ऑनलाइन पॉलिटिक्स
मराठी पत्रकारिता, राजकारण आणि प्रशासन या सगळ्याची माहिती एकाच ठिकाणी मिळेल अशीमहापॉलिटिक्स.कॉम नावाची वेबसाइट पी4पी या माध्यम संस्थेने तयार केली आहे. राजकारण आणि पत्रकारिताया क्षेत्रातील इत्थंभूत माहिती देणारी युनिक वेबसाइट म्हणून ती नावारूपाला आली आहे.
इंटरनेटच्या विश्वात मराठी पत्रकारांना उपयुक्त असणारी माहिती देणारी वेबसाइट्स शोधण्याचा प्रयत्न केल्यास केवळ प्रत्येक वृत्तपत्राच्या वेबसाइट आणि काही पत्रकारांचे ब्लॉग अशाच वेबसाइट्स मिळतात. मराठी पत्रकारिता, राजकारण आणि प्रशासन या सगळ्याची माहिती एकाच ठिकाणी मिळेल अशी महापॉलिटिक्स.कॉम नावाची वेबसाइट पी4पी या माध्यम संस्थेद्वारे तयार केली असून ही राजकारण आणि पत्रकारिता या क्षेत्रातील माहिती देणारी युनिक वेबसाइट ठरली आहे.
राजकारण, प्रशासन आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील ताज्या घडामोडींची माहिती या वेबसाइटवर मिळणार आहे. पत्रकारांना दैनंदिन कामकाजासाठी लागणारे अत्यावश्यक संदर्भ या ठिकाणी देण्यात आले आहे. यात प्रेस रिलिज, महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्स, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, मराठी माध्यमामध्ये होणा-या घडामोडी याशिवाय पत्रकारांच्या बदल्या, त्याचे वृत्तपत्रातील लेखन, ब्लॉग, ताज्या घडामोडी अशी एकत्रित केलेली उपयुक्त माहिती या वेबसाइटवर उपलब्ध आहे.महत्त्वाचं म्हणजे राजकारणात असलेल्या आणि महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या सनदी अधिका-यांचे थेट संपर्कही या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचा फायदा पत्रकारांबरोबरच सामान्य लोकांनाही होणार आहे हे निश्चित.
इंटरनेटवरील माहितीच्या प्रचंड साठय़ात जगातल्या कोणत्याही गोष्टीचे संदर्भ इंग्रजीमध्ये पटकन उपलब्ध होतात मात्र आपल्या आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक संदर्भ शोधण्यासाठी मात्र इंटरनेटचे जाळे अपूरे पडते, याचा विचार करून महापॉलिटिक्सवर महाराष्ट्राचा संदर्भकोष देण्यात आला आहे. या संदर्भकोषामध्ये प्रत्येक राज्याचा राजकीय इतिहास, जिल्ह्यांची, राजकीय पक्षांची तसेच आतापर्यंत झालेल्या निवडणुकांची इत्थंभूत माहिती त्याच्या आकडेवारीसह देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर राज्यातील महत्त्वाच्या संस्था, देश आणि राज्य पातळीवरील राजकारणात असलेल्या महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीचे प्रोफाइल त्याच्या सध्याच्या पदासह या वेबसाइटवर तुम्हाला मिळू शकतील.
माहितीवरील केवळ प्रसारमाध्यमांची मक्तेदारी मोडून काढण्याचा माहापॉलिटिक्सच्या निर्मात्याचा प्रयत्न पहिल्या टप्यात यशस्वी ठरल्याचे या वेबसाइटला भेट दिल्यानंतर जाणवते. इंरनटेच्या विश्वात मराठीचा आणि त्यातही पत्रकारिता, राजकारण आणि प्रशासन अशा वेगळ्याच क्षेत्राची माहिती देणा-या या उपक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी लॉगऑन करा- http://mahapolitics.com
0 comments:
Post a Comment