नेट अपडेट- ‘ओपन’बुक
आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये सातत्याने बदल केल्यामुळे सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबुक गेल काही दिवस चर्चेत आहे. आतापर्यंत फेसबुकवरील एखाद्या युजरची माहिती केवळ फेसबुकचे सदस्य असलेल्या व्यक्तीला पाहता येत होती. मात्र फेसबुकने 21 एप्रिलपासून ही माहिती सर्वाना दिसेल असे बदल केल्यामुळे नेटवर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक वापरणा-या अनेकांनी हा प्रकार म्हणजे आपल्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण असल्याची तक्रार केली.फेसबुकच्या या वारवांर बदलणा-या नियमाचे अपडेट देण्यासाठी सॅन फ्रॅन्सिसको येथील चार तरुणांनी युअरओपनबुक (http://youropenbook.org) ही वेबसाइट तयार केली आहे.
या वेबसाइटचा हेतू फेसबुकशी स्पर्धा करण्याचा नसून केवळ फेसबुकमधील प्रायव्हसी पॉलिसी कशा प्रकारची हवी, याची सूचना देण्याचा आहे. फेसबुकने आपल्या नियमामध्ये कोणते बदल करावेत, याची माहिती या वेबसाइटवर देण्यात आली आहे. 12 मे रोजी सुरू झालेल्या या वेबसाइटला फेसबुकच्या सदस्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, फेसबुकने गुरुवारी (27 मे) पुन्हा आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. फेसबुक वापरणा-याची खासगी माहिती कोणाला पाहता यावी, या संदर्भातील अधिकार पुन्हा युजरच्या हाती देण्याचा निर्णय फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग जाहीर केला आहे.
0 comments:
Post a Comment