Sunday, August 22, 2010

फोल्डरची वर्गवारी

संगणकातील एकूण जागेपैकी कोणत्या ड्राइव्हने, कोणत्या फोल्डरने किती जागा वापरली आहे? याचं एकत्रितपणे विश्लेषण बघण्याची सोय नाही. पण असं झालं तर कित्येक जणांचा वेळ यामुळे वाचेल यात शंका नाही. इंटरनेटवर उपलब्ध काही सॉफ्टवेअरद्वारे हे विश्लेषण मोफत होऊ शकते. अशाच काही सॉफ्टवेअरची माहिती


संगणकावर आपल्याला हवी तेवढी फोल्डर करण्याची सोय असल्यामुळे आपण लहान लहान गोष्टींसाठी, गरज असो वा नसो फोल्डर आणि कित्येक फाइल्स तयार करतो. पण यामुळे संगणकामध्ये फोल्डरची गर्दी होते. या फोल्डरच्या गर्दीमुळे संगणकातील बरीच जागा व्यापली जाते. अशा वेळी कॉम्प्युटर हँग होतो, तेव्हा संगणकातील जागा कमी करण्याची वेळ येते. म्हणूनच फोल्डर करताना किंवा त्यांची व्यवस्थित वर्गवारी करताना कोणत्या फोल्डरने संगणकातील किती जागा व्यापली आहे, हे पाहणं आवश्यक असतं. मात्र याचं एकत्रित विश्लेषण करण्याची सोय विंडोच्या कोणत्याही आवृत्तीत नाही. हे पाहण्यासाठी प्रत्येक फोल्डर ओपन करून properties ¸मध्ये जावं लागतं. यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जातो. हा वेळ वाचवायचा असेल तर इंटरनेटवर काही मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. अशाच काही सॉफ्टवेअरची माहिती पुढे दिली आहे.



Disk Space Fan - या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही संगणकातील जागेच्या वापराचं विश्लेषण एकत्रितपणे जाणून घेऊ शकता. ही माहिती pictorial diagram ¸म्हणजेच चित्रांच्या स्वरूपात मिळते. hard disk ¸मधील एकूण जागेचा कसा वापर झाला आहे. तसंच प्रत्येक फोल्डरमधील आणि त्यातील सब-फोल्डरने किती जागा व्यापली आहे, हे सहजसोप्या स्वरूपात समजतं. या सॉफ्टवेअरमध्ये एक सर्च मारलात की तुम्हाला प्रत्येक फोल्डरच्या जागेची माहिती कळेल. इतकंच नव्हे, तर संगणकातील ऑडिओ, व्हिडिओ, इमेज, वर्ड फाइल्स अशा प्रत्येक फाइलचं स्वतंत्रपणे विश्लेषण करू शकता.





हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



Folder Size Freeware - संगणकातील जागेचा वापर आणि त्याच्या विश्लेषणाठी वापरण्यात येणारं हे एक उत्तम सॉफ्टवेअर आहे. याद्वारे तुम्ही hard disk मधील प्रत्येक फोल्डरची त्याच्या तपशिलासह माहिती मिळवू शकता. या सॉफ्टवेअरमधील अन्य पर्यायांद्वारे संगणकामधील जागेचं विश्लेषण तुम्ही pie chart, Bar chart Afd¯f animated chart स्वरूपात पाहू शकता. संगणकातील प्रत्येक drive मधील, प्रत्येक फोल्डर, सब-फोल्डर आणि त्यातील फाइल्स यांची टक्केवारीसह विश्लेषण पाहण्याची सोय या सॉफ्टवेअरद्वारे आहे.




Folder Size Freeware सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


Folder Size for Windows XP- संगणकातील जागेचं विश्लेषण करणारं, हे सॉफ्टवेअर केवळ विंडो एक्सपीसाठी वापरू शकता. विंडो विस्टा, विंडो 7 मधील explorerच्या स्वरूपात आणि विंडो एक्सपीमधील explorerच्या स्वरूपात खूप फरक आहे. म्हणूनच हे सॉफ्टवेअर केवळ एक्सपीसाठी वापरता येतं. वरील दोन सॉफ्टवेअरप्रमाणे यामध्ये ही तुम्ही संगणकातील जागेचं विश्लेषण योग्य प्रकारे करू शकता. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP