Saturday, April 10, 2010

नेट अपडेट- ऑफलाइनकडून ऑनलाइनकडे..

देशातील महानगर आणि मोठ्या शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. इंटरनेट, मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार 2009 सालात देशभरातील 71 दशलक्ष लोकांनी इंटरनेटचा वापर केल्याचं म्हटलं आहे. देशात इंटरनेट वापरणाऱ्याच्या संख्येत दरवर्षी 19 टक्क्यांनी वाढ होत असून सप्टेंबर 2008 मध्ये 42 दशलक्ष लोकांनी तर सप्टेंबर 2009 मध्ये ही संख्या 52 दशलक्ष इतकी झाली आहे.

विशेष म्हणजे महानगर आणि मोठ्या शहरांबरोबरच लहान आणि ग्रामीण भागातूनही इंटरनेटचा वापर होत असल्याचे या अहवालात नमूद केलं आहे. मात्र ही वाढ किती टक्के आहे अथवा ग्रामीण भागातील एकूण इंटरनेट वापरणा-यांची संख्या नेमकी किती आहे. याची स्पष्ट आकडेवारी यात नाही. अल्प उत्पन्न गटातील व्यक्तीही इंटरनेटचा अधिकाधिक वापर करतात. सोशल नेटवर्किंगच्या वेबसाइट्सना भेटी, नवीन सॉफ्टवेअरचा शोध, मनोरंजन अशा प्रमुख कारणांसाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.


0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP