Monday, March 14, 2011
Saturday, March 12, 2011
गुगलचे जपान पर्सन फाइन्डर
या टूलमध्ये व्यक्तींचा शोध घेण्याबरोबर ज्याचा शोध लागला आहे त्यांची ही माहिती मिळू शकते. ही सेवा जपानी भाषेसह इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे. भूकंपानंतर मोबाईल आणि फोन सेवा ठप्प झाल्यामुळे गुगलच्या या टूलच्या माध्यमातून व्यक्तींचा शोध घेणे शक्य आहे.
गुगलच्या या सेवेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा सुरु झाल्यापासून २४ तासांमध्ये तब्बल २२ हजार ४०० लोकांचा शोध घेतला गेला आहे.
गुगलने हे टूल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहे. व्यक्ती, बातम्या देणाऱ्या वेबसाइट, अन्य संस्था आणि संघटना यांना आपल्या वेबसाइट,ब्लॉगवर गुगलचे हे टूल Add करता येते. हे टूल मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
हैतीमध्ये जानेवारी २०१०मध्ये झालेल्या भूकंपानंतर गुगलने अशा प्रकारची सेवा सुरु केली होती. इतकच नाही तर जपानमध्ये भूकंप झाल्यानंतर गुगलने आपल्या होम पेजवर त्सुनामी अलर्ट दिला होता.
त्यानंतर गुललने होमपेजवर जपानवर आलेल्या संकटासंदर्भातील सर्व माहिती देणारे एक स्वतंत्र वेबपेज (Resources) तयार केले आहे. या पेजवर अलर्ट, बातम्या, व्हिडिओ, रियल टाईम अपडेट अशा सर्व माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती जपानी भाषेबरोबर इंग्रजीमध्ये ही उपलब्ध आहे.
जपानमधील भूकंप आणि त्सुनामीसंदर्भातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Posted by jay at 10:41 AM 0 comments
Labels: गुगल
Tuesday, March 8, 2011
‘जॉइन मि ऑन द ब्रिज’
१९११पासून आजपर्यंत महिलांनी शिक्षण, आरोग्यापासून ते राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. यंदाचा १००वा जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी GOOGLE आणि Women for Women International ने एक वेगळा कँपेन आयोजीत करण्याचे आवाहन केले आहे. Join women on bridgeअसे या कँपेन नाव असून जागतिक स्तरावर महिलांनी मिळवलेले यश, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शहरात कोणत्याही bridgeवर एकत्र येण्याचे आवाहन गुगलने केले आहे.
Posted by jay at 5:00 PM 0 comments
Labels: गुगल
Saturday, February 19, 2011
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी गुगलने तयार केलेला लोगो
Posted by jay at 5:05 PM 0 comments
Labels: Google logos
Wednesday, November 3, 2010
सर्च देके ब्लेको

सर्च इंजीनमध्ये आघाडीवर असलेल्या गुगलला टक्कर देण्यासाठी ब्लेको (Blekko.com) हे नवे सर्च इंजीन सुरु झाले आहे.
ब्लेकोवर सध्या तीन अब्ज अधिकृत वेबसाइटची नोदणी आहे. यामधूनच यूजर्सनी सर्च केलेल्या विषयासंर्भातील बेवसाइटची यादी अथवा माहिती दाखवली जाते.
ब्लेकोवर वेबसाइटच्या रॅकिंगच्या बाबतीत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. अन्य सर्च इंजिनमध्ये एखाद्या वेबसाइटचे रॅकिंग गुप्त ठेवले जाते. मात्र ब्लेकोवर ही माहिती सर्वासांठी खुली आहे. एखाद्या वेबसाइटचे रॅकिंग पहायचे असेल तर संबंधित बेवसाइटचा पत्ता लिहून/seo लिहावे.
ब्लेको गुगल सारख्या प्रस्थापीत सर्च इंजीनला तसेच गुगल, बिंग या सर्च इंजीनना टक्कर देईल का नाही. हे इतक्यात सांगता येणार नाही. मात्र अन्य सर्च इंजीनवर ज्या गोष्टी करता येणार नाहीत. त्या ब्लेकोवर करता येईल असा दावा यांच्या निर्मात्यांनी केला आहे.
ब्लेको अन्य वैशिष्टे पाहण्यासाठी सर्च करुन पहायला हरकत नाही.
Posted by jay at 7:37 PM 0 comments
Labels: वेबसाईट
Monday, November 1, 2010
याहू मेल नव्या स्वरुपात
गुगलच्या जी-मेलला आणि माक्रोसॉफ्टच्या हॉटमेलला टक्कर देण्यासाठी याहूने आपल्या मेल सेवेची नवी व्हर्जन लॉच केली आहे.
याहू मेलच्या नव्या व्हर्जनची काही वैशिष्टे
- या नव्या व्हर्जनमध्ये युजर्सना अमर्यांदित जागा देण्यात आली आहे.
- अधिक वेगाने इ-मेल पाठवने शक्य होणार आहे.
- याहूने नवे व्हर्जन आकर्षक Designमध्ये उपलब्ध करुन दिले आहेत.
- तुम्ही वापरत असलेल्या फेसबुक, टि्वटर आदी या सोशल नेटवर्किंग साइटचे अपडेट याहू मेलच्या डॅशबोर्डवर पाहता येणारा.
- इंटरनेट कनेक्ट असलेल्या कोणत्याही माध्यमातून याहूमेल ओपन करता येणे शक्त.
- अनावश्यक येणा-या मेलपासून (Spam) अधिक संरक्षण

इ-मेल सेवा देणा-यामध्ये याहू दुस-या(273 दशलक्ष युजर्स) क्रमांकावर असला तरी त्याला हॉटमेल आणि जी-मेलची जबरदस्त स्पर्धा आहे. त्यामुळेच तब्बल पाच वर्षांनंतर याहूने बदल केले आहेत. इ-मेल सेवा देणा-यामध्ये हॉटमेल 362 दशलक्ष युजर्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर जी-मेल 193 दशलक्ष युजर्ससह तिस-या क्रमांकावर आहे.
Posted by jay at 7:32 PM 0 comments
Friday, October 29, 2010
Wikipedia Meetupसाठी जिमी वॉल्स मुंबईत
इंटरनेटवरील माहितीवर कुणाचा एकाचा अधिकार असता कामा नये तसेच तो सर्वांना मोफत उपलब्ध झाले पहिजे या उद्देशाने सुरू झालेल्या विकिपीडिया या संकेतस्थळावर सक्रिय सहभाग घेणा-यांचा मुंबईतला तिसरा मेळावा रविवारी सोफिया महाविद्यालयात होणार आहे. या मेळाव्यासाठी विकीपीडियाचे संस्थापक जिमी वॉल्स हेदेखील येणार आहेत!
विकिपीडियाचा वापर करून न थांबता तेथील मजकूर समृद्ध करणारे आणि विकीपीडियाच्या अन्य उपक्रमांतही सहभाग घेणारे (विकिपीडियन्स आणि विकिमीडियन्स) मुंबईत अनेकजण आहेत. पण यापूर्वीच्या दोन बैठका वांद्रे आणि खारघर येथे झाल्या, तेव्हा वांद्रय़ात 13, आणि खारघरला अवघे 10जण आले! तिस-या मेळाव्याला जिमी वॉल्स येणार असल्याने 800 जण बसतील एवढ्या सभागृहात हा मेळावा होत आहे.
या भेटी दरम्यान चर्चा करण्यासाठी निश्चित असा कार्यक्रम ठरवलेला नाही. सहभागी होणा-यांनाही मतप्रदर्शनाची, व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. जिमी वॉल्स विकिपीडियाच्या विस्ताराबद्दल, तसेच प्रत्यक्षात विकिपीडियाचे काम कसे चालते. भारतातील इंटरनेट यूजर्स माहितीच्या या सर्वांत मोठ्या लिंकचा अद्याप पुरेसा वापर का करत नाहीत अशा मुद्दयांवरही बोलतील, अशी अपेक्षा आहे.
ब्रीच कँडीच्या सोफिया महाविद्यालयातील `सोफिया भवन हॉल'मध्ये सायंकाळी सहा वाजता होणा-या या मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क नाही. `विकिपीडिया'चा ज्ञानमार्ग रुंद करू शकणारे सर्वजण येथे येऊ शकतात!

Posted by jay at 1:46 PM 0 comments
Labels: विकिमिडिया
Pages
Categories
- Google logos (7)
- Wallpapers (1)
- गुगल (20)
- जी-मेल (4)
- टि्वटर (9)
- नेट अपडेट (3)
- मराठी वेबसाईट (4)
- विकिमिडिया (3)
- वेबसाईट (20)
- व्हिडिओ (2)







