Friday, July 30, 2010

ई-मेलची वर्गवारी


इनबॉक्समध्ये येणा-या ई-मेलची त्यांच्या विषयानुसार वेगवेगळ्या फोल्डरमध्ये वर्गवारी करण्याची सोय जीमेलने केली आहे. त्यामुळे एखादी विशिष्ट ई-मेल शोधण्याचा त्रास आता वाचणार आहे.

एक कोटी तीस लाख लोकांकडून वापरली जाणारी, जगातील तिस-या क्रमांकाचीजी-मेलतिच्यातील अनेक सुविधांमुळे अधिक युझर फेंडली झाली आहे. जी-मेलकडून मिळणा-या अनेक नावीन्यपूर्ण सेवेमुळेच ही सेवा अधिक लोकप्रिय झाली आहे. इनबॉक्समध्ये पडणा-या मेलची आपल्या गरजेनुसार वर्गवारी करण्याची जी-मेलमध्ये सोय आहे. यामुळे तुम्हाला हव्या असणा-या मेलचा शोध स्मार्टपणे घेता येतो.

ई-मेलमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे मेल येत असतात. कधी ऑफिसच्या कामाचे, कधी आपल्या मित्र-मैत्रिणींचे, कधी आपल्या घरच्या मंडळींचे, तर कधी इतर काही गमतीच्या ई-मेल. काही दिवसांनी कोणत्या कामानिमित्त एखादी मेल चेक करायची असल्यास त्या विशिष्ट मेलचा इनबॉक्समध्ये शोध घ्यावा लागतो. जी-मेलमध्ये मेल सर्च सुविधा असली तरी असा शोध प्रत्येक वेळी घेण्यासाठी वेळ असतोच असं नाही. आपल्याला येणा-या विशिष्ट ई-मेल इनबॉक्सप्रमाणेच दुस-या एखाद्या फोल्डरमध्ये मिळाले तर मेल शोधण्याचं काम पटकन होईल. मेलची वर्गवारी करणे ही युझरची गरज विचारात येऊनच जी-मेलने एक जबरदस्त सोय केली आहे.









जी-मेलमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार मेलची वर्गवारी करू शकता. असा फोल्डर तयार करण्यासाठी जीमेलच्या settings मधील label मध्ये जाऊन तुम्ही हवा तो labsतयार करू शकता. समजा तुम्ही Home हा ’ label तयार केला. तर या मुख्य labs अंतर्गत तुम्हाला इतर labs तयार करता येतात. यासाठी जी-मेलच्या settings>>labs>> या क्रमाने जा. labs मधील Nested label हा पर्याय Enable करा.उदा- Home या labs च्या अंतर्गत kids, Shopping असे तुम्हाला हवे तसे labsतयार करू शकता. मात्र असे अंतर्गत labsतयार करताना settingsमधील labels¸मध्ये मुख्य labs¨ चं नाव लिहून स्लॅश (/) हे चिन्ह देऊन त्या अंतर्गत येणा-या labs चं नाव लिहावं लागतं. उदा- Home हा जर तुमचा मुख्य labs असेल तर त्या अंतर्गत दुसरा labs तयार करताना Home / kids असे लिहून Create वर क्लिक करा.



तुम्हाला येणारे मेल थेट तुम्ही तयार केलेल्या labsमध्येही येऊ शकतात. त्यासाठी जी-मेलमध्ये settings>Filters या क्रमाने जा. Filters¸ मध्ये Create a new filter वर क्लिक करा. त्यानंतर ओपन होणा-या विंडोमध्ये From च्या ठिकाणी तुम्हाला ज्या व्यक्तीकडून मेल येणे अपेक्षित आहे, त्याचा मेल आय-डी लिहा. आणि Next Step वर क्लिक करा. त्यानंतर येणा-या विंडोमधील Apply the Labels या पर्यायावर टिकमार्क करून त्याच्या समोरच्या बॉक्समध्ये संबंधीत व्यक्तीचा मेल कोणत्या labsमध्ये आला पाहिजे तो निवडा आणि Update Filter वर क्लिक करा.







याप्रमाणे बदल केल्यावर तुम्हाला येणा-या ई-मेलचे त्या त्या वर्गीकरणाप्रमाणे योग्य त्या labs¸मध्ये जातील. इतकंच नव्हे; तर तयार केलेल्य labs तुम्ही आकर्षक रंगही देऊ शकता. याचं वैशिष्ट म्हणजे तयार केलेला एखादा labs जरी डिलिट केला तरी त्यात आलेले मेल डिलिट होत नाहीत. तर labs डिलिट झाल्यावर त्या मेल तुमच्या इनबॉक्समध्ये जातात. जी-मेलमधील drafts मध्ये सेव्ह केलेल्या मेल्सही तुम्ही अशा प्रकारे labs मध्ये सेव्ह अथवा move करू शकता. तुमचा मेल बॉक्स अधिकस्मार्टकरण्यासाठी हा बदल तुम्ही नक्कीच कराल, यात काही शंका नाही.




Wednesday, July 21, 2010

Font for new rupee symbol of india

Check out this SlideShare Presentation:

Tuesday, July 20, 2010

भारतीय रुपया की-बोर्डवर..

भारतीय रुपयाला स्वत: ओळख तर मिळाली पण अमेरिकेच्या डॉलर किंवा युरोप्रमाणे त्याला संगणकाच्या की-बोर्डवर जागा नसल्याने निराश होण्याचं कारण नाही. कारण रुपयासाठी वापरण्यात आलेलं चिन्ह आता तुम्ही स्वत:च्या कॉम्प्युटरवर टाईप करू शकता. मंगलोर येथील फोरेडियन टेक्नॉलॉजी या कंपनीने एक फाँट तयार केला असून या फाँटमुळे तुम्ही रुपयाचे चिन्ह मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वापरू शकता.





संगणकाच्या की-बोर्डमध्ये हे चिन्ह जेव्हा येईल तेव्हा हा फॉन्ट वापरून तुम्ही हे चिन्ह आणू शकता. या लिंकवरून Rupee Foradian.ttf हा फाँट डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर हा फाँट start>>settings>> Control Panel मधील Font या फोल्डरमध्ये पेस्ट करा.





त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करून Rupee Foradian हा फाँट निवडा. मग तुमच्या की-बोर्डमधील Tab या कीच्या वर आणि Escच्या कीच्या खाली असणारी ( ~/`) की दाबली की भारतीय रुपयाचे चिन्ह उमटेल. हा फाँट कसा डाऊनलोड करायचा या संदर्भातील स्लाइड शो फोरेडियन कंपनीच्या लिंकवर देण्यात आला आहे.





Friday, July 16, 2010

मल्टिटास्किंग एपिक

इंटरनेटवर सर्च करताना एकाच वेळी विविध अ‍ॅप्लिकेशन्स वापरावी लागतात. कधी माय कॉम्प्युटर, कधी सोशल नेटवर्किंग, तर कधी वर्डची फाईल.. अशा मल्टिटास्किंग गोष्टी एकाच ब्राऊझरमध्ये उपलब्ध करण्याची सोय एका भारतीय कंपनीने केली आहे. या गुणांमुळे इंटरनेट एक्स्प्लोरर, मॉझिला फायरफॉक्स, ओपेरा, सफारी आणि गुगलचे क्रोम या प्रस्थापित वेब-ब्राऊझर्सना टक्कर दिली आहे.



सॉफ्टवेअरच्या निर्मितीमध्ये भारतीयांनी जगभरात आपला दबदबा निर्माण केला असला तरी, इंटरनेवरील अनेक सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्लिकेशन्समध्ये भारतीय नेटकरांच्या गरजांचा विचार केला जात नाही. मात्र भारतीय नेटकरांच्या गरजांचा विचार करणारं एकं नवं ब्राऊझर नुकतंच निर्माण झालं आहे.

इंटरनेट वापरताना सर्वाचा ब्राऊझरशी संबंध येतो. प्रत्येक जण स्वत:ला सहज आणि सोपा वाटेल अशा ब्राऊझरचा वापर करत असतो. मात्र अशा ब्राऊझरमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्यास युझरला वाव नसतो. गुगल क्रोमने ब्राऊझरद्वारे युझर्सना काही नवे पर्याय दिले आहेत. क्रोमनंतर असा वेगळा प्रयोग बंगळूर येथील हिडन रिफ्लेक्स या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीने केला आहे. इंटरनेट एक्सप्लोरर, मॉझिला फायरफॉक्स, ओपेरा, सफारी आणि गुगलचे क्रोम या प्रस्थापित वेब-ब्राऊझर्सना टक्कर देणा-या या नव्या इंडियन ब्राऊझरचं एपिक असं नाव आहे. हे सॉफ्टवेअर विकसित करायला हिडन रिफ्लेक्सच्या इंजिनीअर्सना दोन वर्ष मेहनत घ्यावी लागली. एपिक हाताळायला अतिशय सोपा असून त्यात अनेक अ‍ॅप्लिकेशनचा समावेश करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर त्याचा स्पीडही इतर ब्राऊझरपेक्षा अधिक जलद आहे. त्यामुळेच सध्या उपलब्ध असलेल्या ब्राऊझरपेक्षा एपिक सरस ठरतो.

इंटरनेटचा वापर करताना अनेक जणांना मल्टिटास्किंग काम करावं लागतं. हेच लक्षात घेऊन एपिकचं मल्टिटास्किंग स्ट्रक्चर करण्यात आलं आहे. त्यामुळे एपिक अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

एपिकचं वेगळेपण आहे ते त्याच्या साइडबारमध्ये. या साइडबारमुळे तुमचा इंटरनेटवरील सर्च अधिक स्मार्ट होण्यास मदत होणार आहे. कारण एपिकच्या साइडबारमध्ये तब्बल 26 अ‍ॅप्लिकेशन्स दिली आहेत. त्याचबरोबर त्यात भारतीय संस्कृती, प्रदेश, खेळ, चित्रपट, कला, निसर्ग अशा दहा विभागांतील दीड हजार थिम्स आणि वॉलपेपर्स देण्यात आले आहेत.

एपिकमध्ये विविध वैशिष्ट्यांचा भरणा आहे. इंटरनेट वापरताना तुम्हाला वर्डमध्ये काही टाईप करायचं असेल तर त्यासाठी वेगळी विंडो ओपन करायची गरज नाही कारण यावर रायटरची सोयही करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर या रायटरमध्ये तब्बल 12 भारतीय भाषांमध्ये टाईप करता येतं.


एपिकच्या साइडबारमधील इंडिया अ‍ॅप्लिकेशनमध्ये भारतातील प्रमुख वृत्तपत्रांतील बातम्या, वाहिन्यांवरील बातम्या, क्रिकेट स्कोअर, शेअर बाजारातील अपडेटही पाहू शकता. याशिवाय संगीत, भारतीय व्हिडीओदेखील तुम्हाला पाहता येतील.

इतक्या सोयी असताना सोशल नेटवर्किंगची सोय विसरून कशी चालेल? फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट आशा सोशल नेटर्किंग साइट्स त्याच्या साइडबारवर उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या ऑफिसमध्ये अशा सोशल नेटवर्किंग साइट अ‍ॅक्सेस करण्यास मनाई आहे त्यांना हा साइडबार उपयुक्तच ठरणार आहे. व्हिडीओ साइडबारमध्ये युट्यूबवरील व्हिडीओही पाहू शकता.

सर्फिग करताना अनेक वेळा कित्येक चांगल्या गोष्टी सापडतात. पण कामाच्या गडबडीत ती विशिष्ट लिंक किंवा फोटो सेव्ह करणं कधी कधी शक्य होत नाही. मात्र ही अडचण एपिकने दूर केली आहे. साइडबारमधील स्निपेट्समध्ये सर्च करत असताना सापडलेली लिंक अथवा फोटो तुम्ही तत्काळ सेव्ह करू शकता.

स्निपेट्समधील न्यू नोटमध्ये हवी असलेली लिंक किंवा फोटो केवळ ड्रॅग करून सेव्ह करता येतो.

कॉम्प्युटरमध्ये अत्यंत उपयुक्त असलेली गोष्ट म्हणजे अँटिव्हायरस. एपिकमध्ये हा अँटिव्हायरस इन-बिल्ट आहे. त्यामुळे वेगळा अँटी-व्हायरस डाऊनलोड करण्याची तुम्हाला गरज नाही. हा जगातील पहिला अँटिव्हायरस ब्राऊझर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सर्च करताना एखाद्या फोल्डरमधील फाइल ओपन करायची असल्यास प्रत्येक वेळी ब्राऊझर मिनिमाइज करावा लागतो. पण एपिक वापरताना ब्राऊझर मिनिमाइज न करता तुमच्या पीसीमधील कोणतीही फाइल तुम्ही ओपन करू शकता.

गुगल मॅपच्या मदतीने आपण जगातील कोणतंही ठिकाण पाहू शकतो. एपिकने याहीपुढे एक पाऊल टाकलं आहे. साइडबारमध्ये असलेल्या एपिक मॅपमध्ये तर तुम्ही प्रवासाचा पूर्ण मार्ग पाहू शकता. उदा. पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर ही दोन स्थळं तिथे दिलेल्या ऑप्शनमध्ये टाईप केली की तो संपूर्ण मार्ग मॅपमध्ये दाखवला जातो. प्रवास कसा करणार आहात याचेही पर्याय (रस्त्यावरून, रेल्वे.आदी) निवडू शकता. त्याचप्रमाणे तुमचा प्रवास किती किलोमीटरचा असेल? हा प्रवास रस्ता मार्गे कसा आणि किती वेळात होईल? याची माहितीही या साइडबारमध्ये दिली जाते.

तसेच विमान, रेल्वे प्रवासासाठीचं बुकिंग करू शकता. याशिवाय या साइडबारमधून जॉब सर्च करू शकता. टू डॉसमध्ये दिवसभरातील कामाच्या नोंदीही तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. वेळेचं भान ठेवण्यासाठी टायमर किंवा अलार्मदेखील सेट करू शकता.

नियमितपणे सर्च करत असलेल्या वेबसाइटची यादी सेव्ह करण्याचीही सोय कलेक्शन्स’(collections )मध्ये आहे.

एपिकमध्ये समाविष्ट केलेली अ‍ॅप्लिकेशन्स इतकी प्रभावी आहेत की ही अ‍ॅप्लिकेशन्स अन्य ब्राऊझर्समध्ये काही दिवसांनी दिसली तर अश्चर्य वाटायला नको. हा ब्राऊझर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एपिकच्या निर्मात्यांनी म्हटल्याप्रमाणे हा ब्राऊझर तुमचा New Best Friend यात काही शंका नाही.

Thursday, July 15, 2010

ऑनलाइन सूर्योदय सूर्यास्त


तुमच्या शहरातील सूर्यास्ताची वेळ पाहण्यासाठी सर्च केल्यावर सूर्यास्त केव्हा होणार आहे, याच्या नेमक्या वेळेबरोबच, त्या वेळेपासून किती तासांनी सूर्यास्त होणार आहे, असा इत्थंभूत तपशील गुगलद्वारे दाखवला जातो. त्या त्या शहराच्या स्थानिक वेळेनुसार या वेळा दाखवल्या जातात.

गुगल सर्च इंजिनमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक फिचरची माहिती नेटचा नियमित वापर करणा-याही कित्येकांना नसते. अशाच एका गुगलच्या फिचरची माहिती.. आपल्या शहरातील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पाहण्याची सोय गुगल सर्चने उपलब्ध करून दिली आहे. गुगलच्या या फिचरद्वारे तुम्ही जगभरातील सर्व शहरांतील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पाहू शकता. यासाठी गुगल सर्चमध्ये sunrise अथवा sunset आणि शहराचं नाव टाइप केलं की तुम्हाला हव्या त्या शहरातील सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ पाहता येते.

समजा तुम्ही दुपारी चार वाजता तुमच्या शहरातील सूर्यास्ताची वेळ पाहण्यासाठी सर्च केल्यावर सूर्यास्त केव्हा होणार आहे,याच्या नेमक्या वेळेबरोबच, त्या वेळेपासून किती तासांनी सूर्यास्त होणार आहे, असा इत्थंभूत तपशील गुगलद्वारे दाखवला जातो. त्या त्या शहराच्या स्थानिक वेळेनुसार या वेळा दाखवल्या जातात. गुगलशिवाय या वेबसाइटवर तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पाहू शकता. www.wolframalpha.com या साइटवर तुम्ही शोधत असलेल्या शहरात दिवसाचा कालावधी किती तासांचा आहे. याची माहिती पाहायला मिळते.

Wednesday, July 14, 2010

घरबसल्या मंगळावर

संशोधकांनी अवकाश यानाद्वारे मंगळावर पोहोचण्यात यश मिळवलं आहे. मात्र सामान्य व्यक्ती मंगळावर कधी पोहोचेल, हे आताच सांगता येणार नाही. मात्र पृथ्वीवर राहूनच मंगळ ग्रहावर राहण्याचा अनुभव घेण्याची संधी लवकरच मिळणार आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन करणा-या नासा आणि माक्रोसॉफ्ट या कंपन्या मंगळ ग्रहाची छायाचित्रे पाहण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करत आहे. या सॉफ्टवेअरमुळे मंगळाचे थ्रीडी नकाशे पाहायला मिळणार आहेत. या सॉफ्टवेअर निर्मितीसाठी माक्रोसॉफ्ट गेली तीन वर्ष काम करत आहेत. विविध अवकाश मोहिमेत नासाने काढलेले मंगळाचे फोटो आणि नकाशे या सॉफ्टवेअरमुळे सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. याचे स्वरूप सध्या गुगलअर्थ सारखे आहे. प्रत्यक्ष दिसणारा मंगळाचा पृष्ठभाग हव्या त्या पद्धतीने पाहता येणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नासामधील संशोधकांशीही थेट बोलता येणार आहे. इतकंच नव्हे; तर मंगळावरून चंद्र आणि अन्य उपग्रहांचे काढलेले फोटोही या सॉफ्टवेअरच्या द्वारे पाहायला मिळणार आहेत.

Tuesday, July 13, 2010

कार्यालयीन वेळेतील सोशल नेटवर्किंगमध्ये वाढ

ऑफिसमध्ये इंटरनेटची सोय असेल तर त्यावर टाइमपास करणे, ही नवी गोष्ट नाही. कर्मचारी कामाच्या वेळेत इंटरनेटवर सोशल नेटवर्किंग वेबसाइटला नक्कीच भेट देतात. म्हणून अनेक ऑफिसेसमध्ये अशा साइट्सवर बंदी घातली जाते. मात्र कर्मचारी काही ना काही क्लृप्त्या काढून सोशल नेटवर्किंग साइट्सला कशी भेटी देता येईल, यासाठी नेहमीच धडपडत असतात. ही गोष्ट आत्ता जागतिक पातळीवरही स्पष्ट झाली आहे. कार्यालयीन वेळेत सोशल नेटवर्किंग वेबसाइटला भेट देण्याच्या टक्केवारीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असून ती 24 टक्क्यांवर पोहोचली आहे. 2008 मध्ये हे प्रमाण 18 टक्के इतकेच होते. ग्लोबल इंटरनेट कंटेंट सिक्युरिटी प्रोव्हाइडर ट्रेंड माइक्रोने केलेल्या सव्‍‌र्हेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्किंग साइट अ‍ॅक्सेस करणे हा कार्यालयीन कामाचा भाग असल्याची कर्मचा-यांची मानसिकता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच डेस्कटॉप वापरणा-यांच्या तुलनेत लॅपटॉप वापरणा-यांकडून सोशल नेटवर्किंग साइट्सना भेट देण्याचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Monday, July 12, 2010

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी गुगलने होमपेजवर तयार केलेला लोगो

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी(हॉलंड विरुद्ध स्पेन) गुगलने होमपेजवर तयार केलेला लोगो



Friday, July 9, 2010

‘पंढरी’ची ‘वारी’ऑनलाइन

आषाढी कार्तिकीनिमित्त पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या वारीत ठिकठिकाणाहून भक्तगण सहभागी होत असतात. नेहमीच्या वारक-यासाठी ही काही नवी गोष्ट नाही. मात्र नव्याने सहभागी होणा-यांसाठी वारीला नेमकी कुठून सुरुवात करायची? हा मोठा प्रश्न असतो. मात्र 'पंढरी' आणि 'वारी' या दोन वेबसाईटच्या माध्यमातून अशा प्रश्नांची उत्तर मिळणं सोपं झालं असून वारी आता जगभरात पोहोचली आहे.

तेराव्या शतकापासून सुरू असलेल्या पंढरीची वारी वेबसाइटच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे. लाखोंच्या संख्येने वारीत सहभागी होणारे वारकरी आणि वारीचा समृद्ध इतिहासाची माहिती ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी ग्लोकल डिजीकॉमन pandhari.org नावाची एक वेबसाईट सुरू केली आहे. यामध्ये वारीचा इतिहास, वैशिष्टं, संप्रदाय,दिनक्रम आणि वारीचा मार्ग अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील संतांची परंपरा,वर्षातून होणा-या चार वारींची छायाचित्रं अशी संपूर्ण माहिती या वेबसाइटवर देण्यात आली आहे. वारीमध्ये सहभागी होऊन वारीची काढलेली छायाचित्रंही तुम्ही या वेबसाइटवर पाठवू शकता. त्याचप्रमाणे संदेश भंडारे यांनी टिपलेली वारीची दुर्मीळ छायाचित्रंही तुम्ही पाहू शकता.




www.pandhari.com या वेबसाईटच्या माध्यमातून वारीची पारंपरिक माहिती मराठीत उपलब्ध आहे, मात्र जगभरातील लोकांना वारी आणि त्याच्या भक्ती संप्रदायाची माहिती कळण्यासाठी ती इंग्रजीतून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वारीबद्दल सर्व माहिती ग्लोबल करण्याचे काम www.waari.org या वेबसाइटने केले आहे. इतकंच नव्हे तर ज्यांना कोणाला वारीला पहिल्यांदाच जायचं त्यांना नेमकी कशी आणि कुठून सुरुवात करायची याबाबत कोणालाच काहीच माहिती नसते. त्यामुळे यंदा वारीला कोणत्या दिवशी सुरुवात होणार आहे? कधी निघणार आहे? वारीचा मार्ग कसा आहे? वारीत सहभागी व्हायचं असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करावा? म्हणजेच वारीची संपूर्ण माहिती आणि वारीशी निगडीत अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसाईटमुळे सहज मिळणार आहेत. ऑनलाइनच्या जमान्यात विठ्ठलाला भेटण्याचा हा एक अनोखा मार्ग ठरू शकतो.


Tuesday, July 6, 2010

आशिया खंड टि्वट्स करण्यात आघाडीवर


गेल्या तीन महिन्यांमध्ये आशिया खंडाने ट्विट्स पोस्ट करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. अमेरिकेतून सध्या सर्वाधिक ट्विट्स पोस्ट केल्या जातात. मात्र गेल्या तीन महिन्यांत अमेरिकेतून ट्विट्स पोस्ट करण्याचे प्रमाण सात टक्क्यांनी कमी झाले असले तरी याच कालावधीत आशिया खंडामधून ट्विट्स पोस्ट करण्याचे प्रमाण 5.5 टक्क्यांनी वाढले आहे. आता हे प्रमाण 37 टक्क्यांवर गेले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आशिया खंडातील ट्विटर युझरची संख्याही वाढली आहे. जगभरातून केल्या जाणा-या एकूण ट्विट्समध्ये अमेरिकेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 25 टक्के इतके आहे. मात्र मार्च महिन्यात यामध्ये 330 टक्क्यांनी घट झाली आहे. दुस-या आणि तिस-या क्रमांकावर जपान आणि इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. जपानमधून 18 टक्के तर इंडोनेशियामधून 12 टक्के ट्विट्स केले जातात. ट्विट्स करण्यामध्ये भारताने आशिया खंडात चौथे स्थान पटकावले आहे.

Saturday, July 3, 2010

अपडेट जी-मेल पासवर्ड रिकवरी


नवीन ई-मेल आयडी खूप दिवसांत वापरला नाही की त्याचा पासवर्ड कित्येक वेळा चटकन आठवत नाही. पासवर्ड सांगायचा तरी कोणाला? आणि कुठे तरी लिहून ठेवलं तर नेमक्या वेळी आठवेलच असं नाही. मात्र गुगलने तुमची ही समस्या ओळखली असून तुम्हाला तुमचा पासवर्ड अन्य कोणत्याही ई-मेलद्वारे अथवा एसएमएसने कळू शकतो.

इंटरनेटचा वापर करताना सिक्युरिटी हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. विशेषत: ई-मेल आयडीचा पासवर्ड हॅक होणे किंवा तो विसरला गेला तर तो पुन्हा मिळवण्यासाठी जी-मेलने पासवर्ड सिक्युरिटी रिकवरीमध्ये काही नवे पर्याय दिले आहेत. तुमच्या जी-मेल आयडीचा पासवर्ड मिळवण्यासाठी गुगलने ई-मेल, एसएमएस आणि Security question असे तीन पर्याय दिले आहेत. जी-मेल आयडीच्या settings मध्ये Accounts and Import >> Change account settings या क्रमाने जा. Change account settings मध्ये Google Account settings वर क्लिक केल्यावर Recovering your password नावाचं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही तुमच्या जी-मेल आयडीचा पासवर्ड ज्या अन्य ई-मेल आयडीवर हवा आहे, तो आयडी देऊ शकता, दुस-या पर्यायामध्ये तिथे मोबाइल क्रमांक देऊन एसएमएसद्वारेही पासवर्ड मिळवू शकता तर शेवटच्या पर्यायामध्ये तुम्ही security question द्वारे पासवर्ड मिळवू शकता. तुमचा जी-मेल आयडी सुरक्षित राहण्यासाठी पासवर्ड रिकवरी पर्याय अपडेट करणे हा स्मार्ट क्लिक ठरू शकतो.

Friday, July 2, 2010

आमीर खानही ट्विटरवर


अमिताभ बच्चन यांच्या विनंतीवरून आमीरने ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटवर अकाऊंट सुरू केलं आहे. आमिरने 1 जुलैला ट्विटरवर पहिला टेस्ट मेसेज पाठवला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला फॉलो करण्यास सुरुवात केली. सध्या आमिरला फॉलो करणा-याची संख्या 46 हजारांपेक्षा जास्त आहे. चाहत्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल आमिरने त्याचे आभार मानले आहेत. आमिर सध्या केवळ बिग बी अमिताभ बच्चन यांना फॉलो करत आहे. आमिरला ट्विटरवर फॉलो करण्यासाठी http://twitter.com/aamir_khan वर लॉगऑन करा.

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP