घरबसल्या मंगळावर
संशोधकांनी अवकाश यानाद्वारे मंगळावर पोहोचण्यात यश मिळवलं आहे. मात्र सामान्य व्यक्ती मंगळावर कधी पोहोचेल, हे आताच सांगता येणार नाही. मात्र पृथ्वीवर राहूनच मंगळ ग्रहावर राहण्याचा अनुभव घेण्याची संधी लवकरच मिळणार आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन करणा-या नासा आणि माक्रोसॉफ्ट या कंपन्या मंगळ ग्रहाची छायाचित्रे पाहण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करत आहे. या सॉफ्टवेअरमुळे मंगळाचे थ्रीडी नकाशे पाहायला मिळणार आहेत. या सॉफ्टवेअर निर्मितीसाठी माक्रोसॉफ्ट गेली तीन वर्ष काम करत आहेत. विविध अवकाश मोहिमेत नासाने काढलेले मंगळाचे फोटो आणि नकाशे या सॉफ्टवेअरमुळे सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. याचे स्वरूप सध्या गुगलअर्थ सारखे आहे. प्रत्यक्ष दिसणारा मंगळाचा पृष्ठभाग हव्या त्या पद्धतीने पाहता येणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नासामधील संशोधकांशीही थेट बोलता येणार आहे. इतकंच नव्हे; तर मंगळावरून चंद्र आणि अन्य उपग्रहांचे काढलेले फोटोही या सॉफ्टवेअरच्या द्वारे पाहायला मिळणार आहेत.
0 comments:
Post a Comment