Saturday, June 5, 2010

पहा लाइव्ह टीव्ही




काही दिवसांपूर्वी ‘गुगल टीव्ही’ची घोषणा करण्यात आली होती. गुगलचा हा टीव्ही भारतीय बाजारपेठेत येण्यासाठी अजून बराच कालावधी आहे; पण इंटरनेट वापरताना गुगल क्रोम ब्राउझरच्या मदतीने तुम्ही विविध देशांतील वाहिन्याही पाहू शकता.

क्रोम ब्राऊझरवरून www.tv-chrome.com ही वेबसाईट ओपन करा. या वेबसाइटवर get TV-chrome या पर्यायावर क्लिक करून लाइव्ह टीव्ही पाहण्यासाठीचा प्रोग्राम डाऊनलोड करून घेतल्यानंतर, तुमच्या क्रोम ब्राऊझरच्या उजव्या बाजूला टीव्हीचा लोगो दिसेल. यावर क्लिक केल्यास देश आणि विषयानुसार वाहिन्यांची यादी दिसेल. ज्या देशातील वाहिनी पाहायची आहे. त्यावर क्लिक करून ती वाहिनी पाहू शकता. उदा- भारताची निवड केल्यास भारतातील 29 वाहिन्या दिसतील.

भारतातील स्टारच्या जवळजवळ सर्व वाहिन्या क्रोमवर तुम्ही पाहू शकता. मराठीमधील आयबीएन लोकमतही वृत्तवाहिनी क्रोमवर उपलब्ध आहे.

जगभरातील 115 देशातील तब्बल 2 हजार 780 लाइव्ह वाहिन्या क्रोमवर पाहू शकता. अर्थात हे सर्व मोफत आहे.

विशेष म्हणजे, क्रोमवर वाहिन्याचं प्रसारण होण्यास कमी वेळ लागतो. त्याचबरोबर प्रत्यक्षात टीव्हीवर दिसणारी वाहिनी आणि क्रोमवर दिसणारी वाहिनी यामध्ये तीस सेकंद ते एक मिनीट इतकाच फरक असतो.


टीव्ही क्रोम वेबसाइटवर तुम्हाला अन्य टीव्ही टूलबारही उपलब्ध आहेत. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.

इंटरनेटवर क्रोम टीव्हीचा शोध घेताना www.chromeonlinetv.com ही आणखी एक वेबसाइट सापडली. याचं स्वरूप tv-chrome.com सारखंच असलं तरी टीव्ही क्रोमप्रमाणे या वेबसाइटवर टीव्हीसोबत विषयानुसार संबंधित विषयातील व्हिडिओ पाहायला मिळतात. chromeonlinetv.com वर तुम्ही संबंधित वाहिनीवर क्लिक केल्यास थेट त्या वाहिनीच्या वेबसाइटवर जाता येतं.

क्रोम टीव्हीवरील वाहिन्या अन्य ब्राउझरवरही पाहता येतात. Internet Explorer, Firefox, Safari या ब्राउझरवर वाहिन्या पाहण्यासाठीच्या लिंक्स पुढीलप्रमाणे आहेत. Internet Explorer साठीची लिंक http://www.tvtoolbar.org, Firefox साठी https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/150953 ही लिंक, तर Safari साठी http://safariaddons.com/en-US/safari/addon/64 या लिंकवरून तुम्ही प्रोग्रॉम डाऊनलोड करू शकता.या सर्व वाहिन्या पाहण्यासाठी तुमच्या संगणकावर अद्ययावत Flash Player असणं आवश्यक आहे.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP