Monday, April 18, 2011
Friday, October 29, 2010
मेलसोबत डॉक्युमेंटही सर्च करा...
जी-मेलमध्ये इनबॉक्स आणि आऊटबॉक्समधील मेल सर्च करण्यासाठी मेल सर्च हा Default search पर्याय दिला आहे. मात्र जी-मेल सोबत गुगल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह केलेली एखादी फाइल शोधायची असेल तर स्वतंत्रपणे गुगल डॉक्युमेंट ओपन करावे लागत होतं.
आता मात्र गुगलने यावर उपाय सुचवला आहे. जी-मेलचा वापर करतानाच तुम्ही गुगल डॉक्युमेंटमधील कोणतीही फाईल शोधू शकता. यासाठी जी-मेलच्या Settings¸मध्ये Labs options¸मधील Apps Search या पर्यायांचा वापर करा. त्यानंतर झालेला बदल सेव्ह करा.
![]()
जी-मेलसोबत गुगल डॉक्युमेंटचा वापर करणा-यांसाठी हा पर्याय नक्कीच उपयुक्त आहे.
Posted by jay at 1:06 PM 0 comments
Labels: जी-मेल
Thursday, October 21, 2010
शेड्युल युअर मेल व्हाया बुमरॅँग
आपल्या मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस किंवा ऑफिसमधील एखाद्या मिटिंगची वेळ अथवा विशिष्ट वेळेला अत्यंत महत्त्वाची सूचना देणारा मेल पाठवायचा असतो. कित्येकदा असा मेल पाठवण्यासाठी नेमक्या त्या वेळेला आपल्याजवळ संगणक किंवा लॅपटॉप नसतो. अशा वेळी आपली खूप पंचाईत होते. त्यावेळी जवळच्या एखाद्या सायबरचा आधार घेतला जातो. मात्र कधी कधी आपण सायबर कॅफे शोधण्याच्यादेखील तयारीत नसतो. अशा वेळी आपले महत्त्वाचे मेल त्या दिवशी त्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचतील असा प्रश्न आपल्याला पडतो. अगदीच महत्त्वाची मेल असेल तर ती आपण जवळच्या मित्राला किंवा घरातल्या कोणाला तरी करायला सांगितलं जातं. नियोजित मेल निश्चित तारखेला किंवा वेळेला पाठवण्याची सोय सध्या जी-मेलमध्ये नाही. आणि तशी सोय उबलब्ध होण्याची शक्यता नजीकच्या काळातही दिसत नाही. असं असलं तरी Boomerang द्वारे तुम्ही क्रोम आणि फायरफॉक्स ब्राउझरच्या माध्यमातून अशा प्रकारे मेल schedule करू शकता. असे ठरावीक वेळेचे महत्त्व असलेले मेल पाठवण्यासाठीBoomerang चा वापर करता येईल. हे क्रोममधीली extension तर फायरफॉक्समधील ad-on असून या द्वारे तुम्ही तुम्हाला पाठवायचे मेल schedule करू शकता. गुगल क्रोमसाठी आणी फायरफॉक्समध्ये Boomerangextension आणि ad-on तुम्ही या लिंकद्वारे डाऊनलोड करू घेऊ शकता. त्यानंतर गुगल क्रोमद्वारे जी-मेल आयडी ओपन करा. मेलच्या composemailमध्ये सर्वात वर send या पर्यायानंतर send later हा पर्याय दिसेल. तुम्हाला ज्यांना मेल पाठवायचा आहे. त्यांचा ई-मेल आयडी आणि मजकूर लिहून. हा मेल म्हणून सेव्ह करा. त्यानंतर send later या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला केव्हा मेल पाठवायचा आहे. त्या संदर्भात काही पर्याय दिले आहेत. या शिवाय तुम्हाला कोणत्या वेळी ही मेल पाठवायची आहे ती वेळही देऊ शकता. अशा रितीने तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या पाठवायच्या काही मेल schedule करू शकता Boomerangवापर करून पाठवले जाणारे मेल हे सुरक्षित राहतात. त्यामुळे तुमच्या मेलमधील मजकूर सुरक्षित राहतो. त्यामुळे तुम्ही आता मेल तयार केली तुमचं काम झालं. त्या वेळी त्या व्यक्तीपर्यंत तुमचा मेल जाईल याबाबत तुम्ही निश्चिंत राहाल यात काही शंका नाही. 
Posted by jay at 1:12 PM 0 comments
Monday, September 6, 2010
इनकमिंग ई-मेलचं वर्गीकरण अधिकच सोप्पं
गुगलने जी-मेलमध्ये येणा-या ई-मेलच्या वर्गीकरणासाठी प्रायॉरिटी इनबॉक्स नावाची नवीन यंत्रणा विकसित केली आहे. आपल्या इनबॉक्समध्ये अनेक वेळा अनावश्यक मेल येतात. अशा ई-मेलचा त्रास होऊ नये म्हणून जी-मेलकडे spam filtering ही सर्वोत्तम अशी सोय आहे. मात्र spam शिवाय असे बरेच मेल असतात की, जे इतके आपल्या कामाशी संबंधित नसतात. अशा मेलमुळे अनेक वेळा महत्त्वाचा मेल वाचायचा राहून जातो किंवा वेळच्या वेळेवर महत्त्वाचे मेल वाचण्याचं राहून जातं. यामुळे अनेक वेळा महत्त्वाची कामं राहून जातात अथवा आपल्याला वेळेत निरोप मिळत नाही. गुगलने यावर उपाय सुचवला आहे तो प्रायॉरिटी इनबॉक्सचा.

जी-मेलच्या या प्रायॉरिटी इनबॉक्समुळे तुम्ही तुमच्या सर्व इनकमिंग ई-मेलचं Important and unread, Starred आणि Everything else प्रकारात वर्गीकरण करू शकता. या शिवाय तुम्ही जी-मेलमधील कोणताही एखादा विभाग प्रायॉरिटीमध्ये समाविष्ट करू शकता.

जी-मेल ओपन करताच उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यात New Priority Inbox हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही हा पर्याय वापरू शकता. जी-मेलने प्रायॉरिटी इनबॉक्सचा वापर कसा करावा यासंदर्भातील एक व्हिडिओ दिला आहे. प्रायॉरिटी इनबॉक्स पर्याय ऑन केल्यानंतर तुमच्या जी-मेलच्या इनबॉक्सचे Important and unread, Starred आणि Everything else यामध्ये विभागणी होते. जी-मेलच्या Settings मधील प्रायॉरिटी इनबॉक्समध्ये जाऊन तुम्ही यामध्ये आवश्यक ते बदल करू शकता. या तिन्ही विभागांमध्ये किती ई-मेल दिसले पाहिजेत यासंदर्भातील बदल तुम्ही Settings मधून करू शकता.

Posted by jay at 12:18 AM 1 comments
Labels: जी-मेल
Pages
Categories
- Google logos (7)
- Wallpapers (1)
- गुगल (20)
- जी-मेल (4)
- टि्वटर (9)
- नेट अपडेट (3)
- मराठी वेबसाईट (4)
- विकिमिडिया (3)
- वेबसाईट (20)
- व्हिडिओ (2)

