Monday, May 31, 2010

नेट अपडेट- पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही फेसबुकवर बंदी

प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या व्यंगचित्रांची स्पर्धा घेतल्याच्या निषेधार्थ बांगलादेशात फेसबुकवर बंदी घालण्यात आली आहे.फेसबुकवर देशातील अनेक नेत्यांची निंदा करणारी छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचे कारणही या बंदी मागे असल्याचे सांगितले जाते.

बांगलादेशमध्ये दहा लाख लोक इंटरनेटचा वापर करतात. या संदर्भात अधिकृत घोषणा केली नसली तरी बांगलादेशच्या दूरसंचार नियामक आयोगाच्या अधिका-याच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मार्च महिन्यात बांगलादेशने यू ट्यूबवर बंदी घातली होती.

Saturday, May 29, 2010

‘गुगल’ टीव्ही


इंटरनेट म्हणजे गुगल, गुगल म्हणजे इंटरनेट असे समीकरण बनलेल्या या सर्च इंजिनने गुगल टीव्हीची घोषणा(फोटो फिचर) केली आहे. गुगलने या टीव्हीचा TV meets web, Web meets TV उल्लेख असा केला आहे. गुगलच्या या टीव्हीवर विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमांबरोबरच इंटरनेटचा वापरही करता येणार आहे. गुगल टीव्हीमध्ये क्रोमा इनबिल्ट असणार आहे. त्यामुळे तुम्ही आवडत्या वेबसाइटला भेट देऊ शकता. गुगलच्या अधिकृत ब्लॉगवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गुगलच्या या टीव्हीवर तुम्ही वाहिन्या, कार्यक्रम, चित्रपट पाहू शकता तसेच वेबसाइटही सर्च करू शकता. त्यामुळेच गुगलचा हा टीव्ही अनेक अर्थाने स्मार्ट ठरणार आहे. गुगल टीव्हीवर तुमचे आवडते नाटक, सिरिअल सर्च करून पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर यू टय़ूबचे व्हिडिओही तुम्ही पाहू शकणार आहात. तुमच्या आवडत्या विषयासंदर्भातील कार्याक्रम पाहायचे असतील. मात्र ते कोठे पाहायचे, हे तुम्हाला माहीत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण गुगल टीव्हीवर असा सर्च दिला की तुम्हाला हव्या असलेल्या कार्यक्रमाची यादीच वाहिन्या आणि इंटरनेट अशा दोन विभागांत मिळणार आहे. त्याचबरोबर गुगल स्टँडर्ड प्रोग्रॅम गाइडही तुमच्या सेवेला असणार आहे. गुगल टीव्हीमध्ये photo slideshow viewer, a gaming console, a music player अशा अन्य सुविधा उपलब्ध असणार आहेत.

विशेष म्हणजे गुगलने ही घोषणा केल्याबरोबर गुगल टीव्हीवर जाहिराती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

गुगल टीव्हीच्या या निर्मितीमध्ये इंटेल, सोनी आणि लॉजिटेक या कंपन्यांचाही सहभाग असणार आहे. गुगल टीव्हीसाठी लागणारा सेट टॉप बॉक्स, लहान की-बोर्ड, रिमोर्ट कंट्रोल या कंपन्या निर्माण करणार आहेत. गुगल टीव्हीची किमत किती असेल याची अद्याप कोणतीही माहिती गुगलने दिली नसली तरी 2010 च्या अखेर हा टीव्ही अमेरिकेतील बाजारपेठत दाखल होणार आहे. तर अन्य ठिकाणी हा 2011 मध्ये मिळणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगल टीव्हीसाठी तुमच्याकडील इंटरनेटचा वेग तीन एमबीपीएस इतका आवश्यक आहे. एअरटेलने भारतात 899 रुपयांमध्ये चार एमबीपीएस इतका वेग उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्ही इंटरनेटचा अमर्यादित वापर करू शकता. त्याचबरोबर भारतातील Broadband सेवेच्या किमती आणखी काही दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे.
गुगल टीव्हीच्या संदर्भातील अपडेट ई-मेलवर मिळवा.


Thursday, May 27, 2010

नेट अपडेट- ‘ओपन’बुक


आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये सातत्याने बदल केल्यामुळे सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबुक गेल काही दिवस चर्चेत आहे. आतापर्यंत फेसबुकवरील एखाद्या युजरची माहिती केवळ फेसबुकचे सदस्य असलेल्या व्यक्तीला पाहता येत होती. मात्र फेसबुकने 21 एप्रिलपासून ही माहिती सर्वाना दिसेल असे बदल केल्यामुळे नेटवर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक वापरणा-या अनेकांनी हा प्रकार म्हणजे आपल्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण असल्याची तक्रार केली.फेसबुकच्या या वारवांर बदलणा-या नियमाचे अपडेट देण्यासाठी सॅन फ्रॅन्सिसको येथील चार तरुणांनी युअरओपनबुक (http://youropenbook.org) ही वेबसाइट तयार केली आहे.

या वेबसाइटचा हेतू फेसबुकशी स्पर्धा करण्याचा नसून केवळ फेसबुकमधील प्रायव्हसी पॉलिसी कशा प्रकारची हवी, याची सूचना देण्याचा आहे. फेसबुकने आपल्या नियमामध्ये कोणते बदल करावेत, याची माहिती या वेबसाइटवर देण्यात आली आहे. 12 मे रोजी सुरू झालेल्या या वेबसाइटला फेसबुकच्या सदस्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, फेसबुकने गुरुवारी (27 मे) पुन्हा आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. फेसबुक वापरणा-याची खासगी माहिती कोणाला पाहता यावी, या संदर्भातील अधिकार पुन्हा युजरच्या हाती देण्याचा निर्णय फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग जाहीर केला आहे.

Sunday, May 23, 2010

नेट अपडेट- गुगल टिव्हीची घोषणा (फोटो फिचर)

गुगलने 23 मे 2010 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे गुगल टिव्हीची घोषणा केली त्यावेळीचे फोटो









Saturday, May 22, 2010

नेट अपडेट- फेसबुकची आघाडी

इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकचे फेब्रुवारी 2010 मध्ये 400 दशलक्ष सभासद झाले आहेत. येत्या काही महिन्यांतच ही संख्या 600 दशलक्ष इतकी होईल, असा फेसबुकला विश्वास आहे.

वाढत्या सभासदांबरोबरच फेसबुकची कमाईमध्येही वाढ होत असून या आर्थिक वर्षात ही कमाई एक अब्जची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.

Friday, May 21, 2010

नेट अपडेट- दोन अब्ज व्ह्युवर्स

व्हिडिओ शेअरिंगसाठी सर्वाधिक प्रसिद्ध असणा-या यू टय़ूबने आपला पाचवा वाढदिवस नुकताच साजरा केला. यू टय़ूबच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार यू टय़ूबला दररोज दोन अब्ज लोक भेट देतात. यू टय़ूबची कमाई आहे वर्षाला एक अब्ज.

ब्रॉडकास्ट युवरसेल्फ म्हणणा-या यू टय़ूबवर 23 एप्रिल 2005 रोजी पहिला व्हिडिओ अपलोड करण्यात आला. त्यानंतर पाच वर्षाच्या आतच व्हिडिओ शेअरिंग वेबसाइटच्या यादीत यू ट्यूबने पहिला क्रमांक पटकावला. जगभरात सर्वाधिक पाहिल्या जाणा-या वेबसाइटच्या यादीमध्ये यू टय़ूबचा तिसरा क्रमांक लागतो.

यू टय़ूबने पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर एक विशेष व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ पाहण्यासाठीची लिंक - http://www.youtube.com/user/FiveYear

Thursday, May 20, 2010

बिग बी ट्विटरवर

मायक्रो ब्लॉगिंगमध्ये प्रसिद्ध असणा-या ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या ट्विटरवर येत आहेत. आतापर्यंत बिगअड्डा द्वारे ब्लॉगिंग करणा-या अमिताभ बच्चन यांनीही ट्विटर जॉइन केलं आहे. अमिताभ यांनी 18 मे रोजी ट्विटर जॉइन केलं. सध्या अमिताभचे 55 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर स्वत: अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सचिन तेंडुलकर आणि सुहेल सेट यांना फॉलो करत आहे. अमिताभला ट्विटरवर फॉलो करण्यासाठी http://twitter.com/SrBachchan लॉगऑन करा.

Saturday, May 15, 2010

अपटुडेट मुंबई

देशाची आर्थिक राजधानी असलेल्यामुंबईची माहिती देणा-या अनेकवेबसाइट्स आहेत. मात्र त्यावेबसाइट्सवरून कधी कधीकोप-यातले स्थानिक संदर्भ शोधणंकठीण जातं. मुंबईतील अशा अनेककानाकोप-यांतील स्थानिकसंदर्भाची माहिती आता यावेबसाइटद्वारे तुम्हाला घरबसल्या कळणार आहे.

सर्वसाधारणपणे मुंबईमधील प्रसिद्ध अशा किती तरी गोष्टींची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. मात्र त्या पलीकडे अनेक महत्त्वाचेबारीकसारीक संदर्भ हवे असतीलतर मात्र इंटरनेटवर बरंच सर्च करावं लागतं. मुंबईत राहणा-यातसंच मुंबईत नव्याने येणा-यालोकांसाठी उपयुक्त अशी वेबसाइट म्हणजे www.topmumbai.com होय.


मुंबईत सर्वाधिक इंटरनेटचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक व्यवहारही इंटरनेटच्या माध्यमातून होतात. मुंबईतील प्रत्येक महत्त्वाच्या संघटना अथवा सेवा देणा-या सार्वजिनक संस्था यांची स्वतंत्र वेबसाइट आहे. मात्र इंटरनेट वापरणा-या प्रत्येकाला या वेबसाइटची माहिती असतेच असं नाही. अशा वेबसाइट शोधायच्या म्हटल्या तरी प्रत्येक वेळी गुगल सर्चची मदत घ्यावी लागते. त्यातून आपल्याला हवी असलेली वेबसाइट शोधावी लागते. www.topmumbai.com बेवसाइटमधील important contactया विभागात मुंबईकरांच्या गरजेच्या सर्व महत्त्वाच्या बेवसाइट्सची लिंक एकाच ठिकाणी देण्यात आली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित वेबसाइट, कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित यंत्रणा, मुंबईतील व्यापार आणि उद्योग जगताच्या संदर्भातील संघटना, इतर काही महत्त्वाच्या माध्यम संस्था, आरोग्य, शिक्षण, हवामान आदी क्षेत्रांतील महत्त्वाच्या वेबसाइटची थेट लिंकही या ठिकाणी देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही थेट त्या संबंधित वेबसाइटवर पोहोचता.


इतकंच नव्हे; तर मुंबईतील विभागानुसार असलेले तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या रुग्णालयांचे पत्तेही या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याच बरोबर मुंबतील ट्रॅव्हल एजंट, हॉटेल, रु ग्णालये, आयटी कंपन्या, विविध उद्योगांपासून ते महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांची यादी त्यांच्या मोबाइल क्रमांकासह या ठिकाणी देण्यात आली आहे. मुंबईतील चित्रपटगृहं, शाळा, महाविद्यालयं, सामाजिक संस्था, सुपर मार्केट आणि मॉलचे पत्तेदेखील या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.


या वेबसाइटच्या निर्मात्यांनी मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वाचे संदर्भ एका क्लिकवर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे महामुंबईच्या एवढ्या मोठ्या पसा-यात अनेक महत्त्वाचे स्थानिक संदर्भही topmumbai वर अगदी कमीत कमी वेळात सापडतात. याशिवाय मुंबईविषयी माहिती, बातम्या, महत्त्वाच्या विषयावरील लेख या वेबसाइटवर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत उपलब्ध रोजगाराच्या संधीविषयक माहितीही या ठिकाणी उपलब्ध आहे.


मुंबईतील सर्व इत्थंभूत माहितीइतक्या सहज आणि पटकनउपलब्ध करून दिल्यामुळेच हीवेबसाइट -या अर्थाने टॉप ठरलीआहे. केवळ मुंबईत राहणा-या नाहीतर मुंबईच्या बाहेरील नेटकरासाठीमुंबईतील अनेक स्थानिक संदर्भमाहिती करून घेण्यासाठी हीवेबसाइट नक्कीच उपयोगी आहे. या वेबसाइटला भेट दिल्यानंतर तीतुमच्या बुकमार्कमध्ये नक्कीच समाविष्ट होईल.

Saturday, May 8, 2010

गुगल मोबाईल रिमाइंडर


मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस लक्षात ठेवायचे असतात.. तर कधी महत्त्वाच्या मीटिंगला जायचं असतं. कधी कोणालापरीक्षेच्या शुभेच्छा द्यायच्या असतात.. मात्र कामाच्या गडबडीत यापैकी काही गोष्टी निसटतात. दुस-या कोणालासांगायचं तरी तेदेखील त्यांच्या कामात मग्न असतात. हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी गूगलने ‘रिमाइंडर कॅलेंडर’ तयार केलं आहे.

एखाद्याला भेटण्यासाठी वेळ दिला आहे, मात्र कामाच्या गडबडीत विसरल्यामुळे त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेण्याचीवेळ तुमच्यावर कधीना कधी आली असेलच. नियोजित वेळी ठरवलेल्या भेटीच्या काही तास आधी आठवण करूनदेणारं कोणी असेल तर काम किती सोप होईल, असा विचारही पटकन तुमच्या मनात डोकावून जातो. यासाठीआपण घरातल्या एखाद्या व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला अथवा ऑफिसमधील सहका-याची नेमणूक केली तरीत्यांच्याकडून वेळेवर आठवण केली जाईल, याची खात्री मिळत नाही. कारण तेदेखील तुमच्याप्रमाणे कोणत्या नाकोणत्या कामात व्यस्तच असतात. अशा वेळी कामाच्या व्यापात बुडालेले असताना नकळत विसरल्या जाणा-यागोष्टींची आठवण करून देणारी काही तरी सोय असावी, असं नेहमीच वाटत असतं. या समस्येवर गुगलने तोडगाकाढला असून ‘गुगल कॅलेंडर’ असं त्याचं नाव आहे.


गुगल कॅलेंडरद्वारे तुम्हाला हव्या त्या गोष्टीचा रिमाइंडर एसएमएसद्वारे मोबाइलवर, ईमेलवर मिळवू शकतात. गुगल कॅलेंडरचा वापर करायचा असेल तर त्याआधी गुगलच्या होम पेजवर जावं लागेल. या होमपेजवर ‘मोअर’ नावाच्या ऑप्शनमध्ये गुगलकडून उपलब्ध झालेल्या अन्य सुविधांची यादीही तुम्हाला दिसेल. त्यातल्याचकॅलेंडर’ या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही वापरत असलेल्या जी-मेल आयडीने त्यावर लॉगइन करा. तुमच्यागुगल कॅलेंडरच्या होम पेजवर महिन्याचं कॅलेंडर, संपर्क किंवा अन्य काही पर्याय दिसतील. कॅलेंडरच्या डाव्याबाजूला त्या महिन्याचं कॅलेंडर दिसेल. ज्या विशिष्ट तारखेला जी नोंद करावयाची आहे, ती नोंद त्या तारखेवर एकाक्लिकने करू शकता. या नोंदीची आवश्यक ती सर्व माहिती तपशिलासह देऊ शकता.


हो, पण नोंद केली की तुमचं काम संपत नाही. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करावी लागते. ती म्हणजे, केलेली नोंदमोबाइलवर रिमाइंडर म्हणून लावण्यासाठी सेटिंग्जमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला तुमच्या नोंदीचारिमाइंडर मिळू शकेल.


जीमेलप्रमाणेच गुगल कॅलेंडरच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला Settings नावाचा पर्याय दिसेल. Settings मध्ये General नावाचा पर्याय आहे. यात कॅलेंडरचं स्वरूप, वेळ, हवामान व अन्य सोयी यांचा अग्रक्रम किंवा त्यांचंस्वरूप आवडीप्रमाणे निवडता येईल. दुसरा पर्याय Calendars. यामध्ये नव्या कॅलेंडरचा समावेश आणि अन्यकाही गोष्टी दिसतील. तिसरा पर्याय Mobile Setup. यामुळे तुम्हाला मोबाइलमध्ये रिमाईंडर मिळेल. या ठिकाणीआपला देश आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागतो. त्याखाली सेंड व्हेरिफिकेशन कोडवर क्लिक करा. काहीसेकंदांतच तुमच्या मोबाइलवर व्हेरिफिकेशन कोड येईल. तो कोड मोबाइल सेटअप व्हेरिफिकेशन कोडच्यापर्यायामध्ये टाइप करा आणि त्यासमोरील फिनिश सेटअपवर क्लिक करा. शेवटी ही सगळी माहिती सेव्हकरायला विसरू नका.

सेट केलेला रिमाइंडर एसएमएसद्वारे हवा आहे की ई-मेलद्वारे यासाठी ज्या तारखेला तुम्ही रिमाइंडर लावला आहे, त्या तारखेवर क्लिक करा.

त्यामध्ये edit event details वर क्लिक करून रिमाइंडरमध्ये आवश्यक ते बदल करू शकता. तसेच तोएसएमएसद्वारे की ई-मेलद्वारे हवा आहे. तेही ठरवू शकता.


गुगल कॅलेंडरमध्ये आणखी एक सोय आहे. तुम्ही निश्चित केलेल्या एखाद्या कार्याक्रमाला अथवा मीटिंगला मित्र-मैत्रिणी अथवा ऑफिसमधील सहका-यांना बोलवायचं असेल तर याचीही सोय गुगल कॅलेंडरने केली आहे. रिमाईंडरी् edit करताना उजव्या बाजूला ‘गेस्ट’ असा पर्याय दिसेल. यात ज्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण अथवामिटिंगला बोलवायचं असेल त्यांचे ईमेल आयडी टाइप करा. केलेले बदल सेव्ह करा. ज्यांना रिमाइंडर पाठवलाआहे. त्यांना तो रिमाइंडर ईमेलद्वारे मिळतो. या मेलमधून त्या व्यक्तीला कार्यक्रम अथवा मिटिंगला येणार आहे कीनाही, असा प्रश्न विचारला जातो. संबंधित व्यक्ती तिचं उत्तर तुम्हाला कॅलेंडर आणि जीमेलद्वारे पाठवू शकते.

तेव्हा आता एकदाच सेंटिंग करा आणि निश्चिंत राहा. कारण गुगल कॅलेंडरच्या या सेवेमुळे महत्त्वाच्या मिटिंग्ज, मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस विसरण्याचा प्रसंग येणार नाही. ‘

नेट अपडेट- हृतिकही आता नेटवर


चाहत्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं माध्यम म्हणून अनेक सिने कलावंत सोशल नेटवर्किंगचा वापर करतात. या यादीमध्ये आता हृतिक रोशनचाही समावेश झाला आहे. रीडिफ डॉट कॉमवर त्याने स्वत:चं वेबपेज तयार केलं आहे. या वेबपेजवर त्याच्या आगमी चित्रपटाबद्दलची माहिती, व्हिडिओ, गाणी, फोटो, मुलाखतीच्या लिंक्स आणि अन्य वेबसाइटवरील त्याच्या संदर्भातील माहितीच्या लिंक्सही या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. हृतिकच्या रीडिफ पेजसाठी लॉगऑन करा http:pages.rediff.com/hrithikroshan





Friday, May 7, 2010

मास्टर ब्लास्टर टि्वटरवर...

माक्रोब्लॉगिगसाठी प्रसिद्ध असले ट्वीटर गेले काही दिवस भारतात शशी थरुर आणि ललीत मोदी यांच्यामुळे चर्चेतहोते. थरुर, मोदी यांच्या राजीनाम्या, हकालपट्टीनंतर ट्वीटर बुधवारी अचान पुन्हा चर्चेत आले. यावेळी मात्रचर्चा होती ती मास्टर ब्लास्टर सचिन तेडुलकरने टि्वटर दाखल झाल्याची.



सचिनने क्रिकेट मैदानावर केलेल्या विक्रमाप्रमाणे आत्ता सचिनच्या नावावर लवकरच आणखी एक विक्रम जमा होण्याची शक्यता आहे. ती म्हणजे त्याच्या फॉलोअर्सची. सचिन ट्वीटरवर दाखल झाल्यापासून त्याच्याफॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. चार मे रोजी रात्री ११.२१ वाजता सचिन ट्वीटरवर दाखल झाला. सचिनच्या फॉलोअर्सची संख्या दोन लाखाहून अधिक झालीआहे. सचिनचे ट्वीट्स तुम्हाला एसएमएसद्वारे ही मिळूशकतात. त्यासाठीचा भारतातील क्रमांक ५३००० हा आहे.

ट्वीटरवर सध्या हॉलिवुड स्टार ॅश्टन कुचर याचे ४८लाख हून अधिकजण फॉलोअर्स आहेत. क्रिकेटमधील अनेकविक्रम करणारा सचिन हा मोडणार का याची उत्सुकता त्याच्या चाहत्याना लागली आहे. सचिनला फॉलोकरण्यासाठी लॉगऑन करा-http://twitter.com/sachin_rt
ट्वीटरवरील पहिले पोस्ट- Finally the original SRT is on twitter n the first thing I'd like to do is wish my colleagues the best in the windies,

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP