माहितीचा खजिना
www.nationmaster.com या संकेतस्थळावर जगातील प्रत्येक देशाची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध केलेली माहिती सीआयए वर्ल्ड फॅक्टबुक, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक अशा विविध क्षेत्रांमधल्या जागतिक पातळीवर काम करणा-या संस्थेकडून देण्यात आली आहे.
इंटरनेटच्या पसा-यात ‘गुगल’सारख्या सर्च इंजिनमुळे कोणत्याही स्वरूपाच्या माहितीचा शोध घेणं अतिशय सोपं झालं आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जण अनेक गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांना भेटी देत असतात. कोणत्याही विषयाच्या भूत आणि वर्तमानासंदर्भातील आकडेवारी मिळण्यासाठी Wikipediaया संकेतस्थळाचा सर्रास वापर केला जातो, हे तर आपल्याला माहीतच आहे. या Wikipedia सोबत माहिती आणि आकडेवारीबरोबरच अनेक अर्थानी मिळतं-जुळतं घेणारं संकेतस्थळ म्हणजे- www.nationmaster.com होय.या संकेतस्थळावर जगातील प्रत्येक देशाची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध केलेली माहिती सीआयए वर्ल्ड फॅक्टबुक, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक अशा विविध क्षेत्रांमधल्या जागतिक पातळीवर काम करणा-या संस्थेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य संकेतस्थळांवरची माहिती वाचताना त्या माहितीच्या सत्यतेविषयी जशी शंका निर्माण होते तशी शंका या ठिकाणी निर्माण होत नाही. कारण प्रत्येक माहितीखाली त्या माहितीचा स्रोत दिलेला आहे. म्हणजे त्या माहितीवर किती विश्वास ठेवावा हे आपण ठरवू शकतो. या संकेतस्थळावर जवळजवळ जगातील सर्वच देशांची माहिती त्यांच्या नकाशासह अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सोबत प्रत्येक देशाचे राष्ट्रध्वजही दिले आहेत. यावरील Education, forumsहा विभाग आवर्जून भेट देण्यासारखाच आहे. इतकंच नव्हे तर Encyclopedia या ऑप्शनमध्ये तुम्ही स्वत:कडील, तुम्हाला ज्ञात असलेली माहितीही पाठवू शकता. अशा रीतीने अनेक विषयांची, संदर्भाची, अहवाल तसेच लेख याविषयी इतरांनी दिलेली माहिती या संकेतस्थळावर वाचायला मिळते. म्हणूनच अभ्यासपूर्ण संशोधन करणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांबरोबरच स्वत:ला अपडेट ठेवणा-या नेटप्रेमींसाठी हे संकेतस्थळ निश्चितच उपयोगी आहे. तेव्हा या संकेतस्थळाची सफर नक्कीच करा.
0 comments:
Post a Comment