Friday, February 19, 2010

विकिपिडियाचा भारतीय अवतार ‘क्रीओ’

इंटरनेटवरील कोणत्याही सर्च इंजिनवर माहिती शोधणं म्हणजे महाकठीण काम असतं. कारण दररोज हजारो पानांची माहिती तयार होत असते. ज्यावेळी आपण एखादी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी माहितीचा प्रचंड साठा आपल्यासमोर येत असतो. समोर आलेल्या माहितीपैकी नेमकी कोणती माहिती आपल्या उपयोगाची आहे हे शोधण्यात आपला बराचसा वेळ जातो. मात्र आता क्रीओ.कॉममुळे हा वेळदेखील वाचणार आहे.

आपल्याला हवी असणारी माहिती पटकन मिळावी यासाठी क्रीओ.कॉमने वेब २.० या तंत्रज्ञानाला कलेक्टिव्ह इंटेलिजन्सची जोड देत सर्चमधील हा दोष दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.


क्रीओचं स्वरूप सध्या जरी विकिपिडियासारखं वाटत असलं तरी इंटरनेटवरील हा नवा प्रयोग किती यशस्वी होतो हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. संकेतस्थळावर वाचकांकडूनच विविध विषयांवर माहिती मागवली जात आहे.


इंटरनेटवरील या नव्या प्रयोगाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Kreeo.com वर लॉगऑन करा.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP