कम्युनिकेशनचं नवं माध्यम
ट्विटर, ऑर्कुट यासारखी अनेक सोशल नेटवर्किंगची साधनं कम्युनिकेशनसाठी वापरली जातात. या सोशल नेटवर्किंगमध्ये कम्युनिकेशनचं आणखी एक नवं माध्यम सुरू झालं आहे. ई-मेल, इन्स्टंट मेसेजिंग, चॅटिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फोटो शेअरिंग अशा गोष्टी एकाच वेळी करता येणा-या आणि फारसं परिचित नसलेल्या ‘वेव’ नावाच्या माध्यमाविषयीची माहिती आजच्या स्मार्ट क्लिकमध्ये.. सध्या इंटरनेटवर ट्विटर, ऑर्कुट यासारखी अनेक सोशल नेटवर्किंगची साधनं कम्युनिकेशनसाठी वापरली जातात. मात्र भविष्यातील संपर्कासाठी उपयोगी पडेल असं ऑनलाइन अॅप्लिकेशन टूल गुगलने सुरू केलं असून ‘वेव’ असं त्याचं नाव आहे. ऑफिसमधील कामाबरोबरच अन्य अॅप्लिकेशन असलेलं हे नवं टूल म्हणजे रियल टाइम कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म ठरणार आहे. तर गुगलच्या या ‘वेव’वर स्वार होण्यास तयार व्हा.. वेवमधून ई-मेल, इन्स्टंट मेसेजिंग, चॅटिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फोटो शेअरिंग अशा गोष्टी एकाच वेळी करता येतील. कोणत्याही ई-मेलसोबत एखादी फाइल अथवा फोटो पाठवायचा असेल तर तो अॅटॅच करावा लागतो. ती फाइल किंवा तो फोटो अॅटॅच होण्यासाठी कधी कधी किती तरी वेळ लागतो. त्यामुळे ते काम कंटाळवाणं होतं. मात्र वेवमध्ये अॅटॅचमेंटची कटकटच नाही. केवळ ड्रॅग आणि ड्रॉप करून अतिशय सहज फोटो पाठवू शकता. इतकंच नव्हे; तर सहज भाषांतर आणि स्पेलिंग करेक्शन करण्याची सोयही वेवमध्ये उपलब्ध आहे. वेवची सुरुवात सप्टेंबर 2009 मध्ये झाली असली तरी वेव फारसे परिचित नाही. वेवचा वापर करायचा असेल तर अजूनही गुगलला रिक्वेस्ट पाठवावी लागते. वेववर स्वार होण्यासाठी https:services.google.com/fb/forms/wavesignup या लिंकवर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मद्वारे तुम्ही गुगलला वेवसाठी रिक्वेस्ट पाठवाल. या रिक्वेस्टचा दोन दिवसांत तुम्हाला रिप्लाय मिळेल. त्यानंतर तुमचे वेवचे अकाऊंट सुरू होईल.
0 comments:
Post a Comment