नेट अपडेट- बिझी ‘बझ’
तुमच्यापैकी किती तरी जण ‘बझी’ असतीलच. काही दिवसांपूर्वीच जी-मेल आयडी ओपन करताच ‘बझ’ या ऑप्शनचा पर्याय स्वीकारणार का? असा मेसेज दिसत होता. गुगलच्या प्रत्येक नव्या ऑप्शनप्रमाणेच ‘बझ’चा युझरही झपाट्याने वाढत आहे.
सध्या सोशल नेटवर्किंग साइट्स नेटक-यांच्या हिटलिस्टवर आहेत. यामध्ये फेसबुक, हाय-फाइव, ट्विटर यांचा समावेश होतो. याची सुरुवात प्रथम गुगलनेच ऑर्कुटच्या माध्यमातून केली. मात्र नंतर आलेल्या फेसबुक आणि ट्विटरने ऑर्कुटला चांगलीच टक्कर दिली.
या दोघांनाही मागे टाकण्यासाठी गुगलने ‘बझ’ नावाचं नवीन अॅप्लिकेशन आणलं आहे. मात्र अजून ज्यांनी गुगलचा ‘बझ’ स्वीकारलेला नाही. त्यांनीही तो स्वीकारायला काहीच हरकत नाही.
गुगलच्या ‘बझ’चा वापरण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र लॉगइन करावं लागत नाही. तुमचा जी-मेल आयडी ओपन करताच इनबॉक्सच्या खाली हा नवीन पर्याय दिसतो. ‘बझ’मध्ये ट्विटरप्रमाणे वॉलपोस्ट हादेखील एक पर्याय आहे. तिथे तुम्ही तुमची मतं मांडू शकता. तुम्ही पोस्ट केलेला मेसेज तुमच्या ई-मेल आयडीमधील सर्व मित्रांपर्यंत पोहोचू शकतो. ‘बझ’ मोबाइलवरूनही ऑपरेट करता येतं. त्यासाठी http://www.google.com/intl/en/mobile/buzz यावर लॉगइन करावं लागतं.
ई-मेल चेकिंग, ऑर्कुट, ट्विटर, फेसबुक या सर्वाची एकत्रित आवृत्ती म्हणजे ‘बझ’ असं म्हणता येईल. ऑफिसमध्ये आता ऑर्कुट, फेसबुक, ट्विटरनंतर आलेल्या ‘बझ’वर बिझी होण्यास हरकत नाही.
0 comments:
Post a Comment