Friday, February 19, 2010

मातृभाषा ऑनलाइन

इंटरनेटच्या विश्वात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींची भरच पडत असते. गेल्या काही दिवसांत मात्र इंटरनेटच्या विश्वात आलेल्या नव्या गोष्टींनी सा-या नेटकरांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती गुगलच्या ‘बझ’ची. बझबरोबरच नेटविश्वात मोलाची भर घातलेल्या अन्य अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाइटची माहिती आज स्मार्ट क्लिकमध्ये करून घेऊ या.

दर चार कोसावर भाषा बदलते. त्यामुळे जितकी लोकसंख्या तितक्या भाषा निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच अन्य भाषेतील व्यक्तीशी संवाद साधताना इंग्रजीचा वापर करावा लागतो. पण प्रत्येकालाच इंग्रजी जमतंच असं नाही. अशा वेळी समोरच्या माणसाशी कसा संपर्क साधायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र गुगल इंडियाने हा प्रश्न सोडवला आहे. आपल्या मातृभाषेतच तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण Google Transliteration IMEच्या वापराने केवळ मातृभाषेतच नव्हे तर अन्य १३ भारतीय भाषांमध्येही लिहिण्याची सोय गुगल इंडियाने उपलब्ध करून दिली आहे. भारतीय नेटकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

Transliteration IME हे सॉफ्टवेअर आहे. ते एकदा तुम्ही तुमच्या संगणकावर डाऊनलोड करून घेतलं की तुम्ही १३ भारतीय भाषांमध्ये हवा तो मजकूर पाठवू शकता. सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना प्रथम भाषेची निवड करावी लागते. म्हणजेच ज्या भाषेत तुम्हाला लिहायचं आहे ती भाषा तुम्हाला निवडावी लागते. एकदा का हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं की मग हवा तो मजकूर अरबी, बंगाली, पारसी, ग्रीक, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, तामिळ, तेलुगू, उर्दू आदी भाषांमध्ये लिहू शकता. सगळ्यात महत्त्चाचं म्हणजे याचा वापर ‘जी-मेल’, ‘ऑर्कुट’ या ब्लॉगमध्येही सहज करता येणार आहे. सॉफ्टवेअर कसं डाऊनलोड करावं या विषयीची माहिती छायाचित्रासह दिली आहे.

http://www.google.com/ime/transliteration या लिंकवर क्लिक करून तुम्ही Transliteration डाऊनलोड करू शकता.

याचा उपयोग केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांबरोबरच उद्योजकांनाही होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या नोंदणीची गरज नाही. तसेच ही सुविधा ऑफलाइनदेखील उपलब्ध असल्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचंही बंधन नाही. गुगलच्या या सेवेमध्ये उपलब्ध असलेले फॉन्ट्स युनिकोड असल्यामुळे ज्या भाषेत मजकूर लिहायचा आहे त्या आणि ज्या भाषेत तो बदलणार आहे ती भाषा न दिसण्याची अडचणही निर्माण होणार नाही.

Friday, February 12, 2010

लव्ह ऑन नेट

व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यासाठी नेटवरील काही संकेतस्थळे...

व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी तुम्ही तरुणांनी इंटरनेटच्या मायाजालात प्रवेश केला नाही तर नवलच! स्वत:च्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणी भेटवस्तूंचा आधार घेतं, तर कोणी ग्रिटिंग्जचा नाही तर एसएमएस आधार घेतातच. दूरदेशी गेलेल्यांना मात्र इंटरनेटशिवाय पर्यायच नसतो.

इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करणा-या तरुणांसाठी व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यासाठी अनेक संकेतस्थळं सज्ज झाली आहेत. ही संकेतस्थळं तुम्हाला नक्कीच मदत करतील. यातील काही संकेतस्थळांवर प्रिय व्यक्तीला देण्यासाठी एखादी भेटही मिळेल. आपल्या व्हॅलेंटाइनला काय भेट द्यायची? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तरही या संकेतस्थळांवर तुम्हाला मिळेल.

तुमच्या व्हॅलेंटाइनला भेट पाठवण्यासाठी काही उपयुक्त संकेतस्थळं


www.mydearvalentine.com
www.indiawithlove.com
www.valentines-corner.com
www.poemsource.com/valentine-poems.html
www.valentinesdaymovie.com
www.valentineday.in
www.stvalentinesday.org
www.valentinedaygift.co.in
www.valentinedayecards.com
www.valentinedayflowers.org
www.valentine-card.com


व्हॅलेंटाइन्स डेला मराठीतून एसएमएस पाठवण्यासाठी ही लिंक उपयुक्त आहे.

http://www.smsdose.com/Marathi_SMS_1.htm

Friday, February 5, 2010

माहितीचा खजिना

www.nationmaster.com या संकेतस्थळावर जगातील प्रत्येक देशाची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध केलेली माहिती सीआयए वर्ल्ड फॅक्टबुक, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक अशा विविध क्षेत्रांमधल्या जागतिक पातळीवर काम करणा-या संस्थेकडून देण्यात आली आहे.

इंटरनेटच्या पसा-यात ‘गुगल’सारख्या सर्च इंजिनमुळे कोणत्याही स्वरूपाच्या माहितीचा शोध घेणं अतिशय सोपं झालं आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जण अनेक गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांना भेटी देत असतात. कोणत्याही विषयाच्या भूत आणि वर्तमानासंदर्भातील आकडेवारी मिळण्यासाठी Wikipediaया संकेतस्थळाचा सर्रास वापर केला जातो, हे तर आपल्याला माहीतच आहे. या Wikipedia सोबत माहिती आणि आकडेवारीबरोबरच अनेक अर्थानी मिळतं-जुळतं घेणारं संकेतस्थळ म्हणजे- www.nationmaster.com होय.

या संकेतस्थळावर जगातील प्रत्येक देशाची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध केलेली माहिती सीआयए वर्ल्ड फॅक्टबुक, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक अशा विविध क्षेत्रांमधल्या जागतिक पातळीवर काम करणा-या संस्थेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य संकेतस्थळांवरची माहिती वाचताना त्या माहितीच्या सत्यतेविषयी जशी शंका निर्माण होते तशी शंका या ठिकाणी निर्माण होत नाही. कारण प्रत्येक माहितीखाली त्या माहितीचा स्रोत दिलेला आहे. म्हणजे त्या माहितीवर किती विश्वास ठेवावा हे आपण ठरवू शकतो. या संकेतस्थळावर जवळजवळ जगातील सर्वच देशांची माहिती त्यांच्या नकाशासह अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सोबत प्रत्येक देशाचे राष्ट्रध्वजही दिले आहेत. यावरील Education, forumsहा विभाग आवर्जून भेट देण्यासारखाच आहे. इतकंच नव्हे तर Encyclopedia या ऑप्शनमध्ये तुम्ही स्वत:कडील, तुम्हाला ज्ञात असलेली माहितीही पाठवू शकता. अशा रीतीने अनेक विषयांची, संदर्भाची, अहवाल तसेच लेख याविषयी इतरांनी दिलेली माहिती या संकेतस्थळावर वाचायला मिळते. म्हणूनच अभ्यासपूर्ण संशोधन करणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांबरोबरच स्वत:ला अपडेट ठेवणा-या नेटप्रेमींसाठी हे संकेतस्थळ निश्चितच उपयोगी आहे. तेव्हा या संकेतस्थळाची सफर नक्कीच करा.

Friday, January 15, 2010

वी कॅन नॉट लिव्ह विदाऊट

इंटरनेटचा वापर करणारे सर्व जण काही विशिष्ट संकेतस्थळांना नियमित भेट देतात. अनेक वर्ष ही संकेतस्थळं ‘फेव्हरिट’ लिस्टमध्ये विराजमान असतात. अशाच संकेतस्थळांची यादी ‘टाइम’ मासिकाने नुकतीच ‘वी कॅन नॉट लिव्ह विदाउट’ या नावाने प्रसिद्ध केली आहे.

इंटरनेटचा वापर करणारे सर्व जण काही विशिष्ट संकेतस्थळांना नियमित भेट देतात. अनेक वर्ष ही संकेतस्थळं ‘फेव्हरिट’ लिस्टमध्ये विराजमान असतात. अशाच संकेतस्थळांची यादी ‘टाइम’ मासिकाने नुकतीच ‘वी कॅन नॉट लिव्ह विदाउट’ या नावाने प्रसिद्ध केली आहे. मात्र त्यातील काही संकेतस्थळांचे संदर्भ अमेरिकेशी निगडित असले तरी त्यातील काही संकेतस्थळं आपल्या चांगल्याच उपयोगाची आहेत. त्यांची यादी खाली दिली आहेच पण त्याचबरोबर भारतातील नेटवेडय़ामध्ये बुकमार्क असणा-या संकेतस्थळांची यादीही सोबत दिली आहे. जी ‘कॅन नॉट लिव्ह विदाउट..’ अशीच आहेत.

टाइम मासिकाची यादी

www.amazon.com

www.bbc.co.uk

www.citysearch.com

www.sfbay.craigslist.org

www.del.icio.us

www.digg.com

www.ebay.com

www.espn.go.com

www.facebook.com

www.factcheck.org

www.flickr.com

www.google.com

www.howstuffworks.com

www.imdb.com

www.youtube.com

www.kayak.com

www.nationalgeographic.com

www.netflix.com

www.technorati.com

www.22.tmz.com

www.usa.gov

www.televisionwithoutpity.com

www.webmd.com

www.wikipedia.org

www.yahoo.com


भारतातील बुकमार्क संकेतस्थळं

www.google.co.in

www.yahoo.com

www.facebook.com

www.orkut.co.in

www.blogger.com

www.youtube.com

www.rediff.com

www.wikipedia.org

www.orkut.com

www.twitter.com

www.indiatimes.com

www.linkedin.com

www.live.com

www.wordpress.com

www.cricinfo.com

www.msn.com

www.in.com

www.1e100.net

www.microsoft.com

www.rapidshare.com

www.admagnet.net

www.irctc.co.in

www.naukri.com

www.clicksor.com

Friday, January 8, 2010

बेस्ट ऑफ २००९

२०१० मधील काही रॉकिंग संकेतस्थळांची यादी मागील आठवड्यात पाहिलीच आहे. या लेखात २००९ सालातील काही गाजलेल्या संकेतस्थळांची यादी स्मार्ट क्लिच्या वाचकांसाठी देत आहोत.

टाइम्स मासिकाने २००९ मधील उत्तम संकेतस्थळांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील काही संकेतस्थळं परिचयाची तर काही अनोळखी असतील. या यादीमधील अनेक संकेतस्थळं आपल्याशी थेट संबंधित नसली तरी या संकेतस्थळांवर क्लिक केल्यावर नक्कीच एक वेगळा अनुभव मिळतो. या यादीमधील काही संकेतस्थळांची थोडक्यात ओळख-

स्कइप संकेतस्थळावरून तुम्हाला विनामूल्य व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो. इंटरनेटच्या युगात अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. शिक्षणक्षेत्रही याला अपवाद नाही. टाइम्स मासिकाच्या यादीमधील academicearth.org या संकेतस्थळावरून तुम्ही अनेक विषयांचं ऑनलाइन शिक्षण घेऊ शकता. हे शैक्षणिक लेक्चर अटेंड करायला तुम्हाला नक्की आवडेल. ऑनलाइन रेडिओसाठी Pandora/last.fm ही दोन संकेतस्थळं आवर्जून क्लिक करावी अशीच आहेत. यादीमधील सर्व संकेतस्थळांची थोडक्यात माहिती या सदरातून देणे शक्य नाही. मात्र या यादीत अनेक विषयांना सामावून घेतले आहे. यात ऑनलाइन गेम्स, पर्यटन, सोशल नेटवर्किंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्युझिक अशा अनेक विषयांवरील संकेतस्थळांचा समावेश आहे. म्हणून एखाद्या अनोळखी संकेतस्थळावरचा तुमचा क्लिक वाया जाणार नाही, हे मात्र निश्चित.


संकेतस्थळांची यादी-


www.flickr.com

www.californiacoastline.org


http://delicious.com


www.metafilter.com


http://popurls.com


http://twitter.com


www.skype.com


www.boingboing.net


www.academicearth.org


www.opentable.com


www.google.co.in


www.youtube.com


www.wolframalpha.com


www.hulu.com


www.vimeo.com


http://fora.tv


www.craiglook.com


www.shopgoodwill.com


www.amazon.com


www.kayak.co.in


www.etsy.com


www.propertyshark.com


www.redfin.com


www.wikipedia.org


www.archive.org


www.kiva.org


www.consumersearch.com


www.metacritic.com


www.pollster.com


www.pandora.com/www.last.fm

www.facebook.com


www.musicovery.com


www.spotify.com


www.supercook.com


www.yelp.com


www.visuwords.com


www.couchsurfing.org


www.babynamewizard.com


www.mint.com


www.tripit.com


http://drop.io


http://issuu.com


http://photosynth.net


www.omgpop.com


www.worldwidetelescope.org


http://fonolo.com


http://gethighnow.com


http://knowyourmeme.co


Friday, January 1, 2010

नेट अपडेट- रेडिफ ब्लॉग आठ भाषांमध्ये..

ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळत असल्यामुळे इंटरनेवर ब्लॉग लिहिणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच इंटरनेच्या माध्यमातून विविध सेवा देणा-या आघाडीच्या कंपन्यांनीही आता ब्लॉगची सेवा सुरू केली आहे. ब्लॉगच्या या विश्वात रेडिफने पाऊल ठेवलं असून, ऑनलाइन बातम्या, माहिती, मनोरंजन, शेअर बाजार इत्यादी विषयांची सेवा देणा-या रेडिफने ब्लॉगची सोय सुरू केली आहे. ब्लॉगची वाढती संख्या लक्षात घेता रेडिफने ही सेवा नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये मराठीचाही समावेश आहे. रेडिफ ब्लॉगद्वारे व्यक्त होण्यासाठी भेट द्या- http://blogs.rediff.com

२०१० रॉकिंग वेबसाइट्स

आज नववर्षातील पहिला दिवस. २००९ सालाला निरोप देण्यासाठी ज्यांनी थर्टी फर्स्ट पार्टीजमध्ये खूप धम्माल केली त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीसा उशिरानेच उगवेल. तर पहाटे लवकर उठणं, व्यायाम करणं अशा स्वरूपाचे संकल्प केलेल्यांसाठी आजची सकाळ थोडी लवकर सुरू झाली असेल.


नव्या वर्षात जशी नव्या संकल्पांची अमलबजावणी सुरू होते, तसंच सरलेल्या वर्षाचं पुनरावलोकनही केलं जातं. नेट विश्वातही गेल्या वर्षभरात विविध घटना झाल्या. काही नव्या गोष्टींची सुरुवात २००९ मध्ये झाली आहे. प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची नोंद घेतली जाते आणि त्यांना पुरस्कार दिले जातात, त्याचप्रमाणे इंटरनेटच्या विश्वातही प्रत्येक संकेतस्थळाची कामगिरी तपासली जाते. उत्कृष्ट संकेतस्थळांची यादी जाहीर केली जाते.


गेली काही वर्ष नेटविश्वात गाजलेल्या संकेतस्थळांमध्ये फेसबुक, ट्विटर, हुलू या संकेतस्थळांचा समावेश होता. २०१०मध्ये जी संकेतस्थळं त्यांच्यावर असलेल्या माहितीमुळे नेटविश्वात आघाडीवर राहण्याची शक्यता आहे त्यांची इथे थोडक्यात यादी दिली आहे. या संकेतस्थळांवर गेल्यास तुम्हाला कुठे थिम्स, कुठे ऑर्कुट, फेसबुक यासारख्या कम्युनिटी साईट्स पाहायला मिळतील. इतकंच नव्हे तर दैनंदिन जीवनातील घडामोंडींविषयी काही माहिती, टी.व्ही.वरच्या एखाद्या मालिकेचा एखादा एपिसोड किंवा कोणत्याही प्रकारची आवडती गाणी यांचा मनमुराद आनंद लुटू शकता. त्यावरील माहितीच्या खजिन्याचा उपयोग करून घेऊ शकता. आगामी वर्षात वेगाने वाटचाल करू शकतील अशा संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे.


संकेतस्थळांची यादी


www.tv.com
www.boxee.tv
www.CrackBerry.com
www.loopt.com
www.blip.fm
www.power.com
www.tweetag.com
www.hi5.com
www.tripit.com
www.qik.com

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP