काही मराठी वेबसाइटस्..
इंटरनेटवरील मराठी वेबसाइटचा टक्का तसा कमीच आहे. त्यामुळे मराठीमधील सर्वोत्तम गोष्टींची माहिती इंटरनेवर इंग्रजीच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र हा मराठीचा टक्का वाढवण्यासाठी मदत करतील अशा काही वेबसाइट्सची निर्मिती झाली आहे. मराठी भाषा जागतिक पातळीवर पोहोचण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा मराठी वेबसाइटसाठी इंटरनेटवर असलेला स्कोप विचारात घेता हा प्रयत्न निश्चितच महत्त्वाचा आहे. या वेबसाइटविषयीची थोडक्यात माहिती या वेळीच्या स्मार्ट क्लिकमधून..
थिंक महाराष्ट्र
महाराष्ट्राचे सामर्थ्य जगासमोर प्रगट होऊन महाराष्ट्रातील लोकांचा चांगुलपणा, गुणवत्ता यांची माहिती सर्वदूर पसरण्यासाठी ‘थिंक महाराष्ट्र’ या वेबसाइटची निर्मिती झाली आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मराठी कर्तृवाची नोंद घेणे, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीच्या कार्याचा आढावा घेण्याबरोबरच मराठी समाज आणि संस्कृती यांच्याविषयी विकिपिडियाप्रमाणे माहितीचे संकलन करणे असा मुख्य उद्देश या वेबसाइटच्या निर्मितीमागे आहे. ‘थिंक महाराष्ट्र’ ही केवळ एक वेबसाइट म्हणून नव्हे तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत होणा-या नव्या आणि चांगल्या गोष्टींना देण्यात आलेले एक प्रकारचे प्रोसाहनच आहे. ‘थिंक महाराष्ट्र’च्या या उपक्रमाची व्याप्ती समजून घेण्यासाठी आणि त्यामधील सहभागी होण्यासाठी हा क्लिक आवश्यकच ठरतो.
वेबसाईट : www.thinkmaharashtra.in
‘मराठीसृष्टी’ नव्या स्वरूपात
मराठी संकेतस्थळांना भेटी देणा-यांना ‘मराठीसृष्टी’ हे नाव अनोळखी नाही. मराठीतील उत्तम गोष्टी इंटरनेटमार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दहा वर्षांपूर्वीच या वेबसाइटची सुरुवात झाली असली तरी आता ही वेबसाइट नव्या स्वरूपात येत आहे. या वेबसाइटवर वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणा-या दोन हजार व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे. केवळ माहितीच नव्हे तर त्यांची छायाचित्रं, ध्वनिफिती आणि चित्रफिती इ. संदर्भकोषही देण्यात आले आहेत. याशिवाय मराठीशी निगडित वेबसाइट्सची सूची, लेखसंग्रह, मराठी सॉफ्टवेअर आदी विभाग आहेत. इतकंच नव्हे तर तुम्हीदेखील यात सहभागी होऊ शकतात. तुम्हाला माहिती असलेल्या मराठी व्यक्ती, त्यांची माहिती, त्यांची छायाचित्रं याविषयीची माहिती अपलोड करू शकतात. मराठीसृष्टीसाठी लॉगऑन करण्यासाठी अॅड्रेसबारवर www.marathisrushti.com असं टाइप करावं.
साहित्य संमेलन व्हाया ऑनलाइन
मराठीच्या पताका जगभर पोहोचवण्यासाठी बदलत्या काळानुसार केवळ देशात होणा-या साहित्य संमेलनाबरोबरच ‘विश्व साहित्य संमेलना’चं आयोजन सुरूझालं आहे. मराठीची ख्याती जगभर पोहोचवण्यासाठी आयोजकही ही संमेलनं वेबसाइटच्या माध्यमातून हायटेक करत आहेत.
दुबई येथे कालपासून सुरू झालेल्या दुस-या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी कित्येक जणांना इच्छा असूनही प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही. मात्र त्यांना विश्व साहित्य संमेलनाची सगळी माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. याशिवाय वेबसाइटवर मराठीमधील काही उत्तम संकेतस्थळांची लिंक देण्यात आली आहे. दुबई साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी www.mmdubai.org या संकेतस्थळावर लॉगऑन करा. तर पुण्यात होणा-या 83 व्या मराठी साहित्य संमेलनचा वेबसाइटच्या माध्यमातून आढावा घेण्यासाठी www.sahityasammelan2010.com या वेबसाइटवर लॉगऑन करा. या दोन्ही वेबसाइट्स ऑर्कुट, ट्विटर आणि फेसबुक अशा सोशल नेटवर्किंग साइटबरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर ब्लॉगच्या माध्यमांतूनही या वेबसाइट्स इंटरअॅक्टिव्ह करण्यात आल्या आहेत. मराठीची पताका जगभर पोहोचवणा-या या साहित्य चळवळीत वेबसाइटच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवण्यास हरकत नाही.
2 comments:
Great to see your blog. It is really very interesting.
Send Gifts & Flowers to India please visit.
http://www.indiangiftscenter.com
Great blogs! I am impressed at your work!
Keep up the great work and Info.
http://www.bangaloreonlinegifts.com
Post a Comment