Showing posts with label गुगल. Show all posts
Showing posts with label गुगल. Show all posts

Friday, April 1, 2011

‘जी-मेल मोशन’ वापरले का?


ई-मेल सेवा पुरवण्यामध्ये सध्या लोकप्रिय असलेल्या गुगलच्या जी-मेलने एक एप्रिल रोजी एक नवी सेवा लाँच करण्याची घोषणा केली आहे.  ‘जी-मेल मोशन’ असे या सेवेचे नाव आहे. याव्दारे जी-मेलचा वापर की-बार्ड आणि माउस शिवाय  करता येण शक्य होणार आहे. जी-मेल मोशनमुळे युझरला केवळ इशाऱ्याच्या (जेस्चर्स) मदतीने ई-मेल पाठवता आणि वाचता येणार आहे.
1874 मध्ये सर्वप्रथम Qwerty की-बोर्डची निर्मिती झाली. त्यानंतर 1963 मध्ये जगाला माउस शोध लागला. आणखी 50 वर्षांनी उच्च क्षमतेचे माक्रोप्रोसेसर आणि हाय क्षमतेचे वेबकॅम तसेच स्पेशल ट्रॅकिंग तंत्रज्ञान आले असेल. असे झाले तरीही आपण संगणकाशी अथवा अन्य डिव्हाइस हाताळण्यासाठी जुने तंत्रज्ञान वापरणार का? असा प्रश्न गुगलने विचारला आहे.
केवळ प्रश्न विचारुन गुगल थांबले नाही तर त्यावर त्यांनी उत्तर शोधले आहे. भविष्यातील संगणक कसा असेल यांचा पहिला प्रयत्न गुगलने जी-मेल मोशनच्या व्दारे केला आहे. मोशमच्या मदतीने जी-मेलव्दारे मेल चेक करणे आणि त्याला उत्तर पाठवणे या गोष्टी युझर इशाऱ्याच्या मदतीने करु शकेल.
जी-मेल मोशनचा वापर करण्यासाठी संगणकामध्ये इन-बिल्ट वेबकॅम आवश्यक आहे. जी-मेलच्या Settings पेजव्दारे एकदा का तुम्ही मोशन पर्याय अॅक्टीवर की त्यानंतर जेव्हा तुम्ही जी-मेल ओपन कराल तेव्हा आपोआप spacial tracking algorithm तुमची ओळख करुन घेईल.
जी-मेल मोशनची निर्मिती करताना गुगलने शारीरीक हलचालींचा अभ्यास करणाऱ्या एक्स्पर्टच्या मदत घेतली आहे.
विशेष म्हणेजे जी-मेल मोशनची चाचणी गेले काही महिन्यांपासून गुगलच्या कर्मचाऱ्याकडून केली जात आहे. गुगलमधील कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि सूचना याव्दारे जी-मेल मोशनमध्ये आणखी बदल केले जात आहेत. कर्मचाऱ्यांकडून वापरण्यात येणाऱ्या जी-मेल मोशनच्या दरम्यान गुगलने एक अहवाल तयार केला. या अहवालानुसार मोशनच्या वापरामुळे email compositionचा वेग 14 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. तसेच युझरचा इनबॉक्समधील वेळेत सरासरी 12 टक्क्यांची घट झाल्याचे आढळून आले.




जी-मेल मोशनचा वापर करण्यासाठी गुलल क्रोमची अद्यावत आवृत्ती अथवा फायर फॉक्सची 3.5 + आवृत्तीसह वेबकॅम असणे गरजेचे आहे. जी-मेलमधील ही सेवा सर्वांसाठी मोफत असणार आहे. अद्याप ही सेवा सर्वांसाठी खुली झाली नसली तरी काही दिवसांतच ती सुरु करणार असल्याचे गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगवर म्हटले आहे.
जी-मेल मोशनचा उपयोग सतत संगणकासमोर बसून काम करणाऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे.
वरील लेख वाचून झाल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील किंवा गुगलच्या संबंधीत पेजवर जाण्याआधी खालील मजकूर नक्की वाचा…









एप्रिल फूल
आज तारीख कोणती आहे माहित आहे का? एक एप्रिल, तर जी-मेल मोशन वैगरे काही नसून गुगलने केलेला हा एक एप्रिल फूल होता. जी-मेल मोशमच्या पेजवर जेव्हा  तुम्ही Try gmail Motion वर क्लिक करता. तेव्हा तुम्हाला एप्रिल फूलचा मेसेज दिसेल.
एप्रिल फूल करण्याची गुगलची ही सवय 2000 पासूनची आहे. अर्थात गुगलने एक एप्रिल रोजी अनेक लोकांना जी-मेल मोशनच्या निमित्ताने फसवले. बर नाही म्हटले तरी गुललचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. कारण या संदर्भातील व्हिडिओ तब्बल 13 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मात्र एक एप्रिल रोजी गुगलने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यावेळी त्या लोकांना फूल बनवण्याचा प्रयत्न आहे असे वाटले होते. अशा घोषणेपैकी एक म्हणजे 2004मध्ये करण्यात आलेली जी-मेल सेवेची घोषणा होय.
गुगलने 2000मध्ये MentalPlexची घोषणा केली होती. त्यानंतर गुगलने PigeonRank, Google Gulp, Gmail Paper आणि Google TiSP अशा सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.
गुगलच्या या एप्रिल फूलच्या अधिकृत पानावर जाण्यासाठी येथे किल्क करा…



Saturday, March 12, 2011

गुगलचे जपान पर्सन फाइन्डर

जपानच्या पूर्वोत्तर किनारपट्टीजवळ झालेल्या भूकंपानंतर गुगलने एक ऑनलाइन टूल सुरु केले आहे. पर्सन फाइन्डर असे या टूलचे नाव आहे. या टूलच्या मदतीने भूकंप आणि त्सुनामीमुळे प्रभावीत झालेल्या व्यक्तींचा शोध घेता येतो. तसेच त्यांच्या संदर्भातील माहिती मिळवता येते.




या टूलमध्ये व्यक्तींचा शोध घेण्याबरोबर ज्याचा शोध लागला आहे त्यांची ही माहिती मिळू शकते. ही सेवा जपानी भाषेसह इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे. भूकंपानंतर मोबाईल आणि फोन सेवा ठप्प झाल्यामुळे गुगलच्या या टूलच्या माध्यमातून व्यक्तींचा शोध घेणे शक्य आहे.


गुगलच्या या सेवेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून २४ तासांमध्ये तब्बल २२ हजार ४०० लोकांचा शोध घेतला गेला आहे.




गुगलने हे टूल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहे. व्यक्ती, बातम्या देणाऱ्या वेबसाइट, अन्य संस्था आणि संघटना यांना आपल्या वेबसाइट,ब्लॉगवर गुगलचे हे टूल Add करता येते. हे टूल मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.


हैतीमध्ये जानेवारी २०१०मध्ये झालेल्या भूकंपानंतर गुगलने अशा प्रकारची सेवा सुरु केली होती. इतकच नाही तर जपानमध्ये भूकंप झाल्यानंतर गुगलने आपल्या होम पेजवर त्सुनामी अलर्ट दिला होता.





त्यानंतर गुललने होमपेजवर जपानवर आलेल्या संकटासंदर्भातील सर्व माहिती देणारे एक स्वतंत्र वेबपेज (Resources) तयार केले आहे. या पेजवर अलर्ट, बातम्या, व्हिडिओ, रियल टाईम अपडेट अशा सर्व माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती जपानी भाषेबरोबर इंग्रजीमध्ये ही उपलब्ध आहे.


जपानमधील भूकंप आणि त्सुनामीसंदर्भातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Tuesday, March 8, 2011

‘जॉइन मि ऑन द ब्रिज’

महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी जागतिक महिला दिनाची सुरुवात आठ मार्च १९११ रोजी झाली. यंदाच्या १००व्या जागतिक महिला दिनानिमित्ताने गुगलने आपल्या होम पेजवर लोगो तयार केला आहे.




१९११पासून आजपर्यंत महिलांनी शिक्षण, आरोग्यापासून ते राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. यंदाचा १००वा जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी GOOGLE आणि Women for Women International ने एक वेगळा कँपेन आयोजीत करण्याचे आवाहन केले आहे.  Join women on bridgeअसे या कँपेन नाव असून जागतिक स्तरावर महिलांनी मिळवलेले यश, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शहरात कोणत्याही bridgeवर एकत्र येण्याचे आवाहन गुगलने केले आहे.



महिला दिनानिमित्ताने गुगलने एक विशेष पेज तयार केले आहे. या पेजवर १९११ ते आत्तापर्यंत महिलांची वाटचाल आणि योगदान याची थोडक्यात माहिती देणारा एक विशेष व्हिडिओ पहायला मिळतो.

तसेच जागतिक पातळीवर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्याचे आवाहन गुगलने केले आहे.
काही दिवसांपूर्वी स्टार प्लसने प्रत्येकाच्या आयुष्यातील महिलाचे स्थान अधोरेखीत करणारे एक अँथम साँग सुरु केले होते. जागतिक महिला दिनानिमित्ताने स्टार प्लसचे तू ही तू… हे अँथम साँग महिला आणि पुरुष दोघांना प्रेरणादायी आहे.

Thursday, October 21, 2010

शेड्युल युअर मेल व्हाया बुमरॅँग

आपल्या मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस किंवा ऑफिसमधील एखाद्या मिटिंगची वेळ अथवा विशिष्ट वेळेला अत्यंत महत्त्वाची सूचना देणारा मेल पाठवायचा असतो. कित्येकदा असा मेल पाठवण्यासाठी नेमक्या त्या वेळेला आपल्याजवळ संगणक किंवा लॅपटॉप नसतो. अशा वेळी आपली खूप पंचाईत होते. त्यावेळी जवळच्या एखाद्या सायबरचा आधार घेतला जातो. मात्र कधी कधी आपण सायबर कॅफे शोधण्याच्यादेखील तयारीत नसतो. अशा वेळी आपले महत्त्वाचे मेल त्या दिवशी त्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचतील असा प्रश्न आपल्याला पडतो. अगदीच महत्त्वाची मेल असेल तर ती आपण जवळच्या मित्राला किंवा घरातल्या कोणाला तरी करायला सांगितलं जातं.

नियोजित मेल निश्चित तारखेला किंवा वेळेला पाठवण्याची सोय सध्या जी-मेलमध्ये नाही. आणि तशी सोय उबलब्ध होण्याची शक्यता नजीकच्या काळातही दिसत नाही. असं असलं तरी Boomerang द्वारे तुम्ही क्रोम आणि फायरफॉक्स ब्राउझरच्या माध्यमातून अशा प्रकारे मेल schedule करू शकता. असे ठरावीक वेळेचे महत्त्व असलेले मेल पाठवण्यासाठीBoomerang चा वापर करता येईल. हे क्रोममधीली extension तर फायरफॉक्समधील ad-on असून या द्वारे तुम्ही तुम्हाला पाठवायचे मेल schedule करू शकता.

गुगल क्रोमसाठी आणी फायरफॉक्समध्ये Boomerangextension आणि ad-on तुम्ही या लिंकद्वारे डाऊनलोड करू घेऊ शकता. त्यानंतर गुगल क्रोमद्वारे जी-मेल आयडी ओपन करा.

मेलच्या composemailमध्ये सर्वात वर send या पर्यायानंतर send later हा पर्याय दिसेल. तुम्हाला ज्यांना मेल पाठवायचा आहे. त्यांचा ई-मेल आयडी आणि मजकूर लिहून. हा मेल म्हणून सेव्ह करा. त्यानंतर send later या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला केव्हा मेल पाठवायचा आहे. त्या संदर्भात काही पर्याय दिले आहेत. या शिवाय तुम्हाला कोणत्या वेळी ही मेल पाठवायची आहे ती वेळही देऊ शकता. अशा रितीने तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या पाठवायच्या काही मेल schedule करू शकता

Boomerangवापर करून पाठवले जाणारे मेल हे सुरक्षित राहतात. त्यामुळे तुमच्या मेलमधील मजकूर सुरक्षित राहतो. त्यामुळे तुम्ही आता मेल तयार केली तुमचं काम झालं. त्या वेळी त्या व्यक्तीपर्यंत तुमचा मेल जाईल याबाबत तुम्ही निश्चिंत राहाल यात काही शंका नाही.

Monday, September 27, 2010

हॅपी बर्थडे टू गुगल

आघाडीच्या गुगल सर्च इंजीनने नुकताच आपला बारावा वाढदिवस साजरा केला. अर्थात, गुगलच्या वाढदिवसाच्या तारखेबद्दल संभ्रम असला तरी चार सप्टेंबर रोजी गुगलची कंपनी म्हणून नोंद झाली. 15 सप्टेंबर 1998 रोजी गुगलने www.google.com या डोमेनची नोंदणी केली. त्यानंतर मात्र गुगलकडून 27 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला जातो.

गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सेजी ब्रीन हे सर्वप्रथम 1995 मध्ये भेटले. 1996 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात एक प्रोजेक्ट सुरू केला. या प्रोजेक्टचं रूपांतर गुगल नावाच्या कंपनीमध्ये झाले.

गुगलच्या या वाढदिवसानिमित्त गुगलने अमेरिकेसह अन्य देशांतील होमपेजवर नवा लोगो तयार केला होता. एका केकवर गुगल असं लिहिलेला लोगो अमेरिकेतील वेन दीबेव्ड या 89 वर्षीय चित्रकाराने तयार केला आहे.


गुगलच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त तयार केलेला लोगो...


गुगलने होम पेजवर केलेले अन्य लोगो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


गुगलविषयी काही महत्त्वाचं

  • गुगल या शब्दाचा गणिती अर्थ एक(1)वर शंभर शून्य असा होतो.

  • गुगल सर्चच्या होमपेजवर दिसणारे ”I feel lucky”हा पर्याय युजरकडून सर्वात कमी वेळा वापरला जातो. तरीही गुगल हा पर्याय काढून टाकण्याचा विचार करत नाही. कारण त्यांना सर्च लूक आणि फिलमध्ये बदल करायचा नाही.

  • गुगलची ई-मेल सेवा असलेल्या जी-मेलचा वापर तब्बल दोन वर्षे गुगल कार्यालयात केला जात होता. त्यानंतर गुगलने एक एप्रिल 2004 रोजी तो सर्वासाठी खुल केला.

  • क्रेग सिल्वरस्टीन हा गुगलचा पहिला कर्मचारी होय.

  • लॅरी पेज आणि सेजी ब्रीन यांनी गुगलची सुरुवात ज्या ठिकाणी सर्वप्रथम केली. ते ठिकाण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Tuesday, September 14, 2010

गुगलद्वारे लवकरच म्युझिक सेवा..


इंटरनेटवरून आपल्याला हवं असलेलं म्युझिक किंवा गाणी डाऊनलोड करणे तसेच ते शेअरिंग करण्याची सेवा यात सध्या अ‍ॅपल आघाडीवर आहे. गुगल आपल्या म्युझिक सेवेच्या माध्यमातून थेट अ‍ॅपलला टक्कर देणार आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलने पिंगच्या माध्यमातून सोशलनेटवर्किंगमध्ये प्रवेश केला होता.

सर्च इंजिनमध्ये आघाडीवर असलेले गुगल येत्या डिसेंबरमध्ये आपली म्युझिक सेवा सुरू करणार आहे. ही सेवा ख्रिसमसच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे. इंटरनेटवरून आपल्याला हवं असलेलं म्युझिक किंवा गाणी डाऊनलोड करणे तसेच ते शेअरिंग करण्याची सेवा यात सध्या अ‍ॅपल आघाडीवर आहे. गुगल आपल्या म्युझिक सेवेच्या माध्यमातून थेट अ‍ॅपलला टक्कर देणार आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलनेपिंगच्या माध्यमातून सोशलनेटवर्किंगमध्ये प्रवेश केला होता. इंटरनेटवर म्युझिक क्षेत्राची वाढत जाणारी क्रेझ आणि त्याची बाजारपेठ या दृष्टीने सर्व आघाडीच्या कंपन्यांनी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

अ‍ॅपलने 2003 मध्ये म्युझिक डाऊनलोड सेवेच्या विक्रीची सुरुवात केली होती. त्यानंतर आतापर्यंत अ‍ॅपलची यामध्ये मक्तेदारी राहिली आहे. अमेरिकेतील ऑनलाइन म्युझिक विक्रीमध्ये अ‍ॅपलचा वाटा 80 टक्के इतका आहे. मात्र यूट्यूब आणि सर्च इंजिनच्या माध्यमातून गुगलला यामध्ये मोठी संधी आहे. गुगलद्वारे सुरू करण्यात येणा-या या सेवेमुळे अ‍ॅपलची ही मक्तेदारी टिकेल का, याचं उत्तर मिळण्यासाठी डिसेंबपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Thursday, September 2, 2010

सोशलडेस्क गुगलच्या ताब्यात

मोबाइल आणि स्मार्टफोनसाठी गेम्स तयार करणासाठी सोशलडेस्क ही वेबसाइट गुगलने विकत घेतली आहे. सोशलडेस्क, मोबाइल आणि सोशल नेटवर्किंग वेबसाइटसाठी गेम्स तयार करते. सोशलडेस्कचे प्रामुख्याने फेसबुक, अ‍ॅपल आयफोन आणि ब्लॅकबेरीसाठी तयार केलेले गेम्स प्रसिद्ध आहेत. एकाच वेळी अनेक मोबाइलवरून गेम्स खेळण्याची आणि सोशल नेटवर्किंगची सुविधा सोशलडेस्कमध्ये आहे. मात्र यासाठी गुगलने किती रक्कम मोजली आहे हे अद्याप जाहीर झालं नाही.






Tuesday, August 24, 2010

गुगल लवकरच बॉक्स ऑफिसवर

जगभरातील इंटरनेट वापरणा-याचे सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगल आणि त्याचे संस्थापक लॅरी पेज आणि सेजी ब्रीन यांच्यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. ग्राउंडस्वेल प्रोडक्शनने केन औलेत्टॅ यांच्या Googled: The End Of The World As We Know It या पुस्तकाचे चित्रपटासाठीचे अधिकार घेतले आहेत.


















चांगल्या मार्गाने पैसे मिळवणा-या दोन युवकांबद्दलची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. लॅरी आणि सेर्जी यांनी गुगल सुरू केल्यामुळे जगात कसे बदल झाले, तसंच त्यांच्या जीवनात कोणते बदल झाले हेही या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचं माइकल लंडन यांनी सांगितलं.

सर्च इंजिनने गुगलची सुरुवात झाली असली तरी आज जगभरातील अनेक कंपन्यांना इंटरनेटशी संदर्भातील सेवा देतं.








Tuesday, August 17, 2010

इन गुगल ऑफिस...



























Friday, July 30, 2010

ई-मेलची वर्गवारी


इनबॉक्समध्ये येणा-या ई-मेलची त्यांच्या विषयानुसार वेगवेगळ्या फोल्डरमध्ये वर्गवारी करण्याची सोय जीमेलने केली आहे. त्यामुळे एखादी विशिष्ट ई-मेल शोधण्याचा त्रास आता वाचणार आहे.

एक कोटी तीस लाख लोकांकडून वापरली जाणारी, जगातील तिस-या क्रमांकाचीजी-मेलतिच्यातील अनेक सुविधांमुळे अधिक युझर फेंडली झाली आहे. जी-मेलकडून मिळणा-या अनेक नावीन्यपूर्ण सेवेमुळेच ही सेवा अधिक लोकप्रिय झाली आहे. इनबॉक्समध्ये पडणा-या मेलची आपल्या गरजेनुसार वर्गवारी करण्याची जी-मेलमध्ये सोय आहे. यामुळे तुम्हाला हव्या असणा-या मेलचा शोध स्मार्टपणे घेता येतो.

ई-मेलमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे मेल येत असतात. कधी ऑफिसच्या कामाचे, कधी आपल्या मित्र-मैत्रिणींचे, कधी आपल्या घरच्या मंडळींचे, तर कधी इतर काही गमतीच्या ई-मेल. काही दिवसांनी कोणत्या कामानिमित्त एखादी मेल चेक करायची असल्यास त्या विशिष्ट मेलचा इनबॉक्समध्ये शोध घ्यावा लागतो. जी-मेलमध्ये मेल सर्च सुविधा असली तरी असा शोध प्रत्येक वेळी घेण्यासाठी वेळ असतोच असं नाही. आपल्याला येणा-या विशिष्ट ई-मेल इनबॉक्सप्रमाणेच दुस-या एखाद्या फोल्डरमध्ये मिळाले तर मेल शोधण्याचं काम पटकन होईल. मेलची वर्गवारी करणे ही युझरची गरज विचारात येऊनच जी-मेलने एक जबरदस्त सोय केली आहे.









जी-मेलमध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार मेलची वर्गवारी करू शकता. असा फोल्डर तयार करण्यासाठी जीमेलच्या settings मधील label मध्ये जाऊन तुम्ही हवा तो labsतयार करू शकता. समजा तुम्ही Home हा ’ label तयार केला. तर या मुख्य labs अंतर्गत तुम्हाला इतर labs तयार करता येतात. यासाठी जी-मेलच्या settings>>labs>> या क्रमाने जा. labs मधील Nested label हा पर्याय Enable करा.उदा- Home या labs च्या अंतर्गत kids, Shopping असे तुम्हाला हवे तसे labsतयार करू शकता. मात्र असे अंतर्गत labsतयार करताना settingsमधील labels¸मध्ये मुख्य labs¨ चं नाव लिहून स्लॅश (/) हे चिन्ह देऊन त्या अंतर्गत येणा-या labs चं नाव लिहावं लागतं. उदा- Home हा जर तुमचा मुख्य labs असेल तर त्या अंतर्गत दुसरा labs तयार करताना Home / kids असे लिहून Create वर क्लिक करा.



तुम्हाला येणारे मेल थेट तुम्ही तयार केलेल्या labsमध्येही येऊ शकतात. त्यासाठी जी-मेलमध्ये settings>Filters या क्रमाने जा. Filters¸ मध्ये Create a new filter वर क्लिक करा. त्यानंतर ओपन होणा-या विंडोमध्ये From च्या ठिकाणी तुम्हाला ज्या व्यक्तीकडून मेल येणे अपेक्षित आहे, त्याचा मेल आय-डी लिहा. आणि Next Step वर क्लिक करा. त्यानंतर येणा-या विंडोमधील Apply the Labels या पर्यायावर टिकमार्क करून त्याच्या समोरच्या बॉक्समध्ये संबंधीत व्यक्तीचा मेल कोणत्या labsमध्ये आला पाहिजे तो निवडा आणि Update Filter वर क्लिक करा.







याप्रमाणे बदल केल्यावर तुम्हाला येणा-या ई-मेलचे त्या त्या वर्गीकरणाप्रमाणे योग्य त्या labs¸मध्ये जातील. इतकंच नव्हे; तर तयार केलेल्य labs तुम्ही आकर्षक रंगही देऊ शकता. याचं वैशिष्ट म्हणजे तयार केलेला एखादा labs जरी डिलिट केला तरी त्यात आलेले मेल डिलिट होत नाहीत. तर labs डिलिट झाल्यावर त्या मेल तुमच्या इनबॉक्समध्ये जातात. जी-मेलमधील drafts मध्ये सेव्ह केलेल्या मेल्सही तुम्ही अशा प्रकारे labs मध्ये सेव्ह अथवा move करू शकता. तुमचा मेल बॉक्स अधिकस्मार्टकरण्यासाठी हा बदल तुम्ही नक्कीच कराल, यात काही शंका नाही.




  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP