‘गुगल’ टीव्ही
इंटरनेट म्हणजे गुगल, गुगल म्हणजे इंटरनेट असे समीकरण बनलेल्या या सर्च इंजिनने ‘गुगल टीव्ही’ची घोषणा(फोटो फिचर) केली आहे. गुगलने या टीव्हीचा TV meets web, Web meets TV उल्लेख असा केला आहे. गुगलच्या या टीव्हीवर विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमांबरोबरच इंटरनेटचा वापरही करता येणार आहे. गुगल टीव्हीमध्ये क्रोमा इनबिल्ट असणार आहे. त्यामुळे तुम्ही आवडत्या वेबसाइटला भेट देऊ शकता. गुगलच्या अधिकृत ब्लॉगवर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गुगलच्या या टीव्हीवर तुम्ही वाहिन्या, कार्यक्रम, चित्रपट पाहू शकता तसेच वेबसाइटही सर्च करू शकता. त्यामुळेच गुगलचा हा टीव्ही अनेक अर्थाने स्मार्ट ठरणार आहे. गुगल टीव्हीवर तुमचे आवडते नाटक, सिरिअल सर्च करून पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर यू टय़ूबचे व्हिडिओही तुम्ही पाहू शकणार आहात. तुमच्या आवडत्या विषयासंदर्भातील कार्याक्रम पाहायचे असतील. मात्र ते कोठे पाहायचे, हे तुम्हाला माहीत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण गुगल टीव्हीवर असा सर्च दिला की तुम्हाला हव्या असलेल्या कार्यक्रमाची यादीच वाहिन्या आणि इंटरनेट अशा दोन विभागांत मिळणार आहे. त्याचबरोबर गुगल स्टँडर्ड प्रोग्रॅम गाइडही तुमच्या सेवेला असणार आहे. गुगल टीव्हीमध्ये photo slideshow viewer, a gaming console, a music player अशा अन्य सुविधा उपलब्ध असणार आहेत.
विशेष म्हणजे गुगलने ही घोषणा केल्याबरोबर गुगल टीव्हीवर जाहिराती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
गुगल टीव्हीच्या या निर्मितीमध्ये इंटेल, सोनी आणि लॉजिटेक या कंपन्यांचाही सहभाग असणार आहे. गुगल टीव्हीसाठी लागणारा सेट टॉप बॉक्स, लहान की-बोर्ड, रिमोर्ट कंट्रोल या कंपन्या निर्माण करणार आहेत. गुगल टीव्हीची किमत किती असेल याची अद्याप कोणतीही माहिती गुगलने दिली नसली तरी 2010 च्या अखेर हा टीव्ही अमेरिकेतील बाजारपेठत दाखल होणार आहे. तर अन्य ठिकाणी हा 2011 मध्ये मिळणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगल टीव्हीसाठी तुमच्याकडील इंटरनेटचा वेग तीन एमबीपीएस इतका आवश्यक आहे. एअरटेलने भारतात 899 रुपयांमध्ये चार एमबीपीएस इतका वेग उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्ही इंटरनेटचा अमर्यादित वापर करू शकता. त्याचबरोबर भारतातील Broadband सेवेच्या किमती आणखी काही दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे.
0 comments:
Post a Comment