Friday, February 19, 2010

मातृभाषा ऑनलाइन

इंटरनेटच्या विश्वात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींची भरच पडत असते. गेल्या काही दिवसांत मात्र इंटरनेटच्या विश्वात आलेल्या नव्या गोष्टींनी सा-या नेटकरांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती गुगलच्या ‘बझ’ची. बझबरोबरच नेटविश्वात मोलाची भर घातलेल्या अन्य अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाइटची माहिती आज स्मार्ट क्लिकमध्ये करून घेऊ या.

दर चार कोसावर भाषा बदलते. त्यामुळे जितकी लोकसंख्या तितक्या भाषा निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच अन्य भाषेतील व्यक्तीशी संवाद साधताना इंग्रजीचा वापर करावा लागतो. पण प्रत्येकालाच इंग्रजी जमतंच असं नाही. अशा वेळी समोरच्या माणसाशी कसा संपर्क साधायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र गुगल इंडियाने हा प्रश्न सोडवला आहे. आपल्या मातृभाषेतच तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण Google Transliteration IMEच्या वापराने केवळ मातृभाषेतच नव्हे तर अन्य १३ भारतीय भाषांमध्येही लिहिण्याची सोय गुगल इंडियाने उपलब्ध करून दिली आहे. भारतीय नेटकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

Transliteration IME हे सॉफ्टवेअर आहे. ते एकदा तुम्ही तुमच्या संगणकावर डाऊनलोड करून घेतलं की तुम्ही १३ भारतीय भाषांमध्ये हवा तो मजकूर पाठवू शकता. सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना प्रथम भाषेची निवड करावी लागते. म्हणजेच ज्या भाषेत तुम्हाला लिहायचं आहे ती भाषा तुम्हाला निवडावी लागते. एकदा का हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं की मग हवा तो मजकूर अरबी, बंगाली, पारसी, ग्रीक, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, तामिळ, तेलुगू, उर्दू आदी भाषांमध्ये लिहू शकता. सगळ्यात महत्त्चाचं म्हणजे याचा वापर जी-मेल’, ‘ऑर्कुटया ब्लॉगमध्येही सहज करता येणार आहे. सॉफ्टवेअर कसं डाऊनलोड करावं या विषयीची माहिती छायाचित्रासह दिली आहे.

http://www.google.com/ime/transliteration या लिंकवर क्लिक करून तुम्ही Transliteration डाऊनलोड करू शकता.

याचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांबरोबरच उद्योजकांनाही होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या नोंदणीची गरज नाही. तसेच ही सुविधा ऑफलाइनदेखील उपलब्ध असल्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचंही बंधन नाही. गुगलच्या या सेवेमध्ये उपलब्ध असलेले फॉन्ट्स युनिकोड असल्यामुळे ज्या भाषेत मजकूर लिहायचा आहे त्या आणि ज्या भाषेत तो बदलणार आहे ती भाषा न दिसण्याची अडचणही निर्माण होणार नाही.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP