आता फोटो आणि व्हिडिओ ट्वीट करा..
आतापर्यंत ट्विटरवर केवळ संदेश पाठवण्याची सोय होती. आपले फोटो किंवा आपल्याला आवडणारे व्हिडिओकोणाला पाठवायचे असतील तर ते पाठवता येत नव्हते. मात्र हा पर्यायही ट्विटरवर लवकरच सुरू होईल.
गेल्या काही महिन्यांमध्ये ट्विटर वापरणा-यांच्या संख्येत वाढ होत आहे. ट्विटरवर केवळ 140 शब्दांचेच संदेशपाठवता येतात. याशिवाय अन्य काही संदेश म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचे असतील तर मात्र त्यांचीलिंक पेस्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय आतापर्यंत उपलब्ध नव्हता. पण ट्विटर वापरणा-यांना लवकरच आपलेट्विट्स फोटो किंवा व्हिडिओच्या स्वरूपात पाठवता येणार आहेत. या संदर्भातील घोषणा नुकतीच ट्विटरने केलीआहे. ट्वीट्स म्हणून फोटो अथवा व्हिडिओ पाठवण्यासंदर्भातील टेस्ट सुरू असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.
तुम्हाला जर ट्विटरवरून फोटो शेअर करायचे असतील तर खालील वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही फोटो शेअरकरू शकता.
Twitpic - http://twitpic.com
Yfrog - http://www.yfrog.com
TweetPhoto - http://tweetphoto.com
Pikchur - http://www.pikchur.com
Twitgoo - http://twitgoo.com
तर खालील वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ शेअर करु शकता.
YouTube - http://www.youtube.com
Vimeo - http://vimeo.com
Twiddeo - http://beta.twiddeo.com
Twitc - http://twitc.com/?ct=1273027297&login=1&start=
Twitlens - http://twitlens.com
Tweetube - http://www.tweetube.com
0 comments:
Post a Comment