Wednesday, June 9, 2010

महिन्याभरात दोन अब्ज ट्वीट्स

माक्रोब्लॉगिंग प्रकारातल्या वेबसाइटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणा-या ट्वीटरने आणखी काही मोठे पल्ले गाठले आहेत. ट्वीटरवरील जगभरातील सदस्यांनी एका महिन्यात दोन अब्ज ट्वीट्स पाठविले आहेत. ट्वीटरवर दररोज 65 कोटी ट्वीट्स पाठविले जातात. गेल्या महिन्यात ट्वीटरवरनं 15 अब्ज ट्वीट्स पाठविले गेले होते. तसंच ट्वीटर दररोज एक लाख 35 हजार नवे सभासद होत असल्याची माहिती ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टालो यांनी सांगितली. मात्र यापैकी किती सभासद वैयक्तिक कारणासाठी आणि किती जण व्यवसायिक कारणासाठी ट्वीटरचा वापर करतात याची माहिती कळू शकली नाही. तीन महिन्यांपूर्वी दहा हजार ट्वीट्सचा पल्ला गाठणा-या ट्वीटरने गेल्या महिन्यात 15 अब्ज ट्वीट्सचा पल्ला गाठला होता.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP