Friday, April 2, 2010

आता वाचा.. ‘विकिबुक्स’


विकिमिडिया फाउंडेशनच्यामाध्यमातूनविकिपिडियासारखेइतर अनेक प्रकल्पराबवले जातात. विकिपिडियासारखी रचना असलेल्याविकिमिडियाच्या आणखी एकावेगळ्या वेबसाइट अर्थातविकिबुक्सविषयी.. ‘ ‘

इंटरनेटवरील माहितीच्या मोठ्या पसा-यात एखाद्या विषयासंबंधी माहिती मिळवण्यासाठी सर्वात सोपा आणि सहज मार्ग म्हणजे विकिपिडिया. या वेबसाइटचा आपण नियमित वापर करत असतोच. प्रचंड माहितीचा स्रोत असणारी विकिपिडिया ही वेबसाइट एक भाग आहे, ‘विकिमिडियाचा. विकिमिडिया फाउंडेशनच्या माध्यमातून विकिपिडियासारखे इतर अनेक उपयुक्त प्रकल्प राबवले जातात. इंटरनेटच्या विश्वात जगभरातील 250 हून अधिक भाषांतून अनेक विषयांवर माहिती मोफत उपलब्ध करणा-या या फाऊंडेशनची स्थापना जानेवारी 2001 मध्ये झाली.



विकिपिडियासारखीच रचना असलेली आणखी एक वेगळी वेबसाइट म्हणजे विकिबुक्स’. भाषांचं ज्ञान देणा-या माहिती पुस्तिका आणि समीक्षण करणा-या ई-बुक्स वगैरेंची निर्मिती करण्याच्या आणि इंटरनेटवर ती सर्वाना मोफत उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जुलै 2003 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. वाचनासाठी मोफत पुस्तक उपलब्ध करून देणा-या अनेक वेबसाइट इंटरनेटवर आहेत. त्यापैकी काहींची माहिती मागील लेखातून आपण घेतली होती. विकिबुक्स हीसुद्धा अशाच प्रकारे मोफत पुस्तकं मिळवण्याचा एक मार्ग आहे. अर्थात विकिबुक्सच्या निर्मितीमागे मात्र थोडा वेगळा विचार आहे. या प्रकल्पाचा मूळ उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून इंटरनेटवर विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यापीठांना उपयुक्त पाठय़पुस्तक मोफत निर्माण करण्याचा आहे. ही संकल्पना केवळ शैक्षणिक पुस्तकाची ऑनलाइन निर्मिती एवढ्यापुरती मर्यादित नसून विकिविश्वविद्यापीठाच्या निर्मितीचा पाया आहे.

विकिपिडियावर कुणीही व्यक्ती माहिती संपादित करू शकते किंवा त्यात अधिक माहितीची भर घालू शकते, त्याच धर्तीवर इथे पुस्तकांची निर्मिती किंवा संपादन करता येते. विकिबुक्समध्ये पुस्तकांसाठी मजकूर लिहिता आणि संपादन करता येतो.2008 पर्यंत विकिबुक्सच्या इंग्रजी आवृत्तींमध्ये सर्वाधिक म्हणजे 28 हजार माहिती पुस्तिका आणि तीन हजार पुस्तकांची निर्मिती झाली आहे. त्यापाठोपाठ जर्मन आणि पोर्तुगीज भाषांतूनही माहिती पुस्तिकांची निर्मिती झाली आहे. विकिबुक्सच्या मुख्य (इंग्रजी) पेजवर जाण्यासाठी लॉगऑन करा http://en.wikibooks.org/wiki/main_page


विकिबुक्सच्या मराठी आवृत्तीवर सध्या केवळ 143 लेख आहेत. विकिबुक्सवरील मराठी भाषेतील पुस्तक निर्मितीसाठी तुम्हीही सहभाग नोंदवू शकता. त्यासाठी लॉगऑन करा http://mr.wikibooks.org/wiki/

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP