Tuesday, July 13, 2010

कार्यालयीन वेळेतील सोशल नेटवर्किंगमध्ये वाढ

ऑफिसमध्ये इंटरनेटची सोय असेल तर त्यावर टाइमपास करणे, ही नवी गोष्ट नाही. कर्मचारी कामाच्या वेळेत इंटरनेटवर सोशल नेटवर्किंग वेबसाइटला नक्कीच भेट देतात. म्हणून अनेक ऑफिसेसमध्ये अशा साइट्सवर बंदी घातली जाते. मात्र कर्मचारी काही ना काही क्लृप्त्या काढून सोशल नेटवर्किंग साइट्सला कशी भेटी देता येईल, यासाठी नेहमीच धडपडत असतात. ही गोष्ट आत्ता जागतिक पातळीवरही स्पष्ट झाली आहे. कार्यालयीन वेळेत सोशल नेटवर्किंग वेबसाइटला भेट देण्याच्या टक्केवारीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असून ती 24 टक्क्यांवर पोहोचली आहे. 2008 मध्ये हे प्रमाण 18 टक्के इतकेच होते. ग्लोबल इंटरनेट कंटेंट सिक्युरिटी प्रोव्हाइडर ट्रेंड माइक्रोने केलेल्या सव्‍‌र्हेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्किंग साइट अ‍ॅक्सेस करणे हा कार्यालयीन कामाचा भाग असल्याची कर्मचा-यांची मानसिकता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच डेस्कटॉप वापरणा-यांच्या तुलनेत लॅपटॉप वापरणा-यांकडून सोशल नेटवर्किंग साइट्सना भेट देण्याचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP