Tuesday, September 7, 2010

पिंगची झिंग अन् सोशल नेटवर्किंग

सोशल नेटवर्किंगचे हेच माध्यम आता आणखी उपयुक्त बनत चालले आहे. केवळ संवादापुरते मर्यादित न राहता आता त्याने माहिती-तंत्रज्ञान यांच्या देवाण-घेवाणीचे दालन नेटिझन्सना उपलब्ध करून दिले आहे. याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी दिली आहे.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून तो समूहात राहात आला आहे. आपापसात संवाद साधण्यासाठी त्याने सुरुवातीला हातवा-यांचा आणि चिन्हांचा वापर केला. नंतर भाषेचा जन्म झाला आणि माणसामाणसांतील संवाद अधिक स्पष्ट आणि प्रभावी होत गेला. टेलिफोन, मोबाइल आणि इंटरनेटच्या शोधाने या संवादाला अंतराच्या मर्यादेतून मुक्त केले. इंटरनेटवरून होणा-या संवादाला सर्वात व्यापक व्यासपीठ मिळवून दिले आहे सोशल नेटवर्किंगने. मात्र एकमेकांशी संपर्क-संवाद-संभाषण साधण्याचे माध्यम बनलेले सोशल नेटवर्किंगआता केवळ गप्पाटप्पा करणे किंवा ओळखीपाळखीपुरते उरलेले नाही, तर त्यामागील खरा अर्थ समाजसंपर्कआता उमगू लागला आहे. मुंबई पोलिसांनी सुरू केलेली फेसबुकवरील कम्युनिटी असो वा काही दिवसांपूर्वी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मनमानीविरोधात छेडण्यात आलेली मीटर जॅमही मोहीम असो, ‘सोशल नेटवर्किंगने समाजात होणा-या चळवळींना व्यापक, वेगवान आणि तितकेच सुलभ व स्वस्त माध्यम उपलब्ध करून दिले आहे.

सोशल नेटवर्किंगचे हेच माध्यम आता आणखी उपयुक्त बनत चालले आहे. केवळ संवादापुरते मर्यादित न राहता आता त्याने माहिती-तंत्रज्ञान यांच्या देवाण-घेवाणीचे दालन नेटिझन्सना उपलब्ध करून दिले आहे. याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी दिली आहे. एक म्हणजे गुगलने मोबाइल आणि स्मार्टफोनसाठी गेम्स तयार करणा-या सोशल डेस्कने ही वेबसाइट विकत घेतली आणि आयपॅड, आयफोन उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅपलनेपिंगया अ‍ॅप्लिकेशनद्वारे सोशल नेटवर्किंग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.



सोशलडेस्क मोबाइल आणि सोशल नेटवर्किं ग वेबसाइटसाठी गेम्स तयार करते. याआधी सोशलडेस्कने फेसबुक, अ‍ॅपलचा आयफोन आणि ब्लॅकबरीसाठी तयार केलेले गेम्स प्रसिद्ध आहेत. गुगलने ही कंपनी किती डॉलरमध्ये विकत घेतली, हे अद्याप जाहीर झाले नसले तरी सोशल नेटवर्किंगमध्ये गुगल आपले स्थान बळकट करण्यासाठी ही वेबसाइट विकत घेतल्याची चर्चा आहे.

अ‍ॅपल पिंगचे नेहमीच्या सोशल नेटवर्किंगप्रमाणे नसून ते आयट्यून्सवर आधारित अ‍ॅप्लिकेशन आहे. याद्वारे यूझर आपले आवडते संगीत ऐकू शकतील, त्याचबरोबर आपले मित्र कोणते संगीत ऐकत आहेत,याचे अपडेट मिळवू शकतील.‘पिंद्वारे जगभरातील म्युझिक बँड्स नव्या गाण्याचे अपडेट, त्याचे रिव्ह्यू कळणार आहेत. या बँड्सचे कार्यक्रम कोठे होणार आहेत, याची माहिती पिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच आपल्याला आवडणारे संगीतही ते ऑनलाइन विकत घेण्याची सोय यामध्ये देण्यात आली आहे. पिंगच्या माध्यमातून युझर आपल्या आवडत्या संगीतकारांना आणि ग्रुपला फॉलो करू शकतात. अ‍ॅपलकडून याचे वर्णन Facebook meets Twitter for music असे करण्यात आले आहे. सध्या ऑर्कुटमधील कम्युनिटीज किंवा फेसबुकमधील ग्रुप याप्रमाणेच पिंगचे स्वरूप असून यामध्ये प्रामुख्याने संगीत आणि त्याच्याशी आधारित अन्य उपक्रमांना स्थान देण्यात आले आहे.

अ‍ॅपलशिवाय अन्य पॅनडॉरा आणि झुएन सोशियल या माक्रोसॉफ्टने म्युझिक शेरिंग अ‍ॅप्लिकेशन आहेत,मात्र यामध्ये अ‍ॅपलला मोठी संधी आहे. कारण अ‍ॅपलच्या आयट्यून्सचे जगभरातील 23 देशांमधून 160 दशलक्ष युझर्स आहेत.

अ‍ॅपलच्या पिंगला पहिल्या दोन दिवसांत जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे दहा लाख युझर्स पिंगचे सदस्य झाले आहेत. पिंगमुळे फेसबुक आणि अ‍ॅपलमधील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकने प्रवेश केल्यानंतर मायस्पेसच्या युजरची संख्या कमी झाली. आता पिंगमुळे फेसबुकला हीच भीती वाटत असावी. यामुळेच अन्य नेटवर्किंगद्वारे माहिती शेअर करण्यावर बंदी घालणा-या फेसबुकने अ‍ॅपलच्या पिंगची ही सेवा ब्लॉक केली आहे. याआधी फेसबुकने ट्विटरवरून माहिती शेअर करण्यावर बंदी घातली होती. फेसबुकवरील युजरची माहिती मिळवण्यासाठी त्याच्या application programming interfaces ने मान्यता द्यावी लागते. सध्या फेसबुककडे अशा अनेक कंपन्यांकडून माहिती मिळवण्यासाठी परवानगी मागितली जाते. मात्र अ‍ॅपलला अशी परवाणगी दिली जाईल का, याबद्दल शंका आहेत. अ‍ॅपल आणि फेसबुकमध्ये या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

अ‍ॅपलच्या आयट्यून्सचा वापर करणारे सर्व जण पिंगचा वापर करतील, हे आताच सांगता येणे शक्य नसले तरी पिंगमुळे सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये सध्याच्या स्वरूपामध्ये बदल होणार आहेत. हे बदल फेसबुक, ऑर्कुट, मायस्पेस आणि ट्विटरच्या माध्यमातून पाहायला मिळतील. सोशल नेटवर्किंगच्या बाजारपेठेत सध्याच्या घडीला अ‍ॅपल ही एकमेव कंपनी आहे, जी फेसबुकला टक्कर देऊ शकते. त्यामुळे भविष्यात या दोन्हींमधील स्पर्धा आणखी वाढणार आहे. याशिवाय गुगलही आपल्या ऑर्कुटच्या माध्यमातून या स्पर्धेत आहेच.

गेल्या आठवड्यात बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील इंटरनेट वापरणा-यांची संख्या 2015 पर्यंत 24 कोटींवर पोहोचणार आहे. तर ब्राझील, रशिया, चीन, इंडोनेशिया या देशांमधील इंटरनेट वापरणा-यांची संख्या 61 कोटी होईल. कॉम स्कोअर या कंपनीच्या अहवालानुसार जुलै महिन्यात भारतात फेसबुकने ऑर्कुटला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. या अहवालांतून इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगच्या वाढत्या वापराची कल्पना येते. जगभरात एकाच वेळी उपलब्ध होऊ शकणारे हे एकमेव माध्यम असल्याने स्वत:चे वर्चस्व राखण्यासाठी या वेबसाइट बनवणा-या कंपन्यांमधील व्यावसायिक स्पर्धाही तीव्र होत चालली आहे. मात्र या स्पर्धेमुळे यूजर्सचाच फायदा अधिक होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा अशीच कायम राहिली, तर भविष्यात सोशल नेटवर्किंग हे शिक्षण, आरोग्य आणि प्रशासन यांच्यासाठीही प्रभावी माध्यम ठरण्यास हरकत नाही.


Monday, September 6, 2010

इनकमिंग ई-मेलचं वर्गीकरण अधिकच सोप्पं


आजकाल आपल्याला येणा-या अनावश्यक ई मेल्सचं प्रमाण वाढीस लागलंय. हे पाहता गुगलने जी-मेलमध्ये येणा-या ई-मेलच्या वर्गीकरणासाठी प्रायॉरिटी इनबॉक्स ही नवीन यंत्रणा विकसीत केली आहे. जी-मेलच्या प्रायॉरिटी इनबॉक्स या सुरक्षा यंत्रणेमुळे अनावश्यक ई-मेल्सना आळा तर बसतोच. शिवाय वेळच्या वेळी ई-मेल्स वाचण्याचीही सवय लागते.

गुगलने जी-मेलमध्ये येणा-या ई-मेलच्या वर्गीकरणासाठी प्रायॉरिटी इनबॉक्स नावाची नवीन यंत्रणा विकसित केली आहे. आपल्या इनबॉक्समध्ये अनेक वेळा अनावश्यक मेल येतात. अशा ई-मेलचा त्रास होऊ नये म्हणून जी-मेलकडे spam filtering ही सर्वोत्तम अशी सोय आहे. मात्र spam शिवाय असे बरेच मेल असतात की, जे इतके आपल्या कामाशी संबंधित नसतात. अशा मेलमुळे अनेक वेळा महत्त्वाचा मेल वाचायचा राहून जातो किंवा वेळच्या वेळेवर महत्त्वाचे मेल वाचण्याचं राहून जातं. यामुळे अनेक वेळा महत्त्वाची कामं राहून जातात अथवा आपल्याला वेळेत निरोप मिळत नाही. गुगलने यावर उपाय सुचवला आहे तो प्रायॉरिटी इनबॉक्सचा.






जी-मेलच्या या प्रायॉरिटी इनबॉक्समुळे तुम्ही तुमच्या सर्व इनकमिंग ई-मेलचं Important and unread, Starred आणि Everything else प्रकारात वर्गीकरण करू शकता. या शिवाय तुम्ही जी-मेलमधील कोणताही एखादा विभाग प्रायॉरिटीमध्ये समाविष्ट करू शकता.





जी-मेल ओपन करताच उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यात New Priority Inbox हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही हा पर्याय वापरू शकता. जी-मेलने प्रायॉरिटी इनबॉक्सचा वापर कसा करावा यासंदर्भातील एक व्हिडिओ दिला आहे. प्रायॉरिटी इनबॉक्स पर्याय ऑन केल्यानंतर तुमच्या जी-मेलच्या इनबॉक्सचे Important and unread, Starred आणि Everything else यामध्ये विभागणी होते. जी-मेलच्या Settings मधील प्रायॉरिटी इनबॉक्समध्ये जाऊन तुम्ही यामध्ये आवश्यक ते बदल करू शकता. या तिन्ही विभागांमध्ये किती ई-मेल दिसले पाहिजेत यासंदर्भातील बदल तुम्ही Settings मधून करू शकता.








Saturday, September 4, 2010

Rotating Buckyball as Google Doodle, Rotate Using Your Mouse


Rotating Buckyball as Google Doodle, Rotate Using Your Mouse





गुगलने होमपेजवर तयार केलेले अन्य लोगो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Thursday, September 2, 2010

सोशलडेस्क गुगलच्या ताब्यात

मोबाइल आणि स्मार्टफोनसाठी गेम्स तयार करणासाठी सोशलडेस्क ही वेबसाइट गुगलने विकत घेतली आहे. सोशलडेस्क, मोबाइल आणि सोशल नेटवर्किंग वेबसाइटसाठी गेम्स तयार करते. सोशलडेस्कचे प्रामुख्याने फेसबुक, अ‍ॅपल आयफोन आणि ब्लॅकबेरीसाठी तयार केलेले गेम्स प्रसिद्ध आहेत. एकाच वेळी अनेक मोबाइलवरून गेम्स खेळण्याची आणि सोशल नेटवर्किंगची सुविधा सोशलडेस्कमध्ये आहे. मात्र यासाठी गुगलने किती रक्कम मोजली आहे हे अद्याप जाहीर झालं नाही.






Friday, August 27, 2010

सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकची बाजी

भारतापेक्षा युरोपीय देशांमध्ये अधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकने अन्य सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.कॉम स्कोअरया कंपनीच्या अहवालानुसार जुलै महिन्यात फेसबुकला दररोज दोन कोटी नऊ लाख लोकांनी भेट दिली आहे. गेली काही वर्ष ब्राझील, भारत आणि अन्य देशांमध्येऑर्कुटप्रथम क्रमांकावर आहे. मात्र आत्ता भारतात हा क्रमांकफेसबुकने मिळवला आहे.






फेसबुकनंतर ऑर्कुटने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक भारतस्टुडेंसचा आहे.याहू पल्सने चौथं तर ट्विटरने पाचवं स्थान मिळवलं आहे.कॉम स्कोअरच्या अहवालानुसार भारतातफेसबुकला भेट देण्याच्या प्रमाणामध्ये १७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या साइटला दररोज दोन कोटी नऊ लाख लोक भेट देतात. सोशल नेटवर्किंगच्या वापरामध्ये अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया, ब्राझील आणि इंग्लंडनंतर भारताचा सातवा क्रमांक लागतो. सोशल नेटवर्किंगचा वापर करणा-यांची संख्या तीन कोटींहून अधिक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये आगामी काळात भारतही मोठी बाजारपेठ असेल, असंही कॉम स्कोअरने म्हटलं आहे.



Tuesday, August 24, 2010

गुगल लवकरच बॉक्स ऑफिसवर

जगभरातील इंटरनेट वापरणा-याचे सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगल आणि त्याचे संस्थापक लॅरी पेज आणि सेजी ब्रीन यांच्यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. ग्राउंडस्वेल प्रोडक्शनने केन औलेत्टॅ यांच्या Googled: The End Of The World As We Know It या पुस्तकाचे चित्रपटासाठीचे अधिकार घेतले आहेत.


















चांगल्या मार्गाने पैसे मिळवणा-या दोन युवकांबद्दलची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. लॅरी आणि सेर्जी यांनी गुगल सुरू केल्यामुळे जगात कसे बदल झाले, तसंच त्यांच्या जीवनात कोणते बदल झाले हेही या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचं माइकल लंडन यांनी सांगितलं.

सर्च इंजिनने गुगलची सुरुवात झाली असली तरी आज जगभरातील अनेक कंपन्यांना इंटरनेटशी संदर्भातील सेवा देतं.








Sunday, August 22, 2010

फोल्डरची वर्गवारी

संगणकातील एकूण जागेपैकी कोणत्या ड्राइव्हने, कोणत्या फोल्डरने किती जागा वापरली आहे? याचं एकत्रितपणे विश्लेषण बघण्याची सोय नाही. पण असं झालं तर कित्येक जणांचा वेळ यामुळे वाचेल यात शंका नाही. इंटरनेटवर उपलब्ध काही सॉफ्टवेअरद्वारे हे विश्लेषण मोफत होऊ शकते. अशाच काही सॉफ्टवेअरची माहिती


संगणकावर आपल्याला हवी तेवढी फोल्डर करण्याची सोय असल्यामुळे आपण लहान लहान गोष्टींसाठी, गरज असो वा नसो फोल्डर आणि कित्येक फाइल्स तयार करतो. पण यामुळे संगणकामध्ये फोल्डरची गर्दी होते. या फोल्डरच्या गर्दीमुळे संगणकातील बरीच जागा व्यापली जाते. अशा वेळी कॉम्प्युटर हँग होतो, तेव्हा संगणकातील जागा कमी करण्याची वेळ येते. म्हणूनच फोल्डर करताना किंवा त्यांची व्यवस्थित वर्गवारी करताना कोणत्या फोल्डरने संगणकातील किती जागा व्यापली आहे, हे पाहणं आवश्यक असतं. मात्र याचं एकत्रित विश्लेषण करण्याची सोय विंडोच्या कोणत्याही आवृत्तीत नाही. हे पाहण्यासाठी प्रत्येक फोल्डर ओपन करून properties ¸मध्ये जावं लागतं. यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जातो. हा वेळ वाचवायचा असेल तर इंटरनेटवर काही मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. अशाच काही सॉफ्टवेअरची माहिती पुढे दिली आहे.



Disk Space Fan - या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही संगणकातील जागेच्या वापराचं विश्लेषण एकत्रितपणे जाणून घेऊ शकता. ही माहिती pictorial diagram ¸म्हणजेच चित्रांच्या स्वरूपात मिळते. hard disk ¸मधील एकूण जागेचा कसा वापर झाला आहे. तसंच प्रत्येक फोल्डरमधील आणि त्यातील सब-फोल्डरने किती जागा व्यापली आहे, हे सहजसोप्या स्वरूपात समजतं. या सॉफ्टवेअरमध्ये एक सर्च मारलात की तुम्हाला प्रत्येक फोल्डरच्या जागेची माहिती कळेल. इतकंच नव्हे, तर संगणकातील ऑडिओ, व्हिडिओ, इमेज, वर्ड फाइल्स अशा प्रत्येक फाइलचं स्वतंत्रपणे विश्लेषण करू शकता.





हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



Folder Size Freeware - संगणकातील जागेचा वापर आणि त्याच्या विश्लेषणाठी वापरण्यात येणारं हे एक उत्तम सॉफ्टवेअर आहे. याद्वारे तुम्ही hard disk मधील प्रत्येक फोल्डरची त्याच्या तपशिलासह माहिती मिळवू शकता. या सॉफ्टवेअरमधील अन्य पर्यायांद्वारे संगणकामधील जागेचं विश्लेषण तुम्ही pie chart, Bar chart Afd¯f animated chart स्वरूपात पाहू शकता. संगणकातील प्रत्येक drive मधील, प्रत्येक फोल्डर, सब-फोल्डर आणि त्यातील फाइल्स यांची टक्केवारीसह विश्लेषण पाहण्याची सोय या सॉफ्टवेअरद्वारे आहे.




Folder Size Freeware सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


Folder Size for Windows XP- संगणकातील जागेचं विश्लेषण करणारं, हे सॉफ्टवेअर केवळ विंडो एक्सपीसाठी वापरू शकता. विंडो विस्टा, विंडो 7 मधील explorerच्या स्वरूपात आणि विंडो एक्सपीमधील explorerच्या स्वरूपात खूप फरक आहे. म्हणूनच हे सॉफ्टवेअर केवळ एक्सपीसाठी वापरता येतं. वरील दोन सॉफ्टवेअरप्रमाणे यामध्ये ही तुम्ही संगणकातील जागेचं विश्लेषण योग्य प्रकारे करू शकता. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP