Saturday, April 24, 2010

इन्सर्ट इमेज

आपल्याला ई-मेलमधून मजकूर टाइप करून त्यासोबत फोटो पाठवायचा असेल तर आपल्याला फाइल ब्राऊज करण्याची भलीमोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. पण यासाठी तुम्ही एक ट्रिक केलीत तर तुम्हाला हवा तो फोटो, हव्या त्या आकारात सहजरीत्या मिळू शकतो. याविषयीची माहिती आजच्या स्मार्ट क्लिकमध्ये...

आपल्या मित्राला एखादा मेल पाठवताना ई-मेलचा मजकूर लिहिल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी एखादा फोटो पेस्ट करता तेव्हा तो फोटो कॉपी होत नाही. ई-मेलसोबत फोटो पाठवायचे असतील तर सर्वसाधारणपणे आपण फोटो अटॅच करून पाठवतो. मग फाइल अटॅच करण्यासाठी ब्राऊझरमध्ये जा, हवी असलेली फाईल शोधा आणि मग ती अटॅच करा अशी सगळी प्रक्रिया करावी लागते. मात्र ज्या ठिकाणी मजकूर लिहिला जातो तेथेच फोटो कॉपी करता येणं शक्य आहे, असं जर कोणी सांगितलं तर? याविषयी माहिती स्मार्ट क्लिकमधून वाचकांना करून देणार आहोत. अर्थात ही सोय सध्या तरी फक्त जी मेलवर आहे.


जी मेलवरील ही सोय वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या जी मेल आयडीच्या Settings मध्ये Labs मध्ये जावं लागेल. जी मेल वापरताना उपयोगात येणारे अनेक पर्याय या ठिकाणी दिसतील. यामधील Inserting images समोरील Enable ऑन करा आणि केलेले चेंजेस सेव्ह करा. त्यानंतर Compose Mail मध्ये जाऊन तुम्हाला हवा असलेला मेल टाईप करून त्या संदर्भातील फोटो कॉपी करण्यासाठी Compose Mail च्या वरच्या बाजूला नेहमी दिसणा-या पर्यायासोबत insert an image नावाचा पर्याय दिसेल. तुम्हाला हवा असलेला फोटो या ठिकाणाहून तुम्ही अपलोड करून मजकुरासोबत पाठवू शकता. तुम्ही पाठवत असलेला फोटो लहान, मध्यम आणि मोठा असा कोणत्याही आकारात करून सहजरीत्या पाठवू शकता.

2 comments:

Anonymous April 24, 2010 at 5:28 PM  

good post

Anonymous June 23, 2010 at 3:27 PM  

best information..
Rohan, Kolhapur

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP