ऑनलाइन सूर्योदय सूर्यास्त
तुमच्या शहरातील सूर्यास्ताची वेळ पाहण्यासाठी सर्च केल्यावर सूर्यास्त केव्हा होणार आहे, याच्या नेमक्या वेळेबरोबच, त्या वेळेपासून किती तासांनी सूर्यास्त होणार आहे, असा इत्थंभूत तपशील गुगलद्वारे दाखवला जातो. त्या त्या शहराच्या स्थानिक वेळेनुसार या वेळा दाखवल्या जातात. गुगल सर्च इंजिनमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक फिचरची माहिती नेटचा नियमित वापर करणा-याही कित्येकांना नसते. अशाच एका गुगलच्या फिचरची माहिती.. आपल्या शहरातील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पाहण्याची सोय गुगल सर्चने उपलब्ध करून दिली आहे. गुगलच्या या फिचरद्वारे तुम्ही जगभरातील सर्व शहरांतील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पाहू शकता. यासाठी गुगल सर्चमध्ये sunrise अथवा sunset आणि शहराचं नाव टाइप केलं की तुम्हाला हव्या त्या शहरातील सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ पाहता येते. समजा तुम्ही दुपारी चार वाजता तुमच्या शहरातील सूर्यास्ताची वेळ पाहण्यासाठी सर्च केल्यावर सूर्यास्त केव्हा होणार आहे,याच्या नेमक्या वेळेबरोबच, त्या वेळेपासून किती तासांनी सूर्यास्त होणार आहे, असा इत्थंभूत तपशील गुगलद्वारे दाखवला जातो. त्या त्या शहराच्या स्थानिक वेळेनुसार या वेळा दाखवल्या जातात. गुगलशिवाय या वेबसाइटवर तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पाहू शकता. www.wolframalpha.com या साइटवर तुम्ही शोधत असलेल्या शहरात दिवसाचा कालावधी किती तासांचा आहे. याची माहिती पाहायला मिळते.
1 comments:
Khup chaan ... Apalya city che sunrise ani sunset chi vel... Nice concept.
Thanx 4 this informatiom. :- Rohan.
Post a Comment