फेसबुकने केल्या काही दिवसांत आपल्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलत्या नियमांमुळे फेसबुक वापरणा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फेसबुक वापरणा-या व्यक्तीचा प्रोफाईल कोणतीही व्यक्ती लॉगइन न करताच पाहू शकते. या नियमावरून अनेक फेसबुक वापरणा-यानी नाराजी व्यक्त केल्यानंतर फेसबुकला हा निर्णय मागे घ्यावा लागला.
आता फेसबुकवर मित्राची संख्या पाच हजारहून अधिक करता येणार नाही. सोशल नेटवर्किंग साइटवर मित्रांची संख्या हाच लोकप्रिय होण्याचा निकष असला तरी फेसबुकने यावर मर्यादा घातली आहे. जगभरात दोन कोटीहून अधिक लोक फेसबुकचा वापर करतात. त्यापैकी 400 दशलक्ष लोकांच्या मित्रांची संख्या पाच हजारहून अधिक आहे. यापुढे फेसबुकवर पाच हजारच्यावर मित्र करण्यासाठी प्रयत्न केल्यास युजरला हा टप्पा पार केल्याचा मेसेज मिळणार आहे.
0 comments:
Post a Comment