सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकची बाजी
भारतापेक्षा युरोपीय देशांमध्ये अधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकने अन्य सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘कॉम स्कोअर’ या कंपनीच्या अहवालानुसार जुलै महिन्यात फेसबुकला दररोज दोन कोटी नऊ लाख लोकांनी भेट दिली आहे. गेली काही वर्ष ब्राझील, भारत आणि अन्य देशांमध्ये ‘ऑर्कुट’ प्रथम क्रमांकावर आहे. मात्र आत्ता भारतात हा क्रमांक ‘फेसबुक’ने मिळवला आहे.
‘फेसबुक’नंतर ऑर्कुटने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक भारत ‘स्टुडेंस’चा आहे. ‘याहू पल्स’ने चौथं तर ‘ट्विटर’ने पाचवं स्थान मिळवलं आहे. ‘कॉम स्कोअर’च्या अहवालानुसार भारतात ‘फेसबुक’ला भेट देण्याच्या प्रमाणामध्ये १७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या साइटला दररोज दोन कोटी नऊ लाख लोक भेट देतात. सोशल नेटवर्किंगच्या वापरामध्ये अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया, ब्राझील आणि इंग्लंडनंतर भारताचा सातवा क्रमांक लागतो. सोशल नेटवर्किंगचा वापर करणा-यांची संख्या तीन कोटींहून अधिक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये आगामी काळात भारतही मोठी बाजारपेठ असेल, असंही कॉम स्कोअरने म्हटलं आहे.
0 comments:
Post a Comment