला आहे. म्हणजे त्या माहितीवर किती विश्वास ठेवावा हे आपण ठरवू शकतो. या संकेतस्थळावर जवळजवळ जगातील सर्वच देशांची माहिती त्यांच्या नकाशासह अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सोबत प्रत्येक देशाचे राष्ट्रध्वजही दिले आहेत. यावरील Education, forumsहा विभाग आवर्जून भेट देण्यासारखाच आहे. इतकंच नव्हे तर Encyclopedia या ऑप्शनमध्ये तुम्ही स्वत:कडील, तुम्हाला ज्ञात असलेली माहितीही पाठवू शकता. अशा रीतीने अनेक विषयांची, संदर्भाची, अहवाल तसेच लेख याविषयी इतरांनी दिलेली माहिती या संकेतस्थळावर वाचायला मिळते. म्हणूनच अभ्यासपूर्ण संशोधन करणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांबरोबरच स्वत:ला अपडेट ठेवणा-या नेटप्रेमींसाठी हे संकेतस्थळ निश्चितच उपयोगी आहे. तेव्हा या संकेतस्थळाची सफर नक्कीच करा.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP