Thursday, June 3, 2010

नेट अपडेट- फेसबुक नंबर वन!


सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकने एप्रिल महिन्यात जगभरात सर्वात मोस्ट व्हिजिटेड वेबसाइट होण्याचा मान पटकावला आहे. गुगलने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील एक हजार वेबसाइटच्या यादीमध्ये फेसबुकने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

एप्रिल महिन्यात फेसबुकला 540 मिलियन युनिक व्हिजिटर्सनी भेट दिली आहे. जगभरात इंटरनेट वापरणा-यांपैकी तब्बल 35.20 टक्के लोकांपर्यंत फेसबुक पोहोचल्याचं गुगलने म्हटलं आहे. एप्रिल महिन्यात फेसबुकला 570 बिलियन पेज व्ह्यूज मिळाले आहेत. इंटरनेटवरील अन्य सोशल नेटवर्किंग वेबसाइट असलेल्या आर्कुट, ट्विटर, मायस्पेस यांना फेसबुकने मागे टाकलं आहे.

गुगलने ही यादी प्रसिद्ध करताना त्यात अश्लील वेबसाईट्सचा समावेश केलेला नाही.

फेसबुकनंतर Yahoo दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर live.comने तिसरा क्रमांक पटकावला आहे. चौथा क्रमांक wikipedia.org ने पटकावला आहे. तर पाचवा क्रमांक msn.com चा आहे. या टॉप टेन यादीमधील Wikipediaआणि Mozillaया दोन वेबसाईट स्वत:च्या साइटवर जाहिराती घेत नाहीत.

ब्लॉग प्रकारांतील Blogspot ने या यादीत सातवा क्रमांक पटकावला आहे. तर WordPress.com चं बारावं स्थान पटकावलं आहे.

भारतात इंटरनेट वापरणा-यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आर्कुटचा या यादीत 45वा क्रमांक आहे. अन्य काही महत्त्वाच्या वेबसाइट्सचं या यादीमधील स्थान पुढीलप्रमाणे आहे : Microsoft (6वं), Twitter (18 वं), Amazon (22वं), eBay (24वं), myspace (26वं), Apple (27वं), Hotmail (30वं), Linkedin (56वं). वृत्तवाहिन्यामध्ये Cnet.com ने 35 वं पटकावलं आहे. तर BBC.co.uk (43वं), CNN ने 64वं तर NYTimes.com ने 83 वं स्थान मिळवलं आहे. गुगलच्या या यादीचा उपयोग जाहिरातदारांना होणार आहे. या यादीद्वारे कोणत्या वेबसाइटवर जाहिरात द्यायची हे ठरवणं सोपं जाणारंय.

गुगलने या यादीमध्ये स्वत:च्या जी-मेल, गुगल न्यूज, गुगल सर्च, गुगल बझ आणि यू टय़ूब या वेबसाईटचा क्रमांक दिलेला नाही.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP