शॉपिंग विथ गुगल
भारतीय नेटकर अर्थात इंटरनेट वापरणारे त्यांच्या एकूण इंटरनेटसर्चमधील 35 टक्के वेळ एखाद्या उत्पादनाची माहिती घेण्यात खर्च करतात. नेटवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारावर भारतीय ग्राहक एखादी वस्तू विकत घेण्याचा निर्णय घेतात. हा निष्कर्ष काढलाय गुगल टीमने. एकूणच इंटरनेटवरील सर्च आणि उत्पादन खरेदी करण्यामध्ये ‘गुगल’ची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचं गुगल इंडियाच्या अभ्यासातून स्पष्ट झालंय. भारतीय नेटकरांची ही सवय लक्षात घेऊन गुगलने ‘गुगल शॉपिंग’ नावाने एक नवी सेवा सुरु केली आहे. याद्वारे आवश्यक वस्तूंच्या छायाचित्रांसह त्यांची माहिती, किंमत आणि ती ऑनलाइन विकणा-यांची यादी आदी माहिती मिळवता येईल. ‘गुगल शॉपिंग’द्वारे उत्तम बजेटनुसार,अधिक वेगाने वस्तू खरेदीचा निर्णय ग्राहकांना घेता येईल असा दावा ‘गुगल इंडिया’ने केला आहे.
0 comments:
Post a Comment