Saturday, June 12, 2010

फिफा फिवर ट्विटरवर

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी इंटरनेटवर अनेक वेबसाइट्सनी स्वतंत्र वेबपेज तयार केलं आहे. या फुटबॉल फिवरमध्ये ट्विटरही सहभागी झालं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेचे निकाल आणि प्रत्येक संघाचं एक स्वतंत्र पेज तयार केलं आहे. स्पर्धेतील 32 संघांच्या सामन्याचं वेळापत्रक आणि त्याचे निकाल या पेजवर देण्यात आले आहेत.

विश्वचषकाशी संबंधित ट्विटही या ठिकाणी पाहायला मिळतात. स्पर्धेतील सहभागी संघावर क्लिक केल्यावर त्या संघाचे सामने आणि जगभरातील लोकांनी त्यावर केलेले ट्विट्सही या ठिकाणी मिळतात.

फिफा विश्वचषकासंदर्भात ट्विटरने प्रत्येक संघासाठी काही संक्षिप्त रूप तयार केलं आहे. या संक्षिप्त रूपाचा वापर करताना आधी # चा वापर करावा लागतो. या संक्षिप्त रूपाचा वापर करून ट्विट्स केल्यास तुमचे ट्विट्स या पेजवर दिसतात. प्रत्येक संघासाठीचं संक्षिप्त रूप पुढीलप्रमाणे आहे :
#arg #aus #bra #chi #civ #cmr #den #eng #esp #fra #ger #gre #hon #ita #jpn #kor #mex #ned #nga #par #por #prk #rsa #srb #usa तर विश्वचषकासाठी (World Cup)#World Cup हे संक्षिप्त रूप आहे. ट्विटरच्या या होम पेजवर जाण्यासाठी http://twitter.com/worldcup/home वर लॉगइन करा.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP